आदिवासी विद्यापीठा मुळे रोजगाराच्या अनेक नवीन संधी, विविध पदांचे निर्माण!
Adivasi Vidyapeeth Bharti 2024
आदिवासी विद्यापीठामुळे रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होणार असल्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले. राज्यपाल राधाकृष्णन पुढे म्हणाले की, आदिवासी बांधवांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्या माध्यमातून विकासकामे सुरू आहेत. या भागातील सामाजिक विकासासाठी विद्यापीठ स्थापन करण्यात येईल. या विद्यापीठात अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान आदी विषयांच्या सर्वोत्तम सुविधा असतील, नाशिक औद्योगिकदृष्ट्या विकसित होत असल्याने या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आदिवासी आणि डोंगरी भागातील विविध प्रश्नांची आपल्याला जाणीव असल्याचे नमूद करून ते म्हणाले की, आदिवासी भागातील आरोग्य आणि शिक्षणव्यवस्था सक्षम करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. वैद्यकीय अधिकारी यांची रिक्त पदे भरतीसाठी निर्देश देण्यात येतील. यासंदर्भात विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा करण्यात आली आहे. राजभवन येथे आदिवासी कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ सुरू करण्यात येईल. त्यात ८० टक्के आदिवासी, तर २० टक्के अन्य विद्यार्थी असतील, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.