आंध्रात महाभरती : दिवसात सव्वा लाख जणांना सरकारी नोकरी
आंध्रप्रदेश सरकारने देशात एक नवा इतिहास घडवला आहे. त्यांनी सोमवारी एकाच दिवसात राज्यातील तब्बल 1 लाख 26 हजार युवकांना सरकारी नोकरीची नियुक्ती पत्रे दिली आहेत. या संबंधात मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी म्हटले आहे की आजचा दिवस हा देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंदवून ठेवावा लागेल. एकाच नोकर भरतीत इतक्या मोठ्या लोकांना सरकारी नोकरी दिली गेल्याची नोंद देशाच्या इतिहासात होईल. गेले दोन महिने यासाठीची प्रक्रिया राबवली गेली. ती विक्रमी वेळेत पुर्ण करून एकाच दिवसात ही अपॉईन्टमेंट लेटर्स जारी केली गेली आहेत.
राज्य सरकारने पाचशे
सार्वजनिक सेवांसाठी नोकर भरतीची प्रक्रिया सुरू केली. त्याला 21 लाख लोकांनी प्रतिसाद दिला. त्यांच्यासाठी 1 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर या कालावधीत लेखी परिक्षा घेण्यात आली. त्या परिक्षेला 19 लाख 50 हजार उमेदवार बसले होते. त्यातील 1 लाख 98 हजार 164 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन नोकरीला पात्र ठरले. त्यातील 1 लाख 26 हजार 278 जणांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. सोमवारी विजयवाडा येथे आयोजित कार्यक्रमात उमेदवारांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्याचा प्रारंभ करण्यात आला. ते म्हणाले की आता कर्मचारी संख्या वाढल्यामुळे राज्यातील गाव आणि वॉर्ड पातळीवरील सचिवालये पुर्ण क्षमतेने कार्यरत ठेवण्यात येणार असून त्यातून लोकांना सेवा दिली जाणार आहे. येत्या डिसेंबर पासून ही प्रक्रिया पुर्ण होऊन कार्यान्वित होईल असे ते म्हणाले.
प्रत्येक गावातील सचिवालयात 10 ते 12 कर्मचारी नियुक्त केले जाणार असून त्यांच्या मार्फत पंचायत राज, ग्रामविकास, महसुल, वैद्यकीय सुविधा, आरोग्य, पशुपालन, उर्जा, कृषी आणि समाजकल्याण विभागाच्या सर्व सेवा नागरीकांना पुरवल्या जाणार आहेत. प्रत्येक सचिवालयात महिला पोलिस आणि महिला कल्याण सहायकही नेमल्या जाणार आहेत. त्याद्वारे राज्यातील महिलांना त्यांच्या गरजेच्या सेवा पुरवल्या जाणार आहेत. गाव व वार्ड पातळीवरील या सचिवालयांमधून सुमारे पाचशे सरकारी सेवा दिल्या जाणार आहेत. राज्य सरकारने त्यासाठी 2 लाख 80 हजार गाव व वॉर्ड व्हालिंटीयर्स नेमले आहेत. या प्रक्रियेत ज्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत त्यांनी त्याकडे केवळ रोजगाराची संधी म्हणून न पहाता सेवाव्रती म्हणून काम करावे असे आवाहनही त्यांनी केले. या सिस्टीमची पारदर्शकता नियमीतपणे तपासली जाईल आणि त्याचे सोशल ऑडिटही केले जाईल असेहीं मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. या सिस्टीममधून 11158 ग्राम सचिवालये, आणि 3786 वॉर्ड सचिवालये नेमली जाणार आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App