साडेसहा हजार अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरणार

Anganwadi Sevika Bharti 2020

अंगणवाडी सेविकांच्या रिक्त पदांवर होणार भरती

Anganwadi Sevak Bharti : The State Government has given approval to fill the vacant posts of Anganwadi Servants, Helpers, Mini Anganwadi Sevakis. District Nirmala Pansare, president of the Zila Parishad and Pooja Parge, chairperson of the Women and Child Welfare Committee, have been ordered to fill the vacant 585 posts in Anganwadi center in the district.

८वी पास उमेदवारांना संधी – PCMC अंगणवाडी स्वयंसेविका भरती (नवीन अपडेट : २१ मे २०२० )-येथे क्लिक करा

 

 

 अपडेट : २३ मार्च २०२० : सिंधुदुर्ग अंगणवाडी सेविका भरती लवकरच सुरु होण्याचे संकेत आहे, या संदर्भातील बातमी खाली दिलेली आहे.

Anganwadi Sevika Bharti 2020 Updates

Sindhudurg Anganwadi Sevaika Bharti 2020 details & updates are given below. The candidates are requested to keep visiting MahaBharti For more updates & details. 

पुणे -अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांची रिक्‍त पदे भरण्यास राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रातील रिक्‍त 585 पदे भरण्यासाठी तालुकास्तरावर भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पूजा पारगे यांनी दिली.

राज्य सरकारने 2017 पासून अंगणवाड्यांमधील पद भरती करण्यास स्थगिती दिली होती. एकात्मिक बालविकास सेवा योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी राज्य सरकारकडून स्थगिती उठवली आहे. राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या एकूण रिक्‍त पदांपैकी 50 टक्‍के पदे भरण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यांतर्गत जास्तीत जास्त मुलांची संख्या असणारी अंगणवाडी केंद्र, आदिवासी क्षेत्रातील कुपोषणाची तीव्र समस्या असलेली क्षेत्र, डोंगराळ भाग, तालुक्‍याच्या ठिकाणापासून दुर्गम भागात असेलेली अंगणवाडी केंद्रांचा प्राधान्याने विचार करून पदभरती करण्यात येणार आहे.

सौर्स : प्रभात

राज्यभरात रिक्त असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या सहा हजार ५०० रिक्त जागा भरण्यास मंजुरी देतानाच, भाडेतत्वावर सुरू असलेल्या अंगणवाडी केंद्राच्या इमारतींच्या भाड्यात ग्रामीण भागासाठी चार हजार रुपये तर शहरभागासाठी सहा हजार रूपये मासिक भाडेवाढ करण्याचा निर्णय महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस राजेश सिंग यांनी शनिवारी दिली.
अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांच्या राज्यभर रिक्त जागा आहेत. त्या त्वरित भरण्याची मागणी काही वर्षांपासून प्रलंबित होती. त्यावर लक्ष केंद्रीत करून या साडेसहा हजार जागा भरण्याचे आदेश ठाकूर यांनी विभागाच्या आढावा बैठकीत प्रशासनास दिले. याशिवाय अंगणवाडी केंद्राच्या तुटपुंज्या भाड्यामध्ये वाढ करण्याचाही निर्णय घेण्यात आला.

एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस पदे भरण्यावर तीन वर्षांपासून निर्बंध लावण्यात आले होते. आता हे निर्बंधही हटवण्यात आले आहेत. त्यामुळे सेविका व मदतनीसच्या साडेसहा हजार जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मान्यता दिलेल्या परंतु कार्यान्वित न झालेले ९८ अंगणवाडी केंद्र व ७४५ मिनी अंगणवाडी केंद्र आवश्यकतेप्रमाणे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. राज्यभर रिक्त असलेल्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या रिक्त ४५ जागा भरण्याचे आदेशही ठाकूर यांनी यावेळी जारी केल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स

