शिक्षकांसाठीची AICTE फेलोशिप म्हणजे शिक्षण क्षेत्रातील मोठा बदल! – AICTE Fellowship For Teachers
AICTE Fellowship For Teachers
AICTE Fellowship For Teachers – शिक्षण क्षेत्र आणि उद्योग जगतातील दरी भरून काढण्याच्या उद्देशाने ‘ ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन ‘ने (एआयसीटीई) ‘एआयसीटीई इंडस्ट्री फेलोशिप योजने’ची घोषणा केली आहे. ही योजना उच्च शिक्षण क्षेत्रातील अध्यापकांसाठी आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात तीनशे शिक्षकांची निवड केली जाणार आहे. अंमलबजावणीदरम्यान शिक्षण व उद्योग क्षेत्र यातील दरी भरून काढण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. ऑन जॉब ट्रेनिंग, इंटर्नशिप यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच ‘एआयसीटीई’ ने नुकतीच ‘इंडस्ट्री फेलोशिप योजने’ची घोषणा केली. यात निवड होणाऱ्या शिक्षकांना ‘AICET’ कडून ७५ हजार रुपये व ज्या उद्योग समूहात निवड झाली आहे, त्या उद्योग समूहाकडून किमान २५ हजार रुपये मिळणार आहेत. तसेच महाविद्यालयाकडून मिळणारे वेतनही या काळात मिळणार आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी शिक्षकांना १५ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करता येणार आहे. १६ ते ३० जुलैदरम्यान उद्योग समूहांकडून निवड प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. निवड झालेल्या शिक्षकांना एक ऑगस्टपासून एक किंवा सहा महिन्यांच्या फेलोशिप उपक्रमात सहभागी होता येणार आहे. ifp.aicte.gov.in या वेबसाइटवर संबंधित योजनेची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. फेलोशिप काळात शिक्षकांना उद्योगांच्या गरजा, लागणारी कौशल्ये, वापरत असणारे आधुनिक तंत्रज्ञान याचा बारकाईने अभ्यास करता येईल आणि प्रत्यक्ष कार्यानुभवही मिळेल. फेलोशिप पूर्ण केल्यानंतर दैनंदिन शिक्षणात तंत्रज्ञानाविषयीची माहिती व लागणारी कौशल्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवता येतील. अशा शिक्षकांना अभ्यासक्रमात भ्यासक्रमात योग्य ते बदल सुचवता येतील. तसेच सहकारी शिक्षकांना तंत्रज्ञान, कौशल्ये व उद्योगांच्या गरजांची माहिती देता येईल, असा या उपक्रमाच्या आयोजनाचा उद्देश आहे.
अशा आहेत अटी –
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘एआयसीटीई’ कडून काही अटी निश्चित.
- संबंधित शिक्षिकांचे वय ४५ वर्षांपेक्षा कमी असावे.
- शिक्षकाची नेमणूक महाविद्यालयात कायमस्वरूपी असावी.
- त्यांना शिकवण्याचा किमान पाच वर्षांचा अनुभव असावा.
- योजनेत निवड झालेल्या शिक्षकांनी, संबंधित उद्योग समूहाचे सर्व नियम्, रजा, अटी, ‘कोड ऑफ कंडक्ट’, ‘एथिक्स’ यांचे काटेकोरपणे पालन करावे.
- दर तीन महिन्यांनी त्या-त्या उद्योगसमूहाकडून या शिक्षकांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन होणार.
- संबंधित शिक्षकाचा अहवाल ‘एआयसीटीई’ ला सादर केला जाणार.
- मूल्यमापन असमाधानकारक असल्यास किंवा कर्मचाऱ्याने नियम, अटी शर्तीचे उल्लंघन केल्यास त्याची निवड रद्द केली जाईल
- अशा व्यक्तीला फेलोशिपची संपूर्ण रक्कम परत करावी लागणार.
- निवड झालेल्या शिक्षकांना फेलोशीप सुरू होण्यापूर्वी संबंधित महाविद्यालयासोबत फेलोशिप पूर्ण केल्यानंतर तीन वर्षे सेवा देण्याविषयी करार करावा लागणार