अलिबाग वैद्यकीय महाविद्यालयासाठी पदे मंजूर – 510 पदे
Alibag Govt Medical College Recruitment
Alibag Govt Medical College Recruitment : Admission of 100 students for the first year in the Government Medical College at Alibag will start from the academic year 2021-22. The government has approved to fill 510 posts in the government medical college starting from Raigad Alibag.
रायगड अलिबाग येथे सुरु होणाऱ्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात 510 पदे भरण्यास सरकारने मान्यता दिली, असल्याची माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
अलिबाग येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाकरिता 100 विद्यार्थ्यांचे प्रवेश शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून सुरू होणार आहे. तेथील अध्यापकांची पदे तातडीने भरणे आवश्यक होते. त्यानुषंगाने संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांनी 29 मे 2021 च्या पत्रान्वये शिफारस केली होती. त्यानुसार एकूण 44 अध्यापकांची सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग येथे प्रतिनियुक्तीने पदस्थापना करण्याचे आदेश जारी केले आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे सरकारी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी एकूण 4 टप्यात गट अ ते गट-क मधील नियमित 185 पदे, विद्यार्थी पदे 121, त्याचप्रमाणे गट-क काल्पनिक पदे 139 (बाह्यस्रोताने) व गट-ड काल्पनिक पदे 65 (बाह्यस्त्रोताने) अशी एकूण 510 पदे निर्माण करण्यास शासन निर्णय 29 जानेवारी 2021 अन्वये मान्यता देण्यात आली होती. सरकारच्या या निर्णयामुळे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यातील महत्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.
Alibag Govt Medical College Vacancies
Alibag Govt Medical College Recruitment : अलिबाग – शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरिता ५१० पदांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी गट – अ ते गट – क मधील नियमित १८५ पदे व विद्यार्थी पदे १२१ त्याचप्रमाणे गट-क ( बाह्यस्रोताने ) १३९ पदे व गट- ड ( बाह्यस्रोताने ) ६५ पदे अशी एकूण ५१० व ४ टप्प्यात निर्माण करण्यास नुकतीच राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाने मान्यता दिली आहे.
महाभरती पोलीस टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे !
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
मंजूर झालेल्या ५१० पदांमध्ये गट – अ मध्ये एक अधिष्ठाता, २१ प्राध्यापक, २२ सहयोगी प्राध्यापक, एक मुख्य शासकीय अधिकारी अशा ४५ पदांचा समावेश आहे . गट – ब मध्ये ४६ सहायक प8Dराध्यापक व एक प्रशाE0कीय अधिकारी अशा ४७ पदांचा समावेश आहे. गट- क मध्ये एक ग्रंथपाल, एक सांख्यिकी सहायक, दोन कार्यालयीन अधीक्षक, नऊ लघुलेखक, चार वैद्यकीय समाजसेवक, १५ वरिष्ठ सहायक, एक रोखपाल, ९ प्रयोगशाळा वाहतूक तंत्रज्ञ, २ सहायक ग्रंथपाल, १३ वरिष्ठ लिपिक, एक लघुटंकलेखक, दोन भांडारपाल, ३१ कनिष्ठ लिपिक, एक ग्रंथसूचीकार फोटो एक प्रक्षेपक अशा एकूण ९३ पदांचा समावेश असून, बाह्यस्रोताने हिसकावून भरती होणारी वर्ग -३ ची एकूण १३९ तर वर्ग -४ ची एकूण ६५ पदे मंजूर करण्यात आली आहेत.
विद्यार्थी पदे एकूण १२१ असून, त्यामध्ये चिकित्सालयीन पाम्यनिदेशक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, निवासी या पदांचा समावेश आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ टप्प्यातील पदे टप्पानिहाय मंजूर होणार असून, प्रथम वर्षाबाबतची पदे तत्काळ निर्माण होतील व उर्वरित द्वितीय, तृतीय व चतुर्थ टप्प्यातील पदे संबंधित वर्षी निर्माण होतील.
अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरिता भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकानुसार वर्षनिहाय, आवश्यक पदनामनिहाय पदनिर्मिती आवश्यक असल्यामुळे संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांनी सादर केल्यानुसार अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरिता निर्माण करावयाच्या पदांच्या पदनामनिहाय पदनिर्मितीस मान्यता देण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे होता, त्याचा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून त्यास शासनाची मंजुरी प्राप्त करून घेण्यात यश मिळविले आहे.
अलिबागमध्ये कॉलेज
अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या इमारतीची प्रशासकीय मान्यता प्राप्त होताच इमारतीचे प्रत्यक्ष बांधकाम त्वरित सुरू करण्यात येऊन जून २०२१ मध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचे शैक्षणिक वर्ष आरसीएफ वसाहतीमधील घेण्यात आलेल्या इमारती व रायगड जिल्हा रुग्णालय यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष सुरू होईल. नव्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होताच नव्या इमारतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल.
सोर्स : लोकमत
Table of Contents
How to apply this job
How to apply this job
Can pharmacist any job vacancy in government