मासिक भाड्यातही वाढ
राज्यभरात ३७ हजार ५४५ अंगणवाडी केंद्र भाड्याच्या इमारतीत सुरू आहेत. या इमारतीच्या भाड्यापोटी अत्यल्प रक्कम दिली जाते. आढावा बैठकीत त्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ग्रामीण व आदिवासी भागातील केंद्रासाठी याआधी ७५० रूपये मासिक भाडे दिले जात असे. यापुढे त्यासाठी एक हजार रूपये निश्चित केले आहेत. शहरी भागातील केंद्रासाठी ७५० रूपये भाडे होते. ते आता चार हजार रूपये करण्यात आले. महानगरामधील अंगणवाडी केंद्राचे भाडे ७५० रूपयांवरून सहा हजार रूपये करण्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

17 Comments
 1. Pratibha sathe says

  Anmarad ahet ka job la

 2. Mayuri says

  Hi anganwadi sevika Ani midc assistance chi exam(junya satkar ne bharun ghetalelya form vr) kadhi honar ahe??

 3. Shreya says

  Ahmednagar anganwadi sevika bharti kevha suru hoil please mala kalva

 4. Ajay Mane says

  Bharti che form online fill kryche aahet ka? aani bharti process ky asel? Salary?

 5. Sanjana deshmukh says

  Ahmednager sathi aganwadi vacancy ah ka

 6. Chavan says

  Agodar madatnis aahe pan promotion hoil ka exam dyavi lagel ka

 7. Chavan says

  Promotion hoil ka

 8. SUCHITA Pagare says

  Nashik madhe aahe ka angvadi bharti?

 9. S pawar says

  ऑनलाईन अंगणवाडी फॉर्म केंव्हा निघणार आहेत Maharashtra madhe. In Year 2020

 10. Kailash tekam says

  Yavatmal anganvadi sevinkachi fix date sanga sir

 11. Pravin sahebrao Savale says

  Nandurbar stage aanganvade bharte aahe ka Kevan passing procijar chalu hoel

 12. Harshada says

  Aurangabad mdhe kdhi bharti nighnar aahe
  12th pass base vr aahe ka aanganwadi bharti

 13. Sushama Hatekar says

  माझे शिक्षण इयत्ता दहावी पर्यंत झाले आहे तरी मला अंगणवाडी सेविका किंवा हेल्पर म्हणून मुंबई मध्ये जाॅब मिळण्याबाबत मी आपल्या उत्तरराची वाट पाहते माझा मोबाईल नंबर ९७०२८९१३६२. धन्यवाद

 14. Pranali Kale says

  माझे शिक्षण इयत्ता बारावी उत्तीर्ण झाले आहे तरी मला अंगणवाडी कर्मचारी म्हणून नेमणूक करण्यात यावी ही विनंती माझा मोबाईल नंबर ८६५२८१२८५८

 15. Lalita Thorat says

  माझे शिक्षण इयत्ता बारावी झाले आहे तरी मला अंगणवाडी कर्मचारी म्हणून मुंबई मध्ये नेमणूक करण्यात यावी ही विनंती आहे. धन्यवाद.
  माझा मोबाईल नंबर. ९७६८५०९३५६

 16. Seema Gulab Shinde says

  माझे शिक्षण इयत्ता T. Y.B. COM झाले असून माझ्या घरामध्ये कोणीही कमवते नाही. सध्या महागाईच्या परिस्थतीमध्ये उदरनिर्वाह करणे फार कठीण झाले असून जे मिळेल ते काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत असतो. अंगणवाडी मध्ये कोणतेही कुठेही अंगणवाडी कर्मचारी/ अंगणवाडी मदतनीस म्हणून नेमणूक करण्यात यावी हीच कळकळीची विनंती. धन्यवाद. माझा मोबाईल नंबर. ८४२४९८०८३१

 17. लता जालिंदर बनकर says

  माझे शिक्षण दहावी पास झाले असून मला आई वडील नाहीत म्हणून मला कामाची खुप गरज आहे म्हणून मला अंगणवाडी मदतनीस म्हणून घ्या मी विनंती करते

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड