मिशन ऍडमिशन -ऑनलाईन अर्ज भरण्यास झाली सुरवात
Admission 2020 - 2021
Admission 2020 – 2021 – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासह सीबीएसई, आयसीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाल्यामुळे उच्च शिक्षण देणाऱ्या शहरातील नामांकित महाविद्यालयांनी प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरवात केली आहे. महाविद्यालयांच्या अधिकृत संकेतस्थळावर शुक्रवारपासूनच विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज भरता येणार असल्याची महाविद्यालयांकडून देण्यात आली आहे.
बारावीचा निकाल जाहीर झाला असला तरी कोरोनामुळे वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमासह इतर व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश पूर्व परीक्षेसंदर्भात अध्याप कोणतीही स्पष्टता सरकारकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. तसेच दरवर्षी मोठ्या संख्येने उच्च शिक्षणासाठी विद्येच्या माहेर घर असणाऱ्या पुण्यात बाहेर गावाहून, परराज्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे यंदा लक्षणीयरित्या घटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांमध्ये वाणिज्य शाखेच्या प्रवेशासाठी सुमारे ५० ते ५५ हजार जागा उपलब्ध आहेत. त्यातील सुमारे ३० ते ३५ हजार जागा पुणे जिल्ह्यासाठी ११ ते १२ हजार जागा नाशिक जिल्ह्यासाठी आणि सुमारे ६ हजार जागा अहमदनगर जिल्ह्यासाठी आहेत. त्याचप्रमाणे विज्ञान शाखेसाठी तीनही जिल्ह्यांसाठी जवळपास ३२ हजार जागा उपलब्ध आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
“बारावीचा निकाल जाहीर झाल्यामुळे शुक्रवारपासूनच (ता. १७) प्रथम वर्षाच्या प्रवेशाबाबतची माहिती महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरता येतील,” असे सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ यांनी सांगितले.
Graduate sathi kahi job asel tar sanga
Mala Nashik company job Hawa ahe