सध्या महाराष्ट्र सरकार अनेक नवीन योजना आणि उपक्रम राबवित आहे. यातच एक नवीन महत्वाचा अपडेट महिला दिन निमित्त राज्य सरकारने पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांसाठी मोठा निर्णय घेतला असून सुमारे 4000 अंगणवाडी सेविकांना 1 कोटी 92 लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे. हा भत्ता येत्या काही दिवसांत सेविकांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेत लाभार्थी महिलांचे अर्ज भरून घेण्याचे काम अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांमार्फत करण्यात आले. अर्ज भरण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम केले. प्रत्येक अर्जासाठी 50 रुपये प्रोत्साहन भत्ता संबंधित कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी सरकारने एकूण 1 कोटी 92 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्याचे काम जिल्ह्यातील सेविकांसह पर्यवेक्षिकांनी केले होते. जिल्ह्यात एकूण 3 लाख 84 हजार 512 अर्ज भरले गेले. यासाठी एकूण 1 कोटी 92 लाख 25 हजार 600 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आता पुढील टप्प्यात हा निधी कोषागारात पाठवून, त्याद्वारे रक्कम उपलब्ध झाल्यानंतर अंगणवाडी सेविकांच्या खात्यात जमा केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे लवकरच सेविकांना हा प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















