महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल “या” महिन्यात; तर ‘टेट’ जूनमध्ये होणार ! MAHATET Result mahatet.in
MAHATET Result mahatet.in
MAHATET Result 2024 @ mahatet.in
MAHATET Result mahatet.in: जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांची पटसंख्या १ ते २० दरम्यान होती, त्याठिकाणी सेवानिवृत्त शिक्षक नेमण्याचा शासन निर्णय घेतला गेला होता. मात्र, नंतर हा निर्णय बदलून १० किंवा त्याहून कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक (डीएड किंवा बीएडधारक सुशिक्षित तरुण-तरुणी) नेमण्याचा निर्णय झाला. आता हा निर्णय देखील थांबवण्यात आला असून, कमी पटसंख्येच्या झेडपी शाळांवरील शिक्षकांच्या समस्येत काहीही बदल झालेला नाही. या संदर्भात शालेय शिक्षण विभाग नूतन शिक्षण मंत्र्यांच्या आदेशाची प्रतीक्षा करत आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
राज्यातील 14,783 शाळांपैकी 1 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळांचा मोठा हिस्सा आहे, ज्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 2,766 जिल्हा परिषदेच्या शाळांपैकी सुमारे 150 शाळांचा समावेश आहे. त्यापैकी 53 शाळांची पटसंख्या 10 पेक्षा कमी आहे. या शाळांवर कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र त्याची कार्यवाही थांबल्याने डीएड-बीएडधारक तरुण-तरुणी शासनाच्या अनिश्चित धोरणांमुळे नाराज आहेत.
तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी राज्यात 30 ते 32 हजार शिक्षकांची भरती होईल, अशी घोषणा केली होती, पण अद्यापही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 7,000 हून अधिक शिक्षकांची कमतरता आहे. समानीकरण प्रक्रियेमुळे अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या तुलनेत शिक्षक अद्यापही अपुरे आहेत.
नवीन वर्षात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. ज्या जिल्हा परिषदांनी रिक्तपदांचे रोस्टर (बिंदूनामावली) अचूक केले आहे आणि जिथे कोणत्याही प्रकारची हरकत नाही, तिथे 80% पदांची भरती केली जाणार आहे. तसेच, खासगी अनुदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरतीदेखील प्रलंबित आहे. शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार, नवीन वर्षात जवळपास 10,000 शिक्षकांची भरती होण्याची शक्यता आहे, त्यामुळे लवकरच शिक्षक भरतीबाबत खुशखबर मिळण्याची अपेक्षा आहे.
‘टीईटी’चा निकाल फेब्रुवारीत, तर ‘टेट’ परीक्षा जून-जुलैमध्ये होणार
टीईटी परीक्षा पार पडल्यावर, या परीक्षेचा निकाल फेब्रुवारीच्या अखेरीस जाहीर होण्याची अपेक्षा आहे. सध्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे उत्तरपत्रे बारकाईने तपासण्याचे काम सुरू असून, प्रत्येक उत्तरासाठी अचूक गुणांकनाची खात्री अधिकारी करत आहेत. त्यामुळे निकाल घोषित होण्यासाठी अजून दीड ते दोन महिने लागण्याची शक्यता आहे.
याशिवाय, टीईटीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जून-जुलै महिन्यात ‘टेट’ परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
MAHATET Result 2022 @ mahatet.in
MAHATET Result mahatet.in : Maharashtra Teacher Eligibility Test (MAHATET) 2021 Paper held on 21/11/2021 Through the Maharashtra State Examination Council Paper 1 (1st to 5th Group) and Paper II (6th to 8th Group). Result For MAHATET 2021 Examination is OUT On Official Mahatet Site. Candidates who appeared for the Maharashtra Teacher Eligibility Examination 2021 will get their results Available on the website from 4:00 PM on 23/12/2022. Copy of certificate to eligible candidates concerned Education Officer (Pr.) G.P. It will be sent through the Inspector of Education, Mumbai (U/D/P).
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि.२१/११/२०२१ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – २०२१ पेपर I (इ.१ली ते ५वी गट) पेपर II (इ.६वी ते ८वी गट) चा अंतिम निकाल परिषदेच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आला आहे. खाली दिलेल्या लिंक वरून आपण निकालाची PDF डाउनलोड करून आपला निकाल बघू शकता. राज्य परीक्षा परिषदेने नोव्हेंबरमध्ये परीक्षा घेतली होती. त्यामुळे परीक्षा झाल्यावर अकरा महिन्यांनी निकाल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा म्हणजेच Maha TET exam 2021 चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. डिसेंबर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल आता जाहीर कारणात आला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण राज्यभरातून या परीक्षेला लाखो विद्यार्थी बसले होते. तरीही राज्याचा निकाल अवघे 3.70% इतका लागला आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 21 डिसेंबर 2021 रोजी घेण्यात आली होती. त्यापैकी पहिली ते पाचवी पेपर पहिला आणि सहावी ते आठवी पेपर दुसरा याचा निकाल परीक्षा परिषदेने जाहीर केला आहे. मात्र या दोन्ही पेपरमध्ये लाखो उमेदवारांपैकी काहीच उमेदवार पास होऊ शकले आहेत.
MAHATET Result 2021
पहिल्या पेपर साठी दोन लाख 54 हजार 428 विद्यार्थी बसले होते त्यामध्ये 967 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर दुसऱ्या पेपरसाठी गणित विज्ञान सहावी ते आठवी 64 हजार 647 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 937 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पेपर दुसरा सामाजिक शास्त्र सहावी ते आठवी विद्यार्थी एक लाख 49 हजार 604 उमेदवार बसले होते. त्यापैकी सहा हजार सातशे अकरा उमेदवार पास झाले आहेत.
संपूर्ण राज्यभरातून टीईटी परीक्षेसाठी चार लाख 68 हजार 679 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी अवघे 17,322 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे राज्याचा एकूण निकाल 3.70% इतका लागला आहे.
निकाल डाउनलोड – https://bit.ly/3bCUAt9
यापुढे MPSC मार्फत होणार भरती?
राज्यातील शिक्षक भरती एमपीएससीच्या माध्यमातून व्हावी, असा प्रस्ताव राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी शासनाकडे पाठविला आहे. एमपीएससीचे शिक्षण सचिवही या प्रस्तावाबाबत सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एमपीएससीमार्फत भरती प्रक्रिया करण्यासाठी नियमांमध्येही काही तांत्रिक बदल करण्याची गरज आहे.
नियम बदलण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सध्या सुरू असलेली शिक्षक भरती पूर्ण केली जाईल, असे शिक्षण आयुक्त सूरज मांधरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे येत्या काळात शिक्षक भरती होणार आहे, ती शिक्षक भरती एमपीएससीच्या माध्यमातून घेण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न असेल. सध्या राज्यात पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती केली जाते. 2019 मध्ये 12 हजार शिक्षकांची मोठी शिक्षक भरती करण्यात आली. राज्यात शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असताना शिक्षक भरतीची मागणी वारंवार केली जात आहे.
MAHATET 2021 Examination result is published now. The candidates can check their online result from this page. More updates & details will be published on MahaBharti. MAHA TET Result 2022: Paper 1, 2 Mahatet.in Merit List. Maha TET result 2021 has been declared on October 21 by the department. The result has been announced zone-wise-east, west, north, and south in PDF form. Maha TET result 2021 PDF displays the roll numbers and seat numbers of qualified candidates. You can Download PDF of MahaTet Result 2022 from the direct link to check Maha TET result 2021 is provided on this page.
⏰Maha TET Syllabus And Exam Pattern 2022 – TET Result OUT | |
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि.२१/११/२०२१ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – २०२१ पेपर I (इ.१ली ते ५वी गट) पेपर II (इ.६वी ते ८वी गट) चा अंतरिम निकाल परिषदेच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आला आहे. खाली दिलेल्या लिंक वरून आपण निकालाची PDF डाउनलोड करून आपला निकाल बघू शकता. राज्य परीक्षा परिषदेने नोव्हेंबरमध्ये परीक्षा घेतली होती. त्यामुळे परीक्षा झाल्यावर अकरा महिन्यांनी निकाल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शिक्षण विभागाने 21 ऑक्टोबर 2022 रोजी Maha TET Result 2022 जाहीर केली. Maha TET 2021 परीक्षेस बसलेले सर्व उमेदवार त्यांचा Maha TET Result 2022 पाहू शकतात. पेपर I आणि पेपर II साठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने गुण पडताळणी करावयाची परीक्षा परिषदेकडे दि. 05 नोव्हेंबर 2022 पर्यंत उमेदवारांच्या लॉगिनमधून ऑनलाईन पध्दतीने आपली विनंती नोंदवू शकतात.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे २०२१मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल शुक्रवारी जाहीर झाला. त्यातील पहिली ते पाचवी या गटासाठीच्या पेपर एकमध्ये केवळ ३.७९ टक्के, सहावी ते आठवीसाठीच्या पेपर दोनमध्ये ३.५६ टक्के उमेदवार पात्र ठरले. तर तब्बल ९६ टक्क्यांहून अधिक उमेदवार अपात्र ठरल्याचे स्पष्ट झाले.
प्राथमिक स्तरावरील पेपर एकसाठी २ लाख ५४ हजार ४२८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. परीक्षा दिलेल्या २ लाख १६ हजार ५४९ उमेदवारांपैकी ९ हजार ६५३ पात्र झाले. माध्यमिक स्तरावरील पेपर दोनसाठी २ लाख १४ हजार २५१ उमेदवारांनी अर्ज भरले. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या १ लाख ८५ हजार ४३९ उमेदवारांपैकी ७ हजार ६३४ पात्र ठरले. उमेदवारांना निकाल परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर पाहता येईल. उमेदवारांना गुण पडताळणी करायची असल्यास ५ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांच्या लॉगिनमधून ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येईल. ऑनलाइन व्यतिरिक्त अन्य अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले.
Maha TET Result 2022 Important Dates & Events |
|
Event | Dates |
MahaTET 2021 Notification | 3 August 2021 |
Maha TET Exam Date 2021 | 21 November 2021 |
Maha TET Admit Card 2021 | 27 October 2022 |
MahaTET Answer Key 2022 | 22 June 2022 |
Maha TET Result 2022 | 21 October 2022 |
MAHA TET Result 2022 PDF Download
List of MAHATET Qualified Candidates
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 मध्ये उत्तीर्ण उमेदवारांची यादी Maharashtra State Council of Examination (MSCE) ने जाहीर केली असून ज्या उमेदवारास Qualifying Marks पेक्षा अधिक मार्क मिळाले आहे. ते या परीक्षेत उत्तीर्ण (Maha TET Result 2022) झाले आहेत. List of Qualified Candidates ची PDF डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
????महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 – ( MAHATET 2021 ) अंतरिम निकालानुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांचे बैठक क्रमांक.
सोबतच काही विद्यार्थ्यांचा निकाल महाराष्ट्र परीक्षा परिषदेने राखून ठेवला आहे. त्या उमेदवारांनी आपले निवेदन दिनांक 05 नोव्हेंबर 2022 पर्यंत [email protected] या ईमेल वर पाठवायचे आहे. Maha TET Result 2022 Notice व ज्या निकाल राखून ठेवलेल्या उमेदवारांची यादी डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- ????महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 – ( MAHATET 2021 ) निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या उमेदवारांचे बैठक क्रमांक.
- लॉगिन लिंक
Maha TET Result 2022 Out, Check Maharashtra TET Result 2022
शिक्षक पदासाठी टीईटी उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याने २०१३ पासून राज्यात ही परीक्षा घेतली जाते. २०१९ नंतर करोनाच्या प्रादुर्भावामुळे टीईटी झाली नव्हती. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर २१ नोव्हेंबर २०२१ रोजी टीईटी घेण्यात आली. मात्र या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यापूर्वी आधीच्या टीईटी परीक्षांतील घोटाळा उघडकीला आला. पोलिस तपास सुरू असल्याने टीईटी २०२१च्या निकालावर परिणाम झाला. २०१९च्या टीईटीत गैरप्रकार केलेल्या ७ हजार ८७४ उमेदवारांची नावे राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केली. मात्र २०२१मध्ये झालेल्या टीईटीच्या निकालाकडे राज्यभरातील उमेदवारांचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी निकाल करण्यात आला.
Table of Contents
Mahatet risult 2021 Napas risult midnar ka
TET 2021 result download link
TET 2021 cha result download