एम्स पीजी 2020 परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर
AIIMS PG Final result 2020
AIIMS PG Final Result 2020: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (AIIMS) पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी आयोजित केलेल्या प्रवेश प्रक्रियेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे ते आपला निकाल aiimsexams.org वर पाहू शकतात. या परीक्षेद्वारे डीएम / सीएच आणि एमडी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा झाली होती.
सीबीटी निकालांची घोषणा २० नोव्हेंबर रोजी केली गेली होती आणि नंतर शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांसाठी दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेचे आयोजन २ डिसेंबर ते ४ डिसेंबर २०२० या कालावधीत करण्यात आले होते. या परीक्षेला डिपार्टमेंटल, क्लिनिकल, प्रॅक्टिकल किंवा लॅब बेस्ड असेसमेंट म्हणतात.
एम्स पीजी निकाल २०२० अंतर्गत भोपाळ, भुवनेश्वर, जोधपूर, पाटणा, रायपूर, ऋषिकेश आणि दिल्लीच्या विविध विभागांमधील पीजी कोर्सेसच्या प्रवेशासाठी निवडण्यात आलेल्या उमेदवारांची मेरीट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट जारी करण्यात आली.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
एम्सने जारी केले महत्त्वाचे निर्देश
एम्सने पीजी कोर्सेसमध्ये प्रवेशांसाठी निकालासह अन्य महत्त्वाचे निर्देशही एम्सने जारी केले आहेत. यानुसार निवड झालेल्या उमेदवारांना ३१ जानेवारीपर्यंत क्वालिफाइंग डिग्री आणि तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणे अनिवार्य आहे. रिपोर्टिंगच्या वेळी महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. दोन उमेदवारांचे गुण समान असतील तर नियमानुसार वयोमानाच्या निकषानुसार अधिक वयाच्या उमेदवाराला संधी दिली जाईल. निकालासह ‘कन्सेन्ट फॉर्म’ भरून १९ डिसेंबर २०२० पर्यंत दिलेल्या [email protected] या इमेलवर मेल करायचा आहे.
AIIMS Result : एम्स पीजी फायनल परीक्षा २०२० चा निकाल जाहीर झाला आहे…
AIIMS PG result 2020: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पदव्युत्तर पदवी परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. एम्सच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल उपलब्ध आहे. ज्या उमेदवारांनी एम्स पीजी अंतिम परीक्षा दिली आहे, त्यांनी aiimsexams.org या एम्सच्या संकेतस्थळाला भेट द्यावी आणि आपला निकाल पाहावा. निकाल डाऊनलोडही करता येणार आहे.
एम्स पीजी अंतिम परीक्षा ऑगस्ट महिन्यातच घेण्यात आली होती.
AIIMS PG result 2020 कसा पाहाल?
पुढे दिलेल्या स्टेप बाय स्टेप पद्धतीने एम्स पीजी फायनल निकाल पाहता येईल –
१) एम्सचे अधिकृत संकेतस्थळ aiimsexams.org वर जा.
२) होमपेजवर Result: Final Post-Graduate Programme Professional Examination held in August,2020 या पर्यायावर क्लिक करा.
३) आता एक नवे पेज उघडेल.
४) कंट्रोल + एफ (Ctrl + F) बटण दाबून तुमचं नाव आणि रोल नंबर द्या.
५) आता स्क्रीनवर तुमचा एम्स पीजी निकाल दिसेल.
६) हा निकाल डाऊनलोड करता येईल आणि भविष्यातील संदर्भासाठी या निकालाची तुम्ही प्रतही घेऊ शकता.
अधिकृत वेबसाईट – www.aiimsexams.org
निकाल डाउनलोड – https://bit.ly/3b3uETj
सोर्स : म. टा.
Table of Contents