‘Infosys’ देणार शिक्षकांना प्रशिक्षण; राज्यातील 94 हजार शिक्षकांना मिळणार प्रशिक्षणाचा लाभ
Infosys School Teachers Training
Infosys School Teachers Training
Infosys School Teachers Training : The Department of School Education has decided to provide online training for teachers. An agreement has been signed with Infosys for this. Agreement between SCERT and Infosys. 94,000 teachers in the state will benefit from this training. Further details are as follows:-
शिक्षकांसाठी ऑनलाइन प्रशिक्षण देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यासाठी इन्फोसिसशी करार करण्यात आला आहे. ‘भविष्यात राज्यातील शासकीय शाळा डिजिटल करणे, शाळांमध्ये रोबोटिक प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा उभारणे यासाठी; तसेच शिक्षक आणि विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा सहज आत्मसात करता यावी यासाठीही ‘इन्फोसिस’ने सहकार्य करावे,’ अशी अपेक्षा वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
राज्यातील ज्या शिक्षकांना प्रशिक्षणाअभावी वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणीचे लाभ मिळाