ऍमेझॉन इंडिया मध्ये २० हजार उमेदवारांची भरती !
Amazon Mega Recruitment 2020
Amazon Mega Recruitment 2020 – दिग्गज ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक असलेल्या ऍमेझॉन इंडिया कंपनीने रविवारी सांगितले की, कंपनीकडून भारत आणि इतर देशांमध्ये ग्राहकांच्या मदतीसाठी ग्राहक सेवा विभागात अॅमेझॉन 20 हजार लोकांना तात्पुरत्या स्वरुपात रोजगार देणार आहे. भारत आणि जगभरातील इतर ग्राहकांनी कोणत्याही व्यत्ययाविना सेवा देता यावी म्हणून ऍमेझॉन नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार आहे.
कोणत्या शहरात उपलब्ध होणार संधी?
कंपन्यांनी सांगितल्यानुसार, कर्मचाऱ्यांच्या करण्यात येणाऱ्या नियुक्त्या ग्राहकांची वाढती मागणी पुर्ण करण्यासाठी करण्यात येणार आहेत. कंपनीचा असा अंदाज आहे की, पुढिल सहा महिन्यांत साईटवरील ग्राहकांची रहदारी वाढणार आहे, त्यासाठी आधीच तायारी करण्यात येणार आहे. पुढिल सहा महिन्यांच्या कालावधीत देशभराती काही शहरांमध्ये नव्या कामगाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. हैदराबाद, पुणे, कोईम्बटूर, नोएडा, जयपूर, कोलकाता, चंदिगढ, मंगलुरु, इंदोर, भोपाळ आणि लखनऊ या शहरांमध्ये अॅमेझॉन नव्या कामगारांना रोजगार देणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
शैक्षणिक पात्रता काय ?
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 20 हजार पदांपैकी अनेक पं अॅमेझॉनच्या ‘वर्चुअल ग्राहक सेवा’ कार्यक्रमाचा हिस्सा असतील. यामुळे कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची सुविधाही देण्यात येणार आहे. या पदांसाठी किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास आहे. तसेच अर्जदाराला हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगु आणि कन्नड यांसारख्या भाषांचे ज्ञान असणं आवश्यक आहे. या व्यक्ती ईमेल, सोशल मीडिया किंवा फोनद्वारे ग्राहकांना मदत करणार आहेत.
भारतामधील अनेक ऑनलाइन सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात कपात केलेली असतानाच आनंदाची बातमी म्हणजे आता ॲमेझॉनने नव्याने कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने ग्रीनबरोबर ऑरेंज आणि रेड झोनमध्येही डिलेव्हरी देण्याची परवानगी ई-कॉमर्स कंपन्यांना दिली आहे. केवळ कंटेंटमेंट झोनमध्ये डिलेव्हरी करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. लॉकडाउनच्या काळामध्ये घरपोच डिलेव्हरीची मागणी वाढल्याने कंपनीने कंत्राटी कामगारांची आवश्यकता असल्याचे म्हटलं आहे. ऑनलाइन माध्यमातून मोठ्याप्रमाणात खरेदी होत असून या गोष्टींची डिलेव्हरी करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कामगार भरती केली जाणार असल्याचे कंपनीने शुक्रवारी (२२ मे २०२०) स्पष्ट केलं. यासंदर्भातील वृत्त PTI या वृत्तसंस्थेने दिलं आहे.
AMAZON च्या कस्टमर फुलफीलमेंट सेंटर ऑप्रेशन्स विभागाचे उपाध्यक्ष असलेल्या अखिल सक्सेना यांनी, “कंपनीने फुलफीलमेंट सेंटर आणि डिलेव्हरीसंदर्भातील कामांसाठी ५० हजार नोकऱ्यांची भरती काढली आहे. हे सर्व कामगार कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहेत. या माध्यमातून लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. कंपनीकडून चांगल्या पद्धतीचे वर्तवणूक दिली जाईल,” असं स्पष्ट केलं आहे. स्थलांतरित मजुरांनी लॉकडाउननंतर आपल्या राज्यात जाण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा फटका ई-कॉमर्स कंपन्यांच्या पुरवठा साखळीला बसला आहे. त्यामुळेच पुरवठ्यासंदर्भातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांमध्येच स्पर्धा सुरु झाली आहे.
या वाढत्या बेरोजगारीला पाहून अमेझॉनने नवीन कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी प्रतितास वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. रॉयटर्सने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, लॉकडाउनमुळे अमेरिकेत सर्वजण घरातच आहेत त्यामुळे ऑलनाइन ऑर्डर वाढल्या आहेत. अनेक दिवसांपासून क्वारंटाइन असल्यामुळे किराणा दुकानेही खाली होत चालली आहेत. त्यामुळे कंपीन खाद्यपदार्थांसह आरोग्याशी निगडीत सामना लोकांपर्यंत पोहचवण्याचा विचार कंपनी करत आहे.
Table of Contents
AT shivapur post pipparkhed Tal chalisgoan dist Jalgaon Maharashtra India