Agniveer preference in Sarkari Nokri
अग्निवीर आणि सेवेत असलेल्या लष्करी कर्मचाऱ्यांना निवृत्तीपश्चात करिअरच्या संधी प्रबळ होण्यासाठी भारतीय रेल्वे आणि भारतीय लष्कर यांच्यातील ‘सहकार्याची रूपरेषा’ जारी करण्यात आली आहे. लष्करी सेवेतून नागरी कारकीर्दीत सुलभपणे संक्रमण सुनिश्चित होण्याच्या अनुषंगाने लष्कर आणि रेल्वे मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे.
अग्निवीर आणि नागरी जीवनात संक्रमित होणाऱ्या सध्या सेवेत असलेल्या लष्करी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भारतीय रेल्वे आणि भारतीय लष्कराने संस्थात्मक सहकार्य वाढवण्याच्या दिशेने उल्लेखनीय पाऊल म्हणून ‘सहकार्याची रूपरेषा’ सादर केली आहे. यामुळे रेल्वे खात्यातील नोकरीच्या संधींबद्दल सजगता निर्माण होईल तसेच लष्करी सेवेतून निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी समर्पित आधार प्रणाली तयार होईल. ही सहकार्यासंबंधीची रूपरेषा व्यापक राष्ट्रीय विकास उद्दिष्टांना सहाय्यक ठरण्यासोबतच माजी सैनिकांना करिअरचे इतर अर्थपूर्ण मार्ग उपलब्ध करून देण्याप्रति सामायिक वचनबद्धता अधोरेखित करणारी आहे. सैन्य दलातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि पुनर्वसन हा भारतीय रेल्वेच्या धोरणात्मक चौकटीचा महत्त्वाचा घटक आहे. माजी सैनिक आणि माजी अग्निवीरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी माजी सैनिकांसाठी स्तर-२/वरील पदांमध्ये १० टक्के सरळ आरक्षण आणि स्तर-१ पदांमध्ये २० टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, माजी अग्निवीरांसाठी स्तर-२/त्यावरील पदांमध्ये ५ टक्के, तर स्तर-१ पदांमध्ये १० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
माजी सैनिकांच्या जलदगतीने नियुक्त्या करण्यास चालना देण्यासाठी आणि विद्यमान रिक्त पदांची पूर्तता करण्यासाठी, रेल्वे मंत्रालयाने नियमित भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत भारतीय रेल्वेमध्ये माजी सैनिकांची ‘पॉइंट्समन’ म्हणून कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या झोनल आणि डिव्हिजनल पातळीवर ५,००० हून अधिक स्तर-१ पदांच्या भरतीसाठीची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत ९ डिव्हिजन्सनी ‘पॉइंट्समन ‘च्या नियुक्तीसाठी संबंधित लष्करी संघटनांसोबत सामंजस्य करार केले आहेत.

Previous Posts:
It appears that several states in India have announced reservation or preference for ex-Agniveers in jobs related to uniformed services, such as the police. Here are some notable instances. भ्रष्टाचार आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर हल्ला चढविला. काँग्रेसच्या सरकारांमध्ये ‘डीलर दलाल आणि दामाद’ असे उडी राज्य होते, अशी टीका शाह यांनी केली. अग्निवीराला पेन्शन मिळणारी नोकरी देऊ, असे आश्वासनदेखील शाह यांनी दिले. हरयाणामध्ये रेवाडी येथील निवडणूक प्रचारसभेत ते बोलत होते. अमित शाह म्हणाले, काँग्रेसच्या सरकारचा कारभार कट, कमिशन आणि भ्रष्टाचाराच्या आधारावर चालायचा. डीलर आणि दलाल नियुक्तिपत्र देत होते.

आम्ही केंद्रात सत्तेवर आल्यानंतर त्वरित अग्निपथ योजना रद्द करू, असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सांगितले. यूपीमध्ये पोलिस व प्रॉव्हिन्शिअल आर्म्ड कॉन्स्टॅब्युलरीतील (पीएसी) भरतीमध्ये माजी अग्निवीरांना प्राधान्य देण्यात येईल, अशी घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली होती. त्यावर यादव यांनी टीका केली आहे. ‘अग्निवीर’मुळे देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली जात आहे, असेही ते म्हणाले. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी सांगितले की, राज्यातील पोलिस तसेच कारागृह, वनखात्यातील रक्षकांच्या भरतीत माजी अग्निवीरांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी अग्निपथ योजना उत्तम असल्याचे सांगितले. लष्कराच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ही योजना उपयोगी असल्याचे ते म्हणाले. पोलिस व अन्य राज्यातील अन्य दलांमध्ये माजी अग्निवीरांना आरक्षण ठेवण्याची घोषणा मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, यूपी, उत्तराखंड, राजस्थान या राज्यांनी केली होती.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















