टीईटीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Schedule of TET Exam Announced

टीईटीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

नगर  – महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. शिक्षक पात्रता परीक्षा 19 जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. टीईटी परीक्षेसाठी 28 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. टीईटीच्या संकेतस्थळावर या परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने या परीक्षेचे नियम निश्‍चित केले आहेत. शिक्षक पात्रता परीक्षेसाठी उच्च प्राथमिक शिक्षक पदाच्या उमेदवारांना आता पदवीचा विषय घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. शाळांमध्ये शिक्षकांची नोकरी करण्यासाठी 2013 पासून टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परीक्षेला परवानगी मिळावी, यासाठी परीक्षा परिषदेकडून शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला ऑक्‍टोबर महिन्यात मान्यता देण्यात आली. शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यास प्रारंभ केला होता. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकविण्यासाठी पहिला व दुसरा असे दोन्ही पेपर उत्तीर्ण करणे आवश्‍यक आहे. इयत्ता सहावी ते आठवीच्या गटातील उच्च प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्तीसाठी परीक्षेतील दुसरा पेपर उत्तीर्ण होणे आवश्‍यक आहे. टीईटी परीक्षा 150 गुणांची असून, यात 150 वस्तुनिष्ठ प्रश्न विचारण्यात येणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला एक गुण दिला जाणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

टीईटी परीक्षेत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र मराठी, इंग्रजी व्याकरण, गणित परिसर अभ्यास आदी विषयांवरील प्रश्नांचा समावेश राहणार आहे. या परीक्षेची संपूर्ण माहिती परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. विर्द्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.परीक्षेचे वेळापत्रक या प्रमाणेऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी 8 ते 28 नोव्हेंबर, प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे 4 ते 19 जानेवारी, टीईटी परीक्षा पेपर 1 ची वेळ सकाळी 10.30 वाजता, सीईटी पेपर 2 दुपारी 2 वाजता राहणार आहे. काही बदल झाल्यास शिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर तपासून घ्यावे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड