महत्त्वाची बातमी! पावसामुळे दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे आज होणारे पेपर पुढे ढकलले | SSC HSC Supplementary Exam

SSC HSC Supplementary Exam

SSC HSC Supplementary Exam Postponed

SSC HSC Supplementary Exam: The 10th and 12th supplementary examination (SSC & HSC Exam Postponed) has been postponed due to the red alert issued by the Meteorological Department in some places of the state. The postponed 10th paper will be held on July 31 and the 12th paper will be held on August 9

राज्यात काही जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी (ता. २६) अतिवृष्टी होईल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. त्यामुळे दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेदरम्यान शुक्रवारी होणारे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे. दहावीची पुरवणी परीक्षा १६ ते ३० जुलै आणि बारावीची पुरवणी परीक्षा १६ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान आयोजित केली आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या परीक्षेत शुक्रवारी (ता. २६) दहावीचा ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन’ या विषयाचा पेपर सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत होणार होता. आता हा पेपर ३१ जुलैला सकाळी ११ ते दुपारी १ यावेळेत होईल. तर बारावीच्या परीक्षेतील वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान आणि एमसीव्हीसी पेपर दोन (ईबी टू एक्सबी २०) विषयांचे पेपर शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत होणार होते. आता हे पेपर नऊ ऑगस्टला सकाळी ११ ते २ या वेळेत होणार आहेत. दरम्यान, लेखी आणि अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे राज्य मंडळाच्या सहसचिव मेधा निरफराके यांनी स्पष्ट केले आहे

दहावी-बारावीच्या परीक्षेचे बदललेले वेळापत्रक

इयत्ता : विषय : सुधारित वेळापत्रक
■ दहावी : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २ : ३१ जुलै (वेळ- सकाळी ११ ते दुपारी १)
■ बारावी : १. वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, २. अत्रशास्त्र व तंत्रज्ञान, ३. एमसीव्हीसी पेपर २ (ईबी टू एक्स बी २०) : ९ ऑगस्ट (वेळ सकाळी ११ ते दुपारी २)

लोकल सेवा आणि वाहतूक सेवावर त्याचा परिणाम

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये उद्याही मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे लोकल सेवा आणि वाहतूक सेवावर त्याचा परिणाम झाला आहे. म्हणून मुंबई, ठाणे आणि पालघरमधील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर कोकणात येत्या 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे त्या ठिकाणच्या शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आज या ठिकाणच्या शाळा बंद ठेवण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. तर इतर जिल्ह्यातील शाळा बंद ठेवायच्या का नाहीत ते त्या त्या ठिकाणची परिस्थिती पाहून ठरवण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.


HSC Supplementary Exam Date Extend

जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी १७ जूनपर्यंत विलंब शुल्काने अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना १३ ते १७ जूनदरम्यान विलंब शुल्काने पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर परीक्षेचा अर्ज भरायचा आहे. उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे हे शुल्क २० जूनपर्यंत भरायचे आहे. तर शाळा आणि महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या २४ जूनपर्यंत जमा करायच्या आहेत, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे


SSC Supplementary Examination Date 2024

SSC HSC Supplementary Exam: The 10th supplementary examination will start from June 14. Therefore, the education department has started preparing for the examination and the examination will be conducted at 33 examination centers in Belgaum educational district and 11065 students of Belgaum educational district are going to appear for the supplementary examination.

दहावीच्या पुरवणी परीक्षेला १४ जूनपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने परीक्षेची तयारी सुरू केली असून बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील ३३ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार असून, बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील ११०६५ विद्यार्थी पुरवणी परीक्षा देणार आहेत. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

मार्च एप्रिल महिन्यात झालेल्या दहावीच्या परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पुरवणी परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी विद्यार्थ्यांना दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. तसेच परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी माध्यमिक शाळांमध्ये विशेष वर्ग घेण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र नापास झालेले विद्यार्थी विशेष वर्गासाठी शाळेत दाखल होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नापास झालेले विद्यार्थी शाळेत यावेत यासाठी जणजागृती करण्याची सूचना करण्यात आली आहे.

