ऑल इंडिया लॉ प्रवेश परीक्षा AILET प्रवेशपत्र ‘या’ दिवशी होणार प्रसिद्ध!
AILET Admit Card 2024
AILET Admit Card 2024
AILET Admit Card 2024: नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (NLU), दिल्लीकडून ऑल इंडिया लॉ एंट्रन्स टेस्ट (AILET) 2025 च्या प्रवेशपत्रासाठी तारीख निश्चित करण्यात आली आहे. AILET 2025 परीक्षेचे प्रवेशपत्र 28 नोव्हेंबर 2024 रोजी अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाणार आहे. उमेदवारांना प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी त्यांचे नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख वापरावी लागेल. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरती अधिकृत व्हॉट्सअँप चॅनल या लिंक वरून लगेच जॉईन करा.
AILET 2025 परीक्षा 8 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 2:00 ते 4:00 या वेळेत होईल. ही परीक्षा पाच वर्षांच्या B.A. LLB (Hons.), LL.M., आणि पीएचडी प्रोग्रामसाठी घेतली जाईल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी प्रक्रिया:
- NLU दिल्लीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: nludelhi.ac.in.
- AILET प्रवेश प्रक्रिया सेक्शनवर क्लिक करा.
- तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड प्रविष्ट करा.
- लॉगिन केल्यानंतर प्रवेशपत्र डाऊनलोड करा आणि प्रिंट काढा.
परीक्षा केंद्र:
परीक्षा भारतभर विविध शहरांमध्ये घेतली जाईल. परंतु, एखाद्या शहरात 100 पेक्षा कमी उमेदवार असल्यास, त्यांना दुसऱ्या प्राधान्य शहरात केंद्र दिले जाईल.
नोंदणी शुल्क:
- सामान्य श्रेणीसाठी: ₹3,500
- SC/ST/PwD साठी: ₹1,500
- BPL प्रवर्गातील SC/ST उमेदवारांना शुल्कातून सवलत दिली आहे.
अधिक माहितीसाठी, कृपया AILET 2025 अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
AILET 2025 परीक्षा केंद्रे:
ही परीक्षा खालील शहरांमध्ये आयोजित केली जाईल:
- महाराष्ट्र: मुंबई, नागपूर, पुणे
- कर्नाटक: बेंगळुरू
- छत्तीसगड: बिलासपूर, रायपूर
- मध्य प्रदेश: भोपाळ, जबलपूर
- उत्तर भारत: चंदीगड, डेहराडून, दिल्ली, जम्मू
- राजस्थान: जयपूर, जोधपूर, कोटा
- उत्तर प्रदेश: गाझियाबाद, ग्रेटर नोएडा, गुरुग्राम, कानपूर, लखनौ, वाराणसी
- पूर्व भारत: पाटणा, रांची, कोलकाता, सिलीगुडी
- दक्षिण भारत: चेन्नई, कोचीन, तिरुवनंतपुरम
- इतर: गांधीनगर, हैदराबाद, विशाखापट्टणम, शिमला
AILET 2020 Postponed : नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीची ऑल इंडिया लॉ प्रवेश परीक्षा लांबणीवर पडली आहे…
AILET 2020 Postponed: नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (NLU) दिल्लीने AILET 2020 एन्ट्रन्स एक्झाम स्थगित केली आहे. ऑल इंडिया लॉ एन्ट्रन्स टेस्ट १८ ऑगस्ट रोजी होणार होती. CLAT 2020 परीक्षा देखील स्थगित करण्यात आली आहे. त्यामागोमाग ही लॉ ची दुसरी प्रवेश परीक्षाही लांबणीवर पडली. अधिकृत माहितीनुसार, परीक्षेआधी दहा दिवस नोटीस जारी करून परीक्षेच्या तारखेची घोषणा करण्यात येईल.
नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी दिल्लीने नोटिफिकेशनमध्ये लिहिलंय, ‘AILET 2020 च्या सर्व उमेदवारांना असं सूचित केलं जातं की कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. सुधारित वेळापत्रक लवकरच जारी केलं जाईल.’
AILET 2020 साठी ऑनलाइन अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख १० ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. उमेदवारांना आवाहन करण्यात आलं आहे की AILET 2020 शी संबंधित ताज्या माहितीसाठी युनिव्हर्सिटीचे संकेतस्थळ पाहात राहा.
CLAT 2020 परीक्षाही स्थगित
कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट (Common Law Admission Test, CLAT 2020) पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. कंसोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, बंगळुरूने २२ ऑगस्ट २०२० रोजी होणारी परीक्षा तूर्त तरी स्थगित केली आहे. यापूर्वी ही परीक्षा १० मे रोजी होणार होती. तेव्हाही ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. कोविड – १९ महामारी संक्रमण स्थिती सामान्य होत नसल्याने परीक्षा पुढे ढकलावी लागली आहे.
कंसोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीने यासंदर्भात एक नोटिफिकेशन जारी केलं आहे. यात असं म्हटलं आहे की परीक्षेच्या नव्या तारखांची घोषणा १ सप्टेंबर रोजी केली जाईल. विद्यार्थी consortiumofnlus.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर नवं वेळापत्रक १ सप्टेंबर नंतर पाहू शकतील.
सोर्स : म. टा.
Table of Contents