AISSEE 2026 Entrance Examination Schedule
देशातील नामांकित सैनिक स्कूल्समध्ये शिक्षण घेण्याची संधी शोधणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शैक्षणिक वर्ष २०२७-२८ मध्ये इयत्ता सहावी आणि नववीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा २०२७ चे वेळापत्रक राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) यांनी जाहीर केले आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील सैनिक स्कूल्स सोसायटीच्या वतीने ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी सध्या पाचवीत, तर नववीच्या प्रवेशासाठी आठवीत शिकणारे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र ठरणार आहेत.
सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अर्जापासून ते परीक्षेपर्यंतचे महत्त्वाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा २०२७ साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ३ नोव्हेंबरपासून सुरू झाली असून, इच्छुक विद्यार्थ्यांना २ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. ही परीक्षा ३१ जानेवारी २०२७ रोजी देशभरात घेतली जाणार आहे. परीक्षेचे स्वरूप बहुपर्यायी प्रश्नांचे असून, पेन-पेपर पद्धतीने ओएमआर उत्तरपत्रिकेवर परीक्षा होईल. इयत्ता सहावीसाठी परीक्षेचा कालावधी १५० मिनिटे असून, ही परीक्षा १३ भाषांमध्ये देता येणार आहे. तर इयत्ता नववीसाठी १८० मिनिटांचा कालावधी असून, परीक्षा इंग्रजी माध्यमातून घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी कोणते शहर मिळाले आहे, याची माहिती ११ जानेवारी रोजी जाहीर होईल, तर प्रवेशपत्र २५ जानेवारीपासून उपलब्ध करून दिले जाणार आहे.
सैनिक शाळांमधील शिक्षण हे केवळ शैक्षणिक प्रगतीपुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण आणि देशसेवेची भावना रुजविणारे ठरते. विशेषतः संरक्षण दलांमध्ये अधिकारी म्हणून करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सैनिक शाळा ही एक उत्तम संधी आहे. या शाळांमधील शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता, आत्मविश्वास, नेतृत्वकौशल्य आणि राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव विकसित होण्यास मदत होते. सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया, माहितीपत्रक आणि इतर आवश्यक तपशील राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (एनटीए) संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. दरम्यान, यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये प्रवेश परीक्षेसंदर्भात विशेष मार्गदर्शन कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून पालकांना आपल्या पाल्याची पात्रता, प्रवेशाचे निकष आणि अभ्यासक्रम याबाबत सविस्तर माहिती घेता येणार आहे. अधिक माहितीसाठी शाळेशी संपर्क साधावा, असे आवाहन शाळा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















