१०वी/१२वी उत्तीर्णांना रोजगाराची संधी, या जिल्ह्यांतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती; त्वरित बघा माहिती!!!!। Dhule Job Fair 2024
Dhule Job Fair 2024
Dhule Job Fair 2024
Dhule Job Fair 2024 – Dhule Placement Drive – 01 (2024-2025) under Pandit Deendayal Upadhyay Dhule Rojgar Melava 2024 Mission has been organized for employers in Dhule. Under this Dhule Rojgar Melava 2024, there is 400+ vacancies available for Trainee Operator, Relationship Officer. Eligible candidates should attend the job fair. The date of the offline job fair is 13th June 2024. Further details are as follows:-
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
धुळे येथे “प्रशिक्षणार्थी ऑपरेटर, रिलेशनशिप ऑफिसर” पदांकरिता “प्लेसमेंट ड्राईव्ह – 01 (2024-2025) चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. ऑफलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 13 जून 2024 आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी ऑपरेटर, रिलेशनशिप ऑफिसर
- पद संख्या – 400+
- पात्रता – खाजगी नियोक्ता (Private Employer)
- अर्ज पध्दती – ऑफलाईन (offline)
- राज्य – महाराष्ट्र (Maharashtra)
- विभाग – नाशिक (Nashik)
- जिल्हा – धुळे (Dhule)
- मेळाव्याचा पत्ता – जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, प्रशासकीय इमारत धुळे
- मेळाव्याची तारीख – 13 जून 2024
Dhule Offline Rojgar Melava 2024
Dhule Offine Job Fair 2024 Details |
|
Job Fair Name |
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा मधील रिक्त पदे : ” महिलांकरिता विशेष ” पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा, ऑफलाईन क्रमांक – १, अकोला |
Recruitment Name |
Dhule Rojgar Melava 2024 |
Name of Posts | Trainee Operator, Relationship Officer |
Total Vacancies | 400+ vacancies |
How To Apply | The offline Application Form link is below |
Dhule Job Fair All Important Dates
|
|
Job Fair Date | 13th of June 2024 |
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For rojgar.mahaswayam.gov.in Bharti 2024
|
|
ऑनलाईन नोदणी | https://shorturl.at/chrRU |
✅ अधिकृत वेबसाईट | https://rojgar.mahaswayam.gov.in/ |
Dhule Job Fair 2024
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धुळे आणि धुळे चॅरिटेबल सोसायटी संचलित, इस्टिटयूट ऑफ फॉर्मसी, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि.23 जानेवारी, 2024 रोजी जिल्हास्तरीय पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त राजू वाकुडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. हा जिल्हास्तरीय रोजगार मेळावा धुळे चॅरिटेबल सोसायटी संचलित, इस्टिटयूट ऑफ फार्मसी, दयासागर शैक्षणिक परिसर, देवपूर धुळे येथे 23 जानेवारी ,2024 रोजी सकाळी 10 ते सांयकाळी 4.30 वाजे दरम्यान होणार आहे. या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी नामांकित उद्योजकांची मेळाव्यास उपस्थित राहणार आहे. या मेळाव्यात दहावी पास किंवा नापास, बारावी, आयटीआय,बीए,बीकॉम, एम.कॉम, बी.एस.सी, पदवी, पदवीका,डीफार्मा, एम फार्मा, डिप्लोमा इंजिनिअर, बी.ई, कृषी, बी.एस.सी ॲग्री, एम.एस.सी ॲग्री, एमबीए, ए.एन.एम, जी.एन.एम.बीएससी नर्सिग अशा पात्रताधारक उमेदवारांसाठी 2 हजार 412 रिक्तपदे उपलब्ध असून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी विविध 18 कंपन्या व आस्थापनांचे प्रतिनिधी या मेळाव्यास उपस्थित राहणार आहे. तसेच कौशल्य विकास व स्वंयरोजगाराबाबत विविध महामंडळाचे स्टॉल्स लावून विविध अर्थसहाय्य योजनांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
या रोजगार मेळाव्यात मे.डिस्टिल एज्युकेशन ॲण्ड टेक्नॉलॉजी यांची ट्रेनी ॲप्रिटस पदाकरिता 500 पदे, युवा शक्ती फांऊडेशन,नाशिक यांची 200 पदे, मेडप्लस फार्मसी 30 पदे, डीएम प्रिसिजन स्टॅम्पिंग्स कंपनी,नाशिक 10 पदे, क्यूज कॉर्पोरेशन लिमिटेड 200 पदे, नवभारत फर्टिलायझर लिमिटेड 33 पदे, आयसीआयसी बँक सेल्स ॲकडमी 100 पदे, क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड, धुळे 200 पदे, पिपल ट्री व्हेंचर्स प्रा.लि. 60 पदे, धूत ट्रान्समिशन,औरंगाबाद 200 पदे, परम स्किल्स ट्रेनिंग इंडिया प्रायव्हेट लि. 200 पदे, एसबीआय प्रोसॉफ्ट प्लेसमेन्ट,धुळे 75 पदे, युथ फॉर जॉब फाउंडेशन यांची 25 पदे, गोविंद एचआर सर्व्हिसेस यांची 300 पदे, साची इंटरप्रायजेस 50 पदे, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक 15 पदे, बी.आर फॅशन,धुळे 15 पदे, उज्जवल ऑटोमोटिव्ह प्रा.लि. धुळे 45 पदे अशी एकूण 2 हजार 415 रिक्तपदे प्राप्त झालेली आहेत. याकरीता 18 नामांकित कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी उपस्थित राहणार असून पात्र उमेदवारांची चाचणी व प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवड करण्यात येणार आहे.
ज्या उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोकरी साधक म्हणून नोंदणी करावी. तसेच यापुर्वी महारोजगार वेब पोर्टलवर नोंदणी केली असल्यास वरील संकेतस्थळावर आपला 15 अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉगीन करावे आणि मोबाईल व आधार क्रमांक पडताळणी करावी. तसेच या संकेतस्थळावर लॉग इन करुन जॉब फेअर टॅबवर क्लिक करुन जिल्हास्तरीय पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा (ऑफलाईन 3) यामध्ये जाऊन पात्रतेप्रमाणे विविध कंपन्याच्या उपलब्ध रिक्तपदांसाठी अर्ज करावा. यासाठी काही अडचण असल्यास कार्यालयीन दूरध्वनी 02562-295341 वर संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी www.rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळासंबंधी संदिप बोरसे 9822299844 तसेच www.ncs.gov.in संकेतस्थळासंबंधी मुकेश बोरसे 8600303487 तर वर संपर्क साधावा.
तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महास्वयम www.mahaswayam.gov.in पोर्टलच्या विविध लाभार्थी घटक जसे उमेदवार, उद्योजक, नियोक्ते इत्यादीने या संकेतस्थळावर नोंदणी करणे, नोंदणीचे अद्ययावती करणे, रिक्तपदे अधिसूचित करणे, रिक्तपदास अनुसरुन ॲप्लाय करणे, तसेच युवक व विद्यार्थी यांना करिअरविषयक संधीची माहिती, रोजगार मेळावे व रोजगार प्रोत्साहनपर कार्यक्रम यामध्ये इच्छुकता दर्शविणे, विविध प्रशिक्षण संस्था, स्टार्टअप इत्यादी विविध ऑनलाईन सेवा सुविधा उपलब्ध करण्यात देण्यात आल्या आहेत. या ऑनलाईन सेवा घेतांना लाभार्थी घटकांना येणाऱ्या अडचणी, तक्रारींचे निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्री हेल्पलाईन सुरु करण्यात आला आहे. या हेल्पलाईनचा टोल फ्री क्रमांक 18001208040 असा आहे. हा हेल्पलाईन सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत उपलब्ध आहे.
या रोजगार मेळाव्यांचा उमेदवारांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, तसेच रोजगार इच्छुक उमेदवारांनी लाभ घेण्यासाठी किमान पाच प्रतीत बायोडाटा व शैक्षणिक कागदपत्रे,आधारकार्ड, सेवायोजन नोंदणी छायाप्रतीसह मंगळवार, दिनांक 23 जानेवारी, 2024 रोजी हा जिल्हास्तरीय रोजगार मेळावा धुळे चॅरिटेबल सोसायटी संचलित, इस्टिटयूट ऑफ फार्मसी, दयासागर शैक्षणिक परिसर, देवपूर धुळे येथे सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे. असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त श्री. वाकुडे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय व आस्थापना यांच्याकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने थेट नियुक्तीसाठी ७ डिसेंबरला धुळ्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त राजू वाकुडे यांनी दिली. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धुळे आणि मॉडेल करिअर सेंटर (एनसीएस) यांच्यामार्फत प्रशासकीय संकुल (जुने जिल्हाधिकारी कार्यालय, आवार, धुळे) येथे ७ डिसेंबरला सकाळी दहा ते दुपारी दोनदरम्यान रोजगार मेळावा होईल.
यासाठी डिसान टेक्सटाईल पार्क (शिरपूर), रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्स कंपनी (धुळे), भारतीय जीवन विमा निगम (धुळे) या कंपनीतील विविध ६४० रिक्त पदे प्राप्त झाली आहेत. याकरिता नोकरी इच्छुक पात्रताधारक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येऊन जागेवरच निवड करण्यात येणार आहे.
नोंदणी करा, माहिती घ्या
धुळे जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in तसेच www.ncs.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी. यापूर्वी नोंदणी केली नसल्यास प्रथम आपली नोंदणी करावी आणि होम पेजवरील नोकरी साधक (जॉब सिकर) लॉगिनमधून आपल्या यूझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगिन करावे.
त्यानंतर डॅशबोर्डमधील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटणावर क्लिक करून धुळे जिल्हा निवडून त्यातील प्लेसमेंट ड्रॉइव्ह-१२ पर्याय (२०२३-२०२४) धुळे यांची निवड करावी. उद्योजक, नियोक्तानिहाय त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती घ्यावी.
माहितीसाठी संपर्क साधा
अधिक माहितीसाठी www.rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळासंबंधी संदीप बोरसे (मो. ९८२२२९९८४४), तसेच www.ncs.gov.in संकेतस्थळासंबंधी मुकेश बोरसे (मो. ८६००३०३४८७) यांच्याशी संपर्क साधावा. याप्रमाणे आवश्यक किमान पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून उपलब्ध असलेल्या रिक्त पदासाठी ऑनलाइन पद्धतीने आपला पसंती क्रमांक नोंदवावा आणि किमान दोन प्रतीत बायोडाटासह फोटो आणि आधारकार्ड, सेवायोजन नोंदणी कार्ड, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, इत्यादी कागदपत्रे कंपन्यांना देण्यासाठी छायाप्रती संच सोबत ठेवून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. वाकुडे यांनी केले आहे.
Table of Contents
Vacancy aahe ka sir plz sanga
सर apply केले इंटरविव्ह साठी बोलवतील का
Aply kaise kare
No question