अंगणवाडी सेविका भर्ती साठी हजारो उमेदवारांनी अर्ज सदर केले आहेत. सध्या जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका पदभरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची यादी ५ मार्च रोजी जाहीर करण्यात आली आहे. लवकरच पात्र उमेदवारांची निवड होणार असून, यादीतील माहितीवर १० दिवसांच्या आत आक्षेप नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे (Anganwadi Sevika Recruitment Final Selection List). त्यानंतर अंतिम निवड घोषित केली जाईल. इच्छुक उमेदवार आपापल्या पद्धतीने प्रयत्नशील असून, बारावीचे गुण, पदवी, संगणक ज्ञान व अनुभव यासारख्या निकषांवर निवड होणार असल्याने कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार शक्य नाही, असे चित्र आहे.

बारावीला अधिक टक्केवारी मिळालेल्या उमेदवारांना प्राधान्य मिळण्याची शक्यता असली तरी पदवीधर उमेदवारांना १० अतिरिक्त गुण दिले जात आहेत. ग्रामीण भागात अंगणवाडी सेविकेचे पद महिलांसाठी व बालकांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी विशेष पात्रतेची गरज भासते. सध्या गावखेड्यात उच्चशिक्षित आणि सक्षम उमेदवार उपलब्ध होत असले तरी फक्त बारावीतील गुणांवर भर दिल्यास इतर पात्र उमेदवारांवर अन्याय होण्याची शक्यता आहे.
कोरोना काळात बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तुलनेने अधिक टक्केवारी मिळाल्यामुळे केवळ त्यावर आधारित निवड होणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे शासनाने टक्केवारीसोबतच इतर पात्रतेचेही योग्य मूल्यमापन करून सर्वांत सक्षम उमेदवारांची निवड केल्यास ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















