१४, १५, १६ जुलै रोजी परीक्षा, मृदा व जलसंधारण विभागातील 650 पदांसाठीची फेर परीक्षा! । Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024
Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024
Water and Conservation Department Bharti 2024
राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. मृदा व जलसंधारण विभागातील गट-ब संवर्गातील ६५० पदांसाठीची फेर परीक्षा घेतली जाणार आहे. जुलै महिन्यात ही परीक्षा होणार असून ही परीक्षा पारदर्शक व्हावी या अनुशंगाने ७ शहरातील १० टिलीएस-आयओएन कंपनीच्या अधिकृत केंद्रावरच परीक्षा घेतली जाणार आहे. TCS च्या मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, नांदेड आणि छत्रपती संभाजी नगर येथील केंद्रावर १४, १५, १६ जुलै रोजी ही परीक्षा घेतली जाणार आहे. फेब्रुवारी महिन्यात या पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र अमरावती शहरातील परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्याचे निदर्शनास आले होते.घटनेची गंभीर दखल घेत, विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन सरकारने ही परीक्षा पारदर्शक होण्यासाठी TCS कंपनीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडून आल्यास संबधितास जबाबदार ठरवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना मंत्री संजय राठोड यांनी दिल्या आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
देशात आणि राज्यात सध्या नीट परीक्षेवरून गोंधळ सुरु आहे. त्यात नेट-यूजी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यात आता राज्य सरकारने मृदा व जलसंधारण विभागातील गट-ब संवर्गातील पदांसाठी फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परिक्षेमध्ये देखील गैरप्रकार झाला होता. त्यामुळे यापुढे तरी परिक्षांमध्ये गैरप्रकार होणार नाही अशी आशा विद्यार्थी ठेवून आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
दोन ते तीन दिवसांपूर्वी झालेल्या मृदा व जलसंधारण विभागाच्या पदभरतीत गैरप्रकार झाल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे यामध्ये दोषीविरुद्ध कारवाई करून हि भरती नव्याने अधिकृत केंद्रावर घेण्यात यावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिका-यांना निवेदन दिले. नुकत्याच पार पडलेल्या जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रित) पदाच्या परीक्षेत अमरावती येथील येथील परीक्षा केंद्रावर प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आढळून आलेला आहे. सदर केंद्रावर एका विद्यार्थ्याकडे ब्लॅक अँड व्हाइट पद्धतीचे प्रवेशपत्र प्रतिबंधित असतानासुद्धा ते सापडले आहे तसेच त्यावर उत्तरपत्रिका आढळून आली आहे. या घटनेवरून विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. सदर घटनेत पोलिसांना पाचारण करण्यात आलेले होते व सदर परीक्षार्थी वर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून पदभरती अधिकृत केंद्रावर घेण्याची मागणी शुक्रवारी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या मृदू व जलसंधारण विभागाच्या वतीने विविध पदांसाठी जाहिरात देण्यात आली. यानुसार विविध पदांसाठी परीक्षा सुरू आहे. यासाठी ९ फेब्रुवारी मृद व जलसंधारण विभागाने परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. यानुसार मृद व जलसंधारण विभाग परीक्षा ही २० व २१ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. तीन पाळ्यांमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र, परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी अमरावती येथील परीक्षा केंद्रावर पेपर फुटल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे, मृदू व जलसंधारण विभागाच्या एका कर्मचाऱ्यानेच प्रश्नपत्रिका फोडून उत्तरे पुरवण्यास मदत केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे.
ही परीक्षा संगणक आधारित असून प्रत्येक सत्राच्या प्रश्न पत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार आहेत. एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. पहिले सत्र ते अंतिम सत्र या मधील प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व त्याचीकाठीण्यता यांचे समाणीकरण करण्याचे पध्दतीने गुणांक निश्चीत करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. ते सर्वांना बंधनकराक राहिल. याची सर्व नोंद घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या. मात्र, महत्त्वाची बाब म्हणजे परीक्षेच्या पहिल्याच सत्रात प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती समोर आली आहे. एका अधिकाऱ्याने ही प्रश्नपत्रिका फोडण्यास मदत केली आहे. याचे पुरावेही काही विद्यार्थ्यांनी बाहेर पाठवले आहे. काही दिवसांआधीच तलाठी भरती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. मात्र, अद्यापही या परीक्षेतील गोंधळ सुटलेला नाही. तलाठी भरतीमध्येही मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे अनेक पुरावे विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून दिले जात आहेत. मात्र, शासनाकडून यावर अद्यापही यावर कठोर कारवाई केली गेली नाही. त्यानंतर आता मृदू व जलसंधारण विभागाच्या जलसंधारण अधिकारी पदासाठी बुधवारी झालेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024: WCD (Water and Conservation Department) is going to recruit interested and eligible candidates to fill with the vacant posts. The name of the recruitment is “Water Conservation Officer, Assistant Accounts Officer”. There are total of 03 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Mumbai. Offline application for this recruitment will start from 09th of February 2024. Also last date to apply is 22nd of February 2024. For more details about SWCD Maharashtra Bharti 2024 visit our website www.MahaBharti.in.
मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत “जलसंधारण अधिकारी, सहायक लेखाधिकारी” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 09 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2024 आहे.
- पदाचे नाव – जलसंधारण अधिकारी, सहायक लेखाधिकारी
- पदसंख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – 65 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, छत्रपती संभाजीनगर यांचे कार्यालयात
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 09 फेब्रुवारी 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 फेब्रुवारी 2024
- अधिकृत वेबसाईट – https://swcd.maharashtra.gov.in/
Water and Conservation Department Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
जलसंधारण अधिकारी | 01 |
सहायक लेखाधिकारी | 02 |
Educational Qualification For Mruda Jalsandharan Vibhag Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
जलसंधारण अधिकारी | जलसंपदा व जलसंधारण विभागातून सेवानिवृत्त झालेले गट-ब जलसंधारण अधिकारी, सहा. अभि.श्रेणी-२ / शा.अ./क.अ. (राजपत्रित/ अराजपत्रित) |
सहायक लेखाधिकारी | महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा संवर्गातून सहायक लेखाधिकारी या पदावरून सेवानिवृत्त |
How To Apply For Mruda Jalsandharan Vibhag Notification 2024
- उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज करावा.
- अर्ज 09 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील.
- तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For swcd.maharashtra.gov.in Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/mwY06 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://swcd.maharashtra.gov.in/ |
SWCD Maharashtra Bharti 2024
Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024 – WCD (Water and Conservation Department) is going to recruit interested and eligible candidates to fill with the vacant posts. The name of the recruitment is “Water Conservation Officer, (Construction) Group-“B” (Non-Gazetted)”. There are total of 670 vacancies are available. haBharti.in. The tentative schedule of this recruitment will available soon. For more details about this read the given PDF Notification. Online application for this recruitment will start from 21st of December 2023. Also last date to apply is 10th of January 2024. For more details about SWCD Maharashtra Bharti 2024 visit our website www.MahaBharti.in.
Waterconserve Department Maharashtra Bharti 2023 Notification will published today,on 21st December 2023 as per Notice. candidates can check this page for full notification given below.
मृद व जलसंधारण विभागांतर्गत राज्यस्तर व जिल्हा परिषदस्तर यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित) या संवर्गातील 670 पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. हि भरती प्रक्रिया TCS द्वारे राबविण्यात येणार आहे. या भरतीची जाहिरात आज प्रकाशित झाली आहे . या भरतीचे ऑनलाईन अर्ज २१ डिसेंबर २०२३ पासून सुरु होणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2024 आहे. या भरती संदर्भातील पूर्ण अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप व निवड पद्धती येथे बघा. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभरती अँप डाउनलोड करावी.
- पदाचे नाव – जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित)
- पदसंख्या – 670 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण –
- वयोमर्यादा – १९ वर्ष
- खुल्या प्रवर्गासाठी कमाल – ३८ वर्षे
- मागासवर्गीयांसाठी – ४३ वर्षे
- दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत – ४५ वर्षा पर्यंत
- पात्र खेळाडुंच्या बाबतीत – ४३ वर्षा पर्यंत
- अनाथ उमेदवारांच्या बाबतीत – ४३ वर्षा पर्यंत
- अर्ज शुल्क –
- अमागास :- रु.१०००/-
- मागासवर्गीय / आ.दु.घ./अनाथ / दिव्यांग :- रु./-९००
- उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतीरीक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरीक्त असतील.
- परीक्षा शुल्क ना-परतावा (Non Refundable) आहे.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी 2024
- अधिकृत वेबसाईट – https://swcd.maharashtra.gov.in/
SWCD Maharashtra Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित) | 670 |
Educational Qualification For Mruda Jalsandharan Vibhag Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित) | उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली तीन वर्षे कालावधीची स्थापत्य अभियात्रीकी मधील पदविका (Diploma in Civil Engineering) किंवा पदवी (Degree in Civil Engineering) किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणुन घोषीत केलेली अर्हता |
Salary Details For SWCD Water Conservation Officer Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित) | एस-१५:४१८००-१३२३०० |
Waterconserve Department Maharashtra Bharti 2023 – Important Documents
- एस.एस.सी. अथवा तत्सम शैक्षणीक अर्हता
- वयाचा पुरावा
- शैक्षणीक अर्हता इत्यादीचा पुरावा
- सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्या बाबतचा पुरावा
- आर्थीकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्या बाबतचा पुरावा
- वैध नॉन- क्रिमीलेअर प्रमाणपत्र
- पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
- खेळाडुसाठीच्या आरक्षणा करिता पात्र असल्याचा पुरावा
- अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
- विवाहीत स्त्रीयांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा
- लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन
How To Apply For SWCD Maharashtra Application 2024
- उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.
- उमेदवाराने जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता आणि पात्रता निकषांनुसार केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
- तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024 : Application and Exam Schedule
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For swcd.maharashtra.gov.in Bharti 2024
|
|
????सिलॅबस व परीक्षा स्वरूप |
पूर्ण माहिती वाचा |
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/APS19 |
???? ऑनलाईन अर्ज करा (लिंक सुरु) | https://shorturl.at/byDLT |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://swcd.maharashtra.gov.in/ |
Table of Contents