JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

अग्निवीरांसह लष्करी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर रेल्वेत थेट नोकरी! – AGNIVEER IN RAILWAY BHARTI

 AGNIVEER IN RAILWAY BHARTI – अग्निवीर भरती संर्भात एक मोठा अपडेट समोर आला आहे. साहजिकच हि अग्निवीरांसाठी आनंदाची बातमी. अग्निवीर AGNIVEER IN RAILWAY BHARTI आणि सेवेत असलेल्या लष्करी कर्मचाऱ्यांना निवृत्तीपश्चात करिअरच्या संधी प्रबळ होण्यासाठी भारतीय रेल्वे आणि भारतीय लष्कर यांच्यातील ‘सहकार्याची रूपरेषा’ जारी करण्यात आली आहे. लष्करी सेवेतून नागरी कारकीर्दीत सुलभपणे संक्रमण सुनिश्चित होण्याच्या अनुषंगाने लष्कर आणि रेल्वे मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे.  अग्निवीर आणि नागरी जीवनात संक्रमित होणाऱ्या सध्या सेवेत असलेल्या लष्करी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भारतीय रेल्वे आणि भारतीय लष्कराने संस्थात्मक सहकार्य वाढवण्याच्या दिशेने उल्लेखनीय पाऊल म्हणून ‘सहकार्याची रूपरेषा’ सादर केली आहे. यामुळे रेल्वे खात्यातील नोकरीच्या संधींबद्दल सजगता निर्माण होईल तसेच लष्करी सेवेतून निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी समर्पित आधार प्रणाली तयार होईल. ही सहकार्यासंबंधीची रूपरेषा व्यापक राष्ट्रीय विकास उद्दिष्टांना सहाय्यक ठरण्यासोबतच माजी सैनिकांना करिअरचे इतर अर्थपूर्ण मार्ग उपलब्ध करून देण्याप्रति सामायिक वचनबद्धता अधोरेखित करणारी आहे. सैन्य दलातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि पुनर्वसन हा भारतीय रेल्वेच्या धोरणात्मक चौकटीचा महत्त्वाचा घटक आहे. माजी सैनिक आणि माजी अग्निवीरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी माजी सैनिकांसाठी स्तर-२/वरील पदांमध्ये १० टक्के सरळ आरक्षण आणि स्तर-१ पदांमध्ये २० टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, माजी अग्निवीरांसाठी स्तर-२/त्यावरील पदांमध्ये ५ टक्के, तर स्तर-१ पदांमध्ये १० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

AGNIVEER IN RAILWAY BHARTI

माजी सैनिकांच्या जलदगतीने नियुक्त्या करण्यास चालना देण्यासाठी आणि विद्यमान रिक्त पदांची पूर्तता करण्यासाठी, रेल्वे मंत्रालयाने नियमित भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत भारतीय रेल्वेमध्ये माजी सैनिकांची ‘पॉइंट्समन’ म्हणून कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या झोनल आणि डिव्हिजनल पातळीवर ५,००० हून अधिक स्तर-१ पदांच्या भरतीसाठीची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत ९ डिव्हिजन्सनी ‘पॉइंट्समन ‘च्या नियुक्तीसाठी संबंधित लष्करी संघटनांसोबत सामंजस्य करार केले आहेत.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड