Agniveer As Police Constable – नौदलातील कार्यकाळ पूर्ण करून परतलेल्या 250 हून अधिक अग्निवीरांना महाराष्ट्र पोलिसांच्या सागरी सुरक्षा दलात (कोस्टल पोलिस) सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. नौदलात अग्निवीरांना कठोर प्रशिक्षण मिळते. तसेच त्यांना सीमेवर काम करण्याचा अनुभवही मिळतो. त्यामुळे प्रशिक्षित आणि अनुभवी जवानांचा पोलिस दलाला फायदा होईल, असे फडणवीस यांनी सांगितले. देशासाठी सेवा बजावणाऱ्या अग्निवीरांना शासकीय नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. त्यानुसार, आवश्यक नियमांमध्ये बदल करून २८२ माजी अग्निवीरांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. नव्या भूमिकेत दाखल होणाऱ्या सर्व माजी अग्निवीरांना मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.

राज्यातील सागरी सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी कोस्टल पोलिस दल मजबूत करण्याचे काम सुरू आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेतलेले मनुष्यबळ उपलब्ध होण्यास वेळ लागणार होता. आता नौदलातील अग्निवीरांच्या समावेशामुळे हे मनुष्यबळ मिळाले आहे. या भरतीसाठी नियमांमध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत. ही थेट भरती प्रक्रिया असून अग्निवीरांना स्वतंत्र चाचणीतून सूट देण्यात आली आहे. नौदलात यापूर्वीच कठीण निवड प्रक्रिया आणि प्रशिक्षण पूर्ण केल्याने त्यांना थेट नियुक्ती आदेश देण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
केंद्र सरकारने २०२२ मध्ये भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदलासाठी अग्निपथ योजना सुरू केली. या योजनेंतर्गत १७.५ ते २१ वर्षे वयोगटातील उमेदवारांची चार वर्षांच्या कालावधीसाठी सैन्यदलात भरती केली जाते. या कालावधीत अग्निवीरांना शिस्त, नेतृत्व, तांत्रिक कौशल्य, आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षा यांसह विविध बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर निर्धारित निकषांनुसार २५ टक्के अग्निवीरांना नियमित सैन्यसेवेत सामावून घेण्याची तरतूद आहे. उर्वरित अग्निवीरांना सेवामुक्त केले जाते.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