दहावीच्या परीक्षेत बेळगाव जिल्ह्यासह राज्यात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय प्रमाणात आहे त्यामुळे १४ जूनपासून सुरू होणाऱ्या दहावी पुरवणी परीक्षेला सामोरे जाताना नापास झालेल्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सरकारी, अनुदानित व विना अनुदानित शाळांमध्ये विशेष वर्ग घेण्यास सुरुवात झाली आहे. मात्र पुरवणी परीक्षेसाठी अर्ज दाखल केलेले विद्यार्थी शाळेतील विशेष वर्गांना दांडी मारत असल्याचे चित्र सर्वच ठिकाणी पाहावयास मिळत आहे त्यामुळे विशेष वर्ग घेण्याचा उद्देश मागे राहत आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने विशेष वर्गाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी आणि विद्यार्थी संख्या वाढीसाठी प्रयत्न करावेत अशी सूचना करण्यात आली होती. त्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून विशेष वर्गांना येण्याची सूचना केली होती. तरीही अनेक ठिकाणी कमी प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.


10th Supplementary Examination

SSC HSC Supplementary Exam: इयत्ता दहावीची पुरवणी परीक्षा जुलै महिन्यात होणार असून, यासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. ऑनलाइन अर्जनोंदणी करण्यासाठी नियमित शुल्काद्वारे शुक्रवार, ३१ मे ते ११ जून या कालावधीत मुदत देण्यात आली आहे. तसेच विलंब शुल्काद्वारे विद्यार्थी १२ जून ते १७ जून या कालावधीत अर्ज करू शकतात. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

दहावीच्या नियमित परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी पुरवणी परीक्षा घेतली अर्जनोंदणी करणे आवश्यक आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसह पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेतील विद्यार्थी पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. यासाठी मंडळाकडून काही सूचना करण्यात आल्या आहेत.

यामध्ये प्रामुख्याने ऑनलाइन अर्ज भरताना मार्च २०२४ परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती अर्जात ऑनलाइन घेता येईल. श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अटी व शर्तीनुसार श्रेणीसुधार करू उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जुलै २०२४ व मार्च २०२५ अशा दोन लगतच्या संधी उपलब्ध राहतील. नियमित, विलंब शुल्कासह अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क चलनाद्वारेच भरण्यात यावे. सर्व विभागीय मंडळातील माध्यमिक शाळांनी निर्धारित केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करून चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीत विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात आणि ऑनलाइन अर्ज करण्याच्या तारखेत कुठलीही मुदतवाढ दिली जाणार नाही, अशा सूचना मंडळाकडून  करण्यात आल्या आहेत.


12th Supplementary Examination

राज्यातील राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी व मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेचा निकाल 21 मे रोजी जाहीर करण्यात आला. मंडळातर्फे यासाठीचा पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये घेण्यात येणार असून या परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना 27 मे पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार येणार आहे. पुरवणी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फतच भरावयाची आहेत. तसेच आवेदनपत्रे ऑनलाइन पद्धतीने सादर करावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे राज्य मंडळामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाची तारीख 31 मे ते 15 जून 2024 अशी असून उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाची तारीख मंगळवार 18 जून 2024 अशी आहे. उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (परीक्षेस प्रविष्ट न झालेले), श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे तसेच आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी) सोमवार 27 मे पासून शुक्रवार 7 जून 2024 या कालावधीत नियमित शुल्कासह भरता येणार आहेत. तर विलंब शुल्कासह अर्ज 8 जून ते 12 जून 2024 या कालावधीत भरता येणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळामार्फत समुपदेशन सेवा

इयत्ता 12 वी च्या परीक्षेच्या निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते. त्यामुळे राज्यमंडळ स्तरावरुन अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. समुपदेशनासाठी भ्रमणध्वनी क्रमांक देण्यात आले आहे. परीक्षेच्या निकालाच्या दिवसापासून आठ दिवस सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत समुपदेशक विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे नि:शुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील.

अर्जाचे वेळापत्रक असे – Maha HSSC Board Supplementary Exam Online Application Schedule 2024

नियमित शुल्कासह परीक्षा अर्ज भरणे २७ मे ते ७ जून
■ विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज भरणे ८ जून ते १२ जून
■ शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी चलनाद्वारे शुल्क भरणे : ३१ मे ते १५ जून
■ मंडळाकडे शुल्क भरल्याचे चलन जमा करणे १८ जूनपर्यंत
■ ऑनलाइन अर्जसाठी लिंक: www.mahahsscboard.in

फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेचा निकाल २१ मे रोजी जाहीर झाला आहे. मंडळातर्फे पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये घेण्यात येणार असून या परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना २७ मे पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार असल्याची माहिती, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे. (12th exam)

उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (परीक्षेस प्रविष्ट न झालेले), श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे तसेच आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी) सोमवार २७ मे पासून शुक्रवार ७ जून २०२४ या कालावधीत नियमित शुल्कासह भरता येणार आहेत. तर विलंब शुल्कासह अर्ज ८ जून ते १२ जून २०२४ या कालावधीत भरता येतील.

उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाची तारीख ३१ मे ते १५ जून २०२४ अशी असून उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाची तारीख मंगळवार १८ जून २०२४ अशी आहे.

पुरवणी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फतच ती भरावीत. आवेदनपत्रे ऑनलाइन पद्धतीने सादर करावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे राज्य मंडळामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

The result of Higher Secondary Certificate (Class XII) exam conducted in February-March 2024 has been declared on 21st May. The supplementary examination will be conducted by the board in July-August 2024 and the students appearing in this examination will be able to fill the application online from May 27, Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education Secretary Anuradha Oak has informed.

Applications for re-examiners through High School/Junior College, private students who have previously obtained Enrollment Certificate (not entered for examination), students entering with upgrade and occasional subjects and students entering with ITI subjects (students taking transfer of credit through Industrial Training Institute) Monday 27th May From Friday 7th June 2024, payment will be made with regular fee. So applications can be submitted from June 8 to June 12, 2024 with late fee


Supplementary Exams Postponed

SSC HSC Supplementary Exam: Heavy rain is going on in many districts of the state. There is a flood-like situation in many places. The State Board of Education has decided to postpone the 10th and 12th supplementary examinations in the wake of incessant rains. The Board of Education has also announced the revised time table. The Meteorological Department has warned of heavy rain in some places of the state. Therefore, the papers of 10th and 12th supplementary examination to be held tomorrow on July 20 have been postponed. The postponed Class 10 papers will be held on August 2, while the Class XII papers will be held on August 11

अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र शासनाने इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे. आता एक अजून निर्णय जाहीर करण्यात आला असून त्याप्रमाणे इयत्ता दहावी आणि बारावीच्या जुलैमध्ये होणार्‍या पुरवणी परीक्षांच्या नियोजित तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. आता या परीक्षा ऑगस्ट महिन्यात होणार आहेत.

या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे राज्य सरकारनं गुरुवारी म्हणजेच २० जुलै रोजी शाळांना सुट्टी जाहीर केली. तसेच राज्य शिक्षण मंडळाने याच दिवशी होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या परीक्षांचं सुधारित वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे.

पुढे ढकलेले पेपर ‘या’ दिवशी होतील

राज्यातील काही ठिकाणी हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्यामुळे दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचे २० जुलै रोजी होणारे पेपर पुढे ढकलण्यात आले. दहावीचे पुढे ढकलण्यात आलेले पेपर २ ऑगस्ट रोजी होतील तसेच बारावीचे पेपर ११ ऑगस्ट रोजी होतील. परीक्षेची वेळ सकाळी अकरा ते दुपारी दोन अशी निश्चित करण्यात आलेली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षाही पुढे ढकलल्या

मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाच्या उद्या होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षांच्या नव्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील.


SSC & HSC Supplementary Exam Admit Card Link

SSC HSC Supplementary Exam:According to the directive given by Oak, all secondary and higher secondary schools, junior colleges of all divisional boards for July-August 2023 are to print online admit cards for class 10-12 examination and issue them to the students. The hall ticket for the 10th-12th supplementary examination to be conducted in the month of July-August through the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education will be made available in the login of the institute from 11 am on Wednesday (5th)

सर्व माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना जुलै-ऑगस्ट २०२३ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १२वी) परीक्षेची प्रवेशपत्रे ( Hall Ticket ) ऑनलाईन (Online) पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर बुधवार दिनांक ०५/०७/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासून School / College login मध्ये download करण्याकरिता उपलब्ध होतील. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. 

या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

ओक यांनी दिलेल्या निर्देशानुसार, जुलै-ऑगस्ट 2023 साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी दहावी-बारावी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत.

प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने प्रिंटिंग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकाचा, प्राचार्यांचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी. प्रवेशपत्रामध्ये विषय व माध्यम बदल असतील, तर त्यांच्या दुरुस्त्या विभागीय मंडळात समक्ष जाऊन करून घ्यायच्या आहेत. प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवायची आहे.

प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी पुनःश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यायचे आहे. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी, असे स्पष्ट केले आहे..

ऑनलाइन प्रवेशपत्र प्रिंट काढून ती विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत. प्रवेशपत्राच्या प्रिंटसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक, प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे. प्रवेशपत्रामध्ये विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात समक्ष जाऊन करुन घ्यावयाच्या आहेत.

शाळांना काय करावे लागणार?

प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या शाळा, महाविद्यालयाच्या स्तरावर करुन त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवावी लागणार आहे. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित शाळा, महाविद्यालयांनी प्रिंट काढून लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा द्यावा. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटा चिकटवून मुख्याध्यापकांचा शिक्का, स्वाक्षरी आवश्‍यक.

ऑनलाईन प्रवेशपत्रे (Hall Ticket) उपलब्ध करून घेण्याच्या अनुषंगाने सूचित करण्यात येते की,
१. जुलै – ऑगस्ट २०२३ साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी इ.१२ वी व इ. १० वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत.
२. प्रवेशपत्र (Hall Ticket ) ऑनलाईन (Online) पध्दतीने प्रिंटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा / प्राचार्यांचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी.
३. प्रवेशपत्रामध्ये (Hall Ticket ) विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात समक्ष जाऊन करून घ्यावयाच्या आहेत.
४. प्रवेशपत्रावरील (Hall Ticket ) फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवावयाची आहे.
५. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी पुनःश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत ( Duplicate) असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यावयाचे आहे.


SSC & HSC Supplementary Exam Result

SSC & HSC Supplementary exam results will be declared today. visit www.mahresult.nic.in to download the result. Further details are as follows:-

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी, तसेच बारावीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. संबंधित परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. 2) दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी पुरवणी परीक्षा 27 जुलै ते 12 ऑगस्ट आणि बारावीची पुरवणी परीक्षा 21 जुलै ते 24 ऑगस्टदरम्यान झाली. परीक्षेचा निकाल ुुु.ारहीर्शीीश्रीं.पळल.ळप या संकेतस्थळावर आज दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील. तसेच माहितीची प्रत घेता येईल.

अधिकृत वेबसाईट – mahresult.nic.in

SSC HSC Supplementary Exam


12th Supplementary Exam Revised Timetable 

SSC HSC Supplementary Exam: There are some changes in HSC Supplementary Exam Timetable conduct under the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education. Students visit www.mahahsscboard.in for revised scheduled. Further details are as follows:-

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये होत असलेल्या बारावीच्या पुरवणी परीक्षेत अंशतः बदल करण्यात आला आहे. बारावीच्या व्यावसायिक द्विलक्षी अभ्यासक्रम पेपर एक आणि दोन विषयांच्या ६, १० आणि १२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून सुधारित वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर देण्यात आले आहे. राज्य मंडळामार्फत २१ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान बारावीची पुरवणी परीक्षा होत आहे. या परीक्षेस श्रेणी सुधार योजनेअंतर्गत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी हे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणारी ‘एमएचटी सीईटी’ परीक्षाही देणार आहेत.

  • त्यामुळे त्या कालावधीत होणाऱ्या बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
  • या वेळापत्रकातील अंशतः बदलाची सर्व संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक/प्राचार्य, विद्यार्थी, पालक आणि अन्य घटकांनी नोंद घ्यावी.
  • या तारखेबाबतचे सुधारित वेळापत्रक मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या अधिकृत संकेतस्थळावर एक ऑगस्टपासून उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रकटनाद्वारे दिली आहे.

अधिकृत वेबसाईट – www.mahahsscboard.in


SSC Supplementary Exam Hall Tickets 

SSC HSC Supplementary Exam : The admit card for the 10th Supplementary  July-August Exam 2022 is available by the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education. visit https://www.mahahsscboard.in to download the hall tickets. Further details are as follows:-

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा प्रवेशपत्र (हॉल तिकीट) संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे ऑनलाईन हॉल तिकीट शाळांच्या लॉगीन आयडीवर उपलब्ध झाले आहे.

दहावीची पुरवणी परीक्षा जुलैऑगस्ट २०२२ मध्ये होणार असून, या परीक्षेसाठी https:// www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळेच्या लॉगीनवर गुरुवारी (दि. १४) सकाळी ११ वाजेपासून हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. हॉल तिकीट शाळास्तरावर डाऊनलोड करून विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे.

SSC HSC Supplementary Exam


10th Supplementary Examination Hall Tickets

SSC HSC Supplementary Exam : The admit card for the 10th Supplementary  July-August Exam 2022 will be available Thursday (14th July 2022) by the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education. The exam will be conducted between 27th July to 12th of August 2022. Students visit ‘www.mahahsscboard.in’ to download the admit card. Further details are as followS:-

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी सर्व विभागीय मंडळातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शाळांना येत्या गुरुवारपासून (ता.१४) ही प्रवेशपत्रे ‘स्कूल लॉगिन’मधून डाऊनलोड करता येणार आहेत. शाळांनी ऑनलाइन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावीत, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले आहे.

  • राज्य मंडळातर्फे दहावीची पुरवणी परीक्षा २७ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान होणार आहे.
  • तर दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २६ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत आयोजित केली आहे.
  • मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर गुरुवारी सकाळी अकरा वाजल्यापासून शाळा लॉगिनमध्ये प्रवेशपत्रे उपलब्ध होणार आहेत.
  • प्रवेशपत्र ऑनलाइन पद्धतीने प्रिंटिंग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेण्यात येऊ नये.
  • प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी, असेही डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले.

प्रवेशपत्रावरील विषय व माध्यम यात बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यावयाच्या आहेत. तसेच फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख व जन्मस्थळ या संदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करून त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवायची आहे. विद्यार्थ्यांकडून प्रवेशपत्र गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुन:श्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यावे. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे, असे राज्य मंडळाने प्रकटनाद्वारे स्पष्ट केले आहे.

अधिकृत वेबसाईट – www.mahahsscboard.in


HSC Supplementary Exam Hall Ticket

SSC HSC Supplementary Exam: The admit cards for Class 12th Supplementary Examination are available from today. Students download their admit through the www.mahahsscboard.in. Click on the below link to download the hall tikctes. Further details are as follows:-

बारावीच्या पुरवणी परीक्षेची प्रवेशपत्र जाहीर!! येथे करा डाउनलोड

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या बारावीच्या पुरवणी परीक्षेची ऑनलाइन प्रवेशपत्रे जाहीर करण्यात आलेली आहेत. विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर प्रवेशपत्रे डाउनलोड करता येतील. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या बारावीच्या पुरवणी परीक्षेची ऑनलाइन प्रवेशपत्रे (हॉल तिकीट) शनिवारपासून (ता. ९) उपलब्ध करून देण्यात येत आहेत. राज्य मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर सकाळी अकरा वाजल्यापासून कॉलेज लॉगिनमध्ये ही प्रवेशपत्रे डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होतील, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रकटनाद्वारे दिली आहे.

  • जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये होणाऱ्या बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांनी बारावीच्या परीक्षेची ऑनलाइन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत.
  • प्रवेशपत्र ऑनलाइन पद्धतीने प्रिंटिंग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये.
  • प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावी, अशी सूचना राज्य मंडळाने केली आहे.

