बँकिंग क्षेत्रात एआयची धडक: दोन लाख नोकऱ्यांना धोका!! – AI Related Jobs 2025
AI Related Jobs 2025
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: एआय व तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे भारतात २०३० पर्यंत नोकरीच्या स्वरूपात मोठे बदल होणार आहेत. याचवेळी युद्ध तसेच लोकसंख्याशास्त्रीय बदलांचा भारताला मोठा फायदा होणार असून, भारत आणि आफ्रिकन देश जवळपास दोनतृतीयांश कामगार जगाला पुरवणार आहेत. त्यामुळे भारतात येत्या काही वर्षात नोकऱ्यांची लाट निर्माण होणार असून, पदवीसोबतच नवीन कौशल्य (स्किल) शिकणे अतिशय गरजेचे झाले असल्याचे समोर आले आहे. कंपन्या पदवीची अट काढून स्किल असलेल्यांना प्राधान्य देत असल्याचे जागतिक आर्थिक मंच (डब्ल्यूईएफ) च्या फ्युचर ऑफ जॉब रिपोर्टमध्ये समोर आले आहे. अहवालानुसार, २०३० पर्यंत १७ कोटी नवीन नोकऱ्या निर्माण होतील, तर ९.२ कोटी नोकऱ्या जाणार आहेत. त्यामुळे निव्वळ ७.८ कोटी नवीन नोकऱ्या निर्माण होणार आहेत. एक हजार कंपन्यांचा अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
कोणत्या नोकऱ्या वाढणार? कृषी कामगार, वाहनचालक, बांधकाम कामगार, परिचारिका, माध्यमिक शाळेतील शिक्षक, अॅप डेव्हलपर, दुकाने चालवणारे, खाद्यप्रक्रिया आणि संबंधित व्यवसावातील कामगार, प्रकल्प व्यवस्थापक, विद्यापीठातील प्राध्यापक, समुपदेशक,
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कोणत्या नोकऱ्या जाणार? कॅशिअर, तिकीट क्लार्क, प्रशासकीय सहायक, ग्राफिक डिझायनर, इमारतीची देखभाल करणारे, स्वच्छता कर्मचारी, रेकॉर्ड ठेवणारे कर्मचारी, मुद्रण व संबंधित क्षेत्रातील कामगार. लेखापाल, सुरक्षा रक्षक, बैंक कर्मचारी, डेटा एंट्री क्लर्क, ग्राहक सेवा कर्मचारी यांच्या नोकऱ्या कमी होणार आहेत.
स्वीडनची फिनटेक कंपनी ‘क्लार्ना’ने कर्मचारी भरती बंद करून बहुतांश कामे कृत्रिम बुद्धिमत्तेकडून (एआय) करून घेणे सुरू केले आहे. ‘क्लार्ना’ ही कंपनी ‘आता खरेदी करा, नंतर पैसे द्या’ (बाय नाऊ, पे लॅटर) या योजनेसाठी प्रसिद्ध आहे. कंपनीचे सीईओ सेबास्टिअन सिमियान्टकोव्हस्की यांनी सांगितले की, कर्मचान्यांची जवळपास सगळी कामे एआय करीत आहे. या मुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर अनेक क्षेत्रात काय होईल याची चिंता अनेकांच्या सतावत आहे. या AI मुळे बेरोजगारी वाढेल काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. नक्की काय होणार हे तर पुढील परिस्थितीच सांगेल!
त्यामुळे कंपनीने मागील १ वर्षापासून कर्मचारी भरती बंद केली आहे. एक वर्षापूर्वी कंपनीकडे ४५०० कर्मचारी होते. त्यांची संख्या आता घटून ३५०० झाली आहे. कर्मचारी भरण्याऐवजी कंपनीने ऑटोमेशनकडे लक्ष केंद्रित केले आहे. अन्य तंत्रज्ञान कंपन्यांप्रमाणे आमच्याकडेही लोक ५ वर्षे थांबतात. दरवर्षी २० टक्के कर्मचारी कंपनी सोडतात. नवीन भरती थांबल्यामुळे कर्मचारी संख्या कमी होत आहे. कर्मचारी भरती बंद करून सर्व कामे एआयवर सोपविली जातील, अशी भीती अनेक जाणकारांनी वर्तविली होती.