Amravati Medical College recruitment 2024 – सध्या महाराष्ट्र राज्यातील विविध रुग्णालये आणि वैद्यकिय महाविद्यालयांमध्ये अनेक पदे रिक्त असल्याने राज्यातील सर्वसामान्य रुग्णांना आणि गरीब जनतेला त्रास होत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये हेच चित्र असल्याचे समजते. त्यात अमरावती जिल्ह्यातील विशेषतः मेळघाटातील आरोग्य सेवा कोलमडली असून बालमृत्यू आणि मातामृत्यू होत असल्याने शासकीय रुग्णालयांतील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी आक्रमक मागणी आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान केली. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विधानसभेत राज्यातील विविध रुग्णालयांत असलेल्या रिक्त पदांबाबत चर्चा उपस्थित करण्यात आली.
विधानसभेत या विषयावर बोलताना आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी सरकारला धारेवर धरले. या सरकारचा कार्यकाळ संपत आला असतानाही अद्याप सरकारने रुग्णालयांमधील रिक्त पदे भरली नसल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी बोलताना ॲड. ठाकूर म्हणाल्या की, अमरावती जिल्ह्यातील नवजात शिशू यांच्याबाबत मोठा प्रश्न आहे. मेळघाटातील असलेल्या शासकीय रुग्णालयांतील रिक्त पदांमुळे मातामृत्यू आणि बालमृत्यूचे प्रमाण वाढते आहे. नवजात शिशूंबाबत कोणत्याही सोयीसुविधा नाहीत याकडे शासनाने लक्ष द्यावे. सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात आले मात्र तेथे २२ पदे ऱिक्त आहेत (Super Speciality hospital Amravati vacancy). दंतचिकित्सा महाविद्यालयातील अनेक पदे रिक्त आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील तसेच इरविन रुग्णालयातील अनेक पदे रिक्त आहेत. अंमली पदार्थ, नवजात शिशू, कर्करोग, यासारख्या रोगांबाबत चर्चा केली जाते. मात्र, पदे भरली जात नाहीत. आता आचारसंहिता लागू व्हायची वेळ आली मात्र सरकार पदेभरत नाही, तातडीने ही पदे भरावीत अशी मागणी यावेळी ॲड.ठाकूर यांनी केली.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