प्रवेशपत्रामध्ये विषय आणि माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यायच्या आहेत. प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवायची आहे. तसेच, प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित महाविद्यालयांनी पुन:श्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यावयाचे आहे. प्रवेशपत्रावरील फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिटकवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे, असे डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

प्रवेशपत्र डाउनलोड करा – www.mahahsscboard.in

SSC HSC Supplementary Exam


SSC Supplementary Exam – Application Date Extended

SSC HSC Supplementary Exam : The July-August 2022 Supplementary Exam dates have not been declared yet. Maharashtra SSC July-August 2022 Supplementary Exam applications date extended. Students apply till the 30th of June 2022. Further details are as follows:-

जुलै-ऑगस्ट २०२२ पुरवणी परीक्षांच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत याआधी २० जून ते २७ जून २०२२ होती. विद्यार्थी हित लक्षात घेऊन ३० जून पर्यंत मुदतवाढ दिल्याचे राज्य मंडळाने सांगितले आहे.

  • राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या पुरवणी परीक्षेच्या अर्जांना मुदतवाढ दिली आहे.
  • आता ज्या विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये होणारी पुरवणी परीक्षा द्यायची आहे, ते विद्यार्थी नियमित शुल्कासह ३० जून पर्यंत अर्ज करू शकतात.
  • ही मुदत २७ जून रोजी संपत होती. त्यानंतर १ जुलै ते ४ जुलै २०२२ या कालावधीत विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहेत.
  • जुलै-ऑगस्ट २०२२ पुरवणी परीक्षांच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत याआधी २० जून ते २७ जून २०२२ होती.
  • विद्यार्थी हित लक्षात घेऊन ३० जून पर्यंत मुदतवाढ दिल्याचे राज्य मंडळाने सांगितले आहे.
  • नियमित शुल्कासह ३० जून पर्यंत तर विलंब शुल्कासह १ जुलै ते ४ जुलै २०२२ या कालावधीत अर्ज करता येणार आहे.

माध्यमिक शाळांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरण्याची मुदत ५ जुलै ते ६ जुलै २०२२ पर्यंत आहे. विभागीय मंडळाकडे माध्यमिक शाळांनी शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करण्याची मुदत ७ जुलै २०२२ पर्यंत आहे.

पुरवणी परीक्षा अर्ज लिंक – https://bit.ly/3NptKSK


SSC HSC Supplementary Exam

SSC HSC Supplementary Exam: The result of the SSC HSC Examination has been declared by Maharashtra Board. SSC HSC Exam Important Update Regarding SSC HSC Supplementary Examinations. Complete details on the official website. Further details are as follows:-

महाराष्ट्र बोर्डाकडून दहावी-बारावी परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. आता यानंतर पुरवणी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट जाहीर करण्यात आली आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • महाराष्ट्र शिक्षण बोर्डाकडून जुलै-ऑगस्ट २०२२ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता दहावी आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षा वेळापत्रकाबाबत महत्वाचे अपडेट देण्यात आले आहे.
  • जुलै- ऑगस्ट २०२२ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षेची लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
  • इयत्ता बारावी सर्वसाधारण आणि व्दिलक्षी विषयांची लेखी परीक्षा २१ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे.
  • तर बारावी व्यवसाय अभ्यासक्रमांची परीक्षा २१ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे.

दहावीची पुरवणी परीक्षा २७ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २६ जुलै २०२२ ते ८ ऑगस्ट २०२२ या कालावधीत होणार आहे. बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २० जुलै, २०२२ ते ८ ऑगस्ट २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.

  • या कालावधीमध्ये होणाऱ्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंडळाची अधिकृत वेबसाइट www.mahahsscboard.in वर जाहीर करण्यात आले आहे.
  • ही वेळापत्रकाची सुविधा केवळ माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांत छापील स्वरूपात अंतिम वेळापत्रक मिळणार आहे.
  • त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि परीक्षेस बसावे असे आवाहन बोर्डाकडून करण्यात आले आहे.
  • अन्य वेबसाइटवरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेल्या वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. MahaBharti says

    दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे हॉलतिकीट बुधवारी

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड