ऑनलाइन शिक्षणाचे व्यासपीठ होणार आता सहजपणे उपलब्ध!!!
An online learning platform will now be readily available
An online learning platform will now be readily available : कोरोनाकाळात आॅनलाईन शिक्षणाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले असून आता त्याच्या प्रसारासाठी बीएसएनएल स्वत: मैदानात उतरले आहे. यासाठी बीएसएनएलने आयआयटी बॉम्बेची मदत घेतली आहे. बीएसएनएलने शुक्रवारी ड्रोन शिक्षण (ड्रोन एज्युकेशन) या उपक्रमासाठी पुढाकार घेतला असून त्याची घोषणा केली आहे. देशातील आणि राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला आॅनलाईन शिक्षणाचे व्यासपीठ सहज उपलब्ध व्हावे हा या उपक्रमामागील मूळ उद्देश असल्याचे बीएसएनएलकडून स्पष्ट करण्यात आले.
बीएसएनएलने या उपक्रमासाठी आयआयटी बॉम्बे आणि यप मास्टर्स याना भागीदारीसाठी निवडले आहे. तंत्रज्ञानातील साक्षरता, आरोग्य, पौष्टिक अन्न, विविध विषयांवरील सामान्य जनजागृती अशा विषयांवरील मजकूर आयआयटी बॉम्बेच्या स्पोकन टयुटोरिअलमधून उपलब्ध होऊ शकणार आहे. देशाच्या घटकांपर्यंत पोहचण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध नव्हते, ते आम्हाला बीएसएनएलच्या माध्यमातून उपलब्ध झाले असल्याची प्रतिक्रिया प्राध्यापिका कनन यांनी दिली.
शिक्षक, विद्यार्थी, शैक्षणिक संस्था यांच्याकडून विविध आॅनलाईन लर्निंग प्लँटफॉर्म्सचा मोठया प्रमाणावर वापर होत आहे. प्लॅटफॉर्म्सपैकीच यप मास्टर्स एक आहे. या माध्यमातून, आॅनलाईन टेस्ट आणि त्यांची उत्तरे, शंका निरसनासाठी शिक्षकांसोबत लाईव्ह सेशन अशा सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती यप एज्युकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय रेड्डी यांनी दिली.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
बीएसएनएल सध्यस्थितीत विविध तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या ग्राहकांसाठी नवीन उपक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न करत आहे. फायबर ब्रॉडबँड सेगमेंटमधून आम्ही खूप स्पर्धात्मक उपकरणे आणि नियोजन बाजारात आणले आहे ज्याचा डिजिटल उपयोग ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर होत आहे.
सोर्स : लोकमत