अंगणवाडी सेविका भर्तीसाठी आवश्यक कागदपत्र कोणती २०२५ !! – Anganwadi Sevika Bharti List of Documents

Anganwadi Sevika Bharti List of Documents

Anganwadi Sevika Bharti List of Documents 2025 – आपल्याला माहीतच असेल सध्या राज्यात सध्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू आहे. अनेक उमेदवार या संधीचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत, मात्र त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याबाबत अनेक उमेदवारांमध्ये संभ्रम आहे. खाली आम्ही अंगणवाडी सेविका (Anganwadi Sevika Bharti 2025) भरतीसाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची यादी देत आहोत. महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात एकूण 18,882 पदांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये 5,639 पदे अंगणवाडी सेविका पदासाठी तर 13,243 पदे अंगणवाडी मदतनीस पदासाठी आरक्षित आहेत.

Anganwadi Worker Recruitment 2025 !!

Anganwadi Sevika Bharti List of Documents Required are mentioned in this article. Candidates interested in this job must have following list of document for applicatipn process. All documents should be verified caredully before submiting your application form. 

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

भरती प्रक्रियेसाठी स्थानिक पातळीवर जाहिराती प्रसिद्ध
राज्यभरातील विविध जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्थानिक पातळीवर भरती संदर्भातील जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. 14 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत मुख्य सेविका पदासाठीही सरळ सेवा भरती प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांनी अर्ज करताना योग्य कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. योग्य कागदपत्रे जोडली नसतील, तर अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याची संपूर्ण माहिती जाणून घेणे गरजेचे आहे.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे (सांक्षाकित सत्य प्रती आवश्यक List of Documents For Anganwadi Sevika Bharti 2025)

  • रहिवासी प्रमाणपत्र: तहसील कार्यालयाकडून मिळालेले रहिवासी प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे.
  • लहान कुटुंब प्रमाणपत्र: कुटुंब नियोजन धोरणाअंतर्गत लहान कुटुंब प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • जात प्रमाणपत्र: उमेदवार आरक्षित प्रवर्गाचा असल्यास सक्षम प्राधिकरणाने दिलेले जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
  • विधवा प्रमाणपत्र: विधवा उमेदवार असल्यास सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • अनाथ प्रमाणपत्र: शासकीय किंवा अनुदानित संस्थेत दाखल असलेल्या अनाथ उमेदवारांसाठी सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र जोडणे गरजेचे आहे.
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे: उमेदवाराने अर्जासोबत शिक्षणाची प्रमाणपत्रे आणि गुणपत्रके स्वतः साक्षांकित (Self Attested) करणे बंधनकारक आहे.
  • शैक्षणिक पात्रता (अत्यंत महत्त्वाचे): अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस पदासाठी किमान पात्रता 12 वी उत्तीर्ण (HSC) आवश्यक आहे. त्यासाठी 12 वीचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रक यांची सत्यप्रति जोडणे बंधनकारक आहे. पदवी
  • किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतले असल्यास त्याचेही गुणपत्रक जोडणे आवश्यक आहे.
  • डी.एड./बी.एड. प्रमाणपत्र: उमेदवाराकडे डी.एड. किंवा बी.एड. डिप्लोमा असल्यास त्याचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रक अर्जासोबत जोडावे.
  • विधवा आणि अनाथ उमेदवारांसाठी विशेष प्रमाणपत्र: या प्रवर्गातील उमेदवारांनी सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
  • MS-CIT प्रमाणपत्र: उमेदवाराने MS-CIT किंवा तत्सम संगणक कोर्स पूर्ण केला असल्यास त्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
  • अनुभव प्रमाणपत्र: उमेदवाराने अंगणवाडी सेविका, मदतनीस किंवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून किमान 2 वर्षांचा अनुभव घेतला असल्यास त्याचे प्रमाणपत्र जोडणे गरजेचे आहे.
  • आधार कार्ड: ओळख पटवण्यासाठी आधार कार्डची प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

महत्त्वाचे अपडेट्स: सरकारी नोकरीच्या संधी
महाराष्ट्रातील बेरोजगार उमेदवारांसाठी महिला व बालविकास विभागात मोठी संधी उपलब्ध झाली आहे. तब्बल 18,882 पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी संपूर्ण कागदपत्रांसह अर्ज करणे आवश्यक आहे. योग्य कागदपत्रे आणि आवश्यक अर्हतांची पूर्तता केल्यानंतरच अर्ज मंजूर केला जाईल. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी भरती प्रक्रियेची अधिकृत जाहिरात आणि नियम वाचूनच अर्ज करावा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड