Ichalkaranji Mahanagarpalika Bharti 2024 | ७१३ पदे रिक्त, महानगरपालिकेत लवकरच पदभरती अपेक्षित!
Ichalkaranji Mahanagarpalika Bharti 2024
Ichalkaranji Mahanagarpalika Bharti 2024
Ichalkaranji Mahanagarpalika Bharti 2024: Out Of the 713 posts held by the BMC, 395 have been approved by the government. Accordingly, efforts are on to recruit posts at the municipal level. This includes 70 posts under compassionate grounds. The recruitment is in the final stages. The remaining 325 posts will usually be filled in one to one-and-a-half months.
इचलकरंजी महानगरपालिकेचा आकृतिबंध मंजूर झाला आहे. आकृतिबंधाचा विचार करता ७१३ पदे रिक्त आहेत. परिणामी, कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. उपलब्ध इचलकरंजी महानगरपालिका कर्मचाऱ्यावर कामाचा मोठा ताण पडत आहे. त्यामुळे आकृतिबंधानुसार मंजूर पदांची भरती झाल्यास महापालिकेच्या कारभारात सुसूत्रता आणि गती येणार आहे. इचलकरंजी नगरपालिका अस्तित्वात असताना १,८८३ पदे मंजूर होती. त्यामध्ये स्थायी आणि अस्थायी पदांचा समावेश होता. अस्थायी पदाचे कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्या ठिकाणी नवीन पदभरती झाली नाही. परिणामी, ४५९ पदे व्यपगत झाली. त्याचा परिणाम नगरपालिकेच्या कामकाजावर होत होता. दरम्यान, दीड वर्षापूर्वी नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले. महापालिका अस्तित्वात आल्यानंतर नवीन आकृतिबंधासाठी शासनस्तरावर महापालिकेने प्रयत्न केले. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
शासनाने महापालिकेच्या आकृतिबंधाला ७ फेब्रुवारी २०२३ च्या नगरविकास विभागाच्या आदेशानुसार मंजुरी दिली. त्यामध्ये विविध विभागांतील कर्मचाऱ्यांची संख्या, त्यांना देण्यात येणाऱ्या वेतनश्रेणीचा समावेश करण्यात आला होता. आकृतिबंध मंजूर झाल्यानंतरही महापालिकेने कर्मचाऱ्यांची पदभरती केली नव्हती. काही महिन्यांपूर्वी महापालिकेने आवश्यक पदभरतीची मागणी केल्यानंतर त्याला शासनाने मंजुरी दिली होती. महापालिकेकडे असलेल्या ७१३ पदांपैकी ३९५ पदांसाठी शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार महापालिकास्तरावर पदभरतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये ७० अनुकंपाखालील पदांचा समावेश आहे. ही पदभरती अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित ३२५ पदांची भरती साधारणत: एक ते दीड महिन्यात होईल.
Ichalkaranji Mahanagarpalika Bharti 2023 – Update is out today. Municipal Commissioner Omprakash Divte instructed the concerned to take necessary further action to fill the posts of fireman and driver immediately as per the format approved by the government.
शासनाने मंजूर केलेल्या आकृतिबंधानुसार फायरमन आणि वाहनचालक पदे तातडीने भरण्याबाबत आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी संबंधितांना दिल्या. महापालिकेच्या वाहन व अग्निशमन विभागाची आज त्यांनी बैठक घेऊन या दोन्ही विभागातील कामकाजाची माहिती घेतली. अग्निशमन दलाच्या बळकटीकरणासाठी आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत नवीन दोन अग्निशमन वाहने खरेदी करण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला आहे. त्याच्या मंजुरीसाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे आयुक्त दिवटे यांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या प्राथमिक शाळेत अग्निशमन उपकरण बसवावे, विद्यार्थ्यांना अग्निशमन यंत्रणेविषयी प्रात्यक्षिकांचे सादरीकरण, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण, प्रथमोपचार याविषयीची माहिती द्यावी, अग्निशमन दलाच्या जवानांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रात्यक्षिके घ्यावीत, अशा विविध सूचना त्यांनी मांडल्या. बैठकीस अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे, वाहन अधीक्षक राजेंद्र मिरगे, मेकॅनिक भागोजी निर्मळे, अनिल कांबळे, प्रशांत आरगे आदी उपस्थित होते.
नव्याने स्थापन झालेल्या इचलकरंजी महापालिकेसाठी १७४४ पदाचा आकृतिबंध आज मंजूर करण्यात आला. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात आला. यामध्ये यापूर्वी मंजूर असलेली ४५९ पदे रद्द करण्यात आली असून २७७ नवीन पदांची निर्मिती करण्यात आली आहे. या आदेशामुळे लवकरच मंजूर झालेल्या पदांची आवश्यकतेनुसार भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला असून पुढील काळात महापालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.
शासनाच्या धोरणानुसार महापालिकेचा आस्थापना खर्च ३५ टक्के असणे आवश्यक आहे; पण नवीन आकृतिबंधानुसार इचलकरंजी महापालिकेचा आस्थापना खर्च ५६.३९ टक्के इतका होणार आहे. मात्र, महापालिकेने याबाबत एक पत्र दिले असून त्यामध्ये विविध कारणे दिली आहे. ही कारणे विचारात घेऊन आस्थापना खर्चाच्या अटीमध्ये शासनाने सूट दिली आहे. तथापि, आस्थापना खर्चावर नियंत्रण राहण्यासाठी पदभरती करताना पदांची आवश्यकता व कारणे महापालिकेला नमूद करावी लागणार आहेत. तशी शासनाची मंजुरी घ्यावी लागणार आहे. आयुक्त म्हणून सुधाकर देशमुख कामकाज पाहत आहेत. पहिल्या टप्प्यात विविध ३४ संवर्गातील ४३ पदांचा आकृतिबंध मंजूर झाला आहे. तर यापूर्वी नगरपालिकेसाठी १८८३ पदांचा आकृतिबंध मंजूर झाला होता.
नवीन पदनिर्मिती संख्या एकूण मंजूर पदसंख्या
प्रशासकीय ठराव ४ जानेवारी रोजी केला होता. हा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला होता. अत्यंत कमी कालावधीत शासन पातळीवरून या आकृतिबंधाच्या प्रस्तावास सशर्त मंजुरी देण्यात आली आहे. एकूण ४० विभागांसाठी १७४४ पदांसाठी ही मंजुरी देण्यात आली आहे. सरळसेवा, कंत्राटी आणि पदोन्नती याद्वारे पदांची भरती करण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत.
Previous Updates :
Ichalkaranji Municipal Corporation has published a new recruitment notification for the vacant posts. Interested and eligible candidates can apply before the 12th of December 2022. The official website of Ichalkaranji Mahanagarpalika is www.ichalkaranjinp.co.in. Further details are as follows:-
इचलकरंजी महानगरपालिका जि. कोल्हापूर अंतर्गत “शहर अभियंता (स्थापत्य), वैद्यकीय अधिकारी” पदांच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 आहे.
- पदाचे नाव – शहर अभियंता (स्थापत्य), वैद्यकीय अधिकारी
- पदसंख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता –शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – इचलकरंजी जि. कोल्हापूर
- अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – नियुक्ती प्राधिका-याकडे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 डिसेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट – www.ichalkaranjinp.co.in
Ichalkaranji Mahanagarpalika Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
शहर अभियंता (स्थापत्य) | 01 पद |
वैद्यकीय अधिकारी | 01 पद |
Educational Qualification For Ichalkaranji Mahanagarpalika Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शहर अभियंता (स्थापत्य) | राज्य शासनाच्या अधिक्षक अभियंता / कार्यकारी अभियंता या संवर्गातील अधिकारी |
वैद्यकीय अधिकारी | मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS व जन ओषध वैद्यकशास्त्र पदव्युत्तर पदवी ( M.D. in PSM/Community Medicine) किंवा MBBS व DPH पदविका आणि किमान ३ वर्षांचा अनुभव. |
Salary Details For Ichalkaranji Municipal Corporation Bharti 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
शहर अभियंता (स्थापत्य) | S 23-67700-208700 |
वैद्यकीय अधिकारी | S 20-56100-177500 |
How To Apply For Ichalkaranji Municipal Corporation Recruitment 2024
- अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- इच्छुक व अर्हतापात्र अधिका-यांनी त्यांचे अर्ज महानगरपालिकेच्या www.ichalkaranjinp.co.in या संकेतस्थळावर Online सादर करावेत.
- तसेच अर्जाची एक प्रत आपल्या नियुक्ती प्राधिका-याकडे सादर करावी.
- Online अर्ज सादर करणे शक्य न झाल्यास प्रत्यक्षरित्या दोन्ही प्रशासकीय विभागास उक्त विहीत मुदतीत सादर करावेत.
- तरी इच्छुक व पात्रउमेदवारांनी आवश्यक त्या शैक्षणिक, अनुभव प्रमाणपत्रे व इतर आवश्यक कागदपत्रासह अर्ज विहित मुदतीत सादर करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 आहे.
- विहित मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Ichalkaranji Municipal Corporation Vacancy 2024 details
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता करूया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.ichalkaranjinp.co.in Recruitment 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://cutt.ly/41dxfu3 |
✅ ऑनलाईन अर्ज करा |
https://cutt.ly/j1dzVtv |
Table of Contents