अ‍ॅमेझॉन करणार ५० हजार जणांची भरती !

Amazon Mega Recruitment 2020


Amazon Mega Recruitment 2020 – भारतामधील अनेक ऑनलाइन सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात कपात केलेली असतानाच आनंदाची बातमी म्हणजे आता ॲमेझॉनने नव्याने कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने ग्रीनबरोबर ऑरेंज आणि रेड झोनमध्येही डिलेव्हरी देण्याची परवानगी ई-कॉमर्स कंपन्यांना दिली आहे. केवळ कंटेंटमेंट झोनमध्ये डिलेव्हरी करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. लॉकडाउनच्या काळामध्ये घरपोच डिलेव्हरीची मागणी वाढल्याने कंपनीने कंत्राटी कामगारांची आवश्यकता असल्याचे म्हटलं आहे. ऑनलाइन माध्यमातून मोठ्याप्रमाणात खरेदी होत असून या गोष्टींची डिलेव्हरी करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कामगार भरती केली जाणार असल्याचे कंपनीने शुक्रवारी (२२ मे २०२०) स्पष्ट केलं. यासंदर्भातील वृत्त PTI या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

AMAZON च्या कस्टमर फुलफीलमेंट सेंटर ऑप्रेशन्स विभागाचे उपाध्यक्ष असलेल्या अखिल सक्सेना यांनी, “कंपनीने फुलफीलमेंट सेंटर आणि डिलेव्हरीसंदर्भातील कामांसाठी ५० हजार नोकऱ्यांची भरती काढली आहे. हे सर्व कामगार कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहेत. या माध्यमातून लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. कंपनीकडून चांगल्या पद्धतीचे वर्तवणूक दिली जाईल,” असं स्पष्ट केलं आहे. स्थलांतरित मजुरांनी लॉकडाउननंतर आपल्या राज्यात जाण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा फटका ई-कॉमर्स कंपन्यांच्या पुरवठा साखळीला बसला आहे. त्यामुळेच पुरवठ्यासंदर्भातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांमध्येच स्पर्धा सुरु झाली आहे.

या वाढत्या बेरोजगारीला पाहून अमेझॉनने नवीन कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी प्रतितास वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. रॉयटर्सने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, लॉकडाउनमुळे अमेरिकेत सर्वजण घरातच आहेत त्यामुळे ऑलनाइन ऑर्डर वाढल्या आहेत. अनेक दिवसांपासून क्वारंटाइन असल्यामुळे किराणा दुकानेही खाली होत चालली आहेत. त्यामुळे कंपीन खाद्यपदार्थांसह आरोग्याशी निगडीत सामना लोकांपर्यंत पोहचवण्याचा विचार कंपनी करत आहे.12 Comments
 1. Sunil v kerekar says

  Till I am at home last Six months I need a job

 2. Prashant Dinkarrao Barde says

  या भरती ची तारीख वैगरे कधी निघणार आहे…?

  1. MahaBharti says

   पुढील अपडेट लवकरच प्रकाशित करू..

 3. Pravin Yashwantro Mendhe says

  I’m interested in delivery o

 4. Ajay Pawar says

  ही भरती केव्हा आणि कधी निघणार आहे?

 5. Nita haridas dahiwale says

  Mla job. Chi aavsakta ah pnmlAmozon madhye kont job. Midnar mi ask nurse ah

 6. Harshal says

  I am interested delivery

 7. Bhavesh Mahendra vyas says

  Amazon bharti date kadhi nighnr ahe

 8. Vishal nagare says

  Date kadhi nignar Ashe
  ?

 9. Sambhaji says

  I am enterested delivery

 10. VISHAl wankhede says

  हि भरती प्रक्रिया केव्हा सुरू होणर आहे

 11. Mukesh Holkar says

  I am interested, but just pls

Leave A Reply

Your email address will not be published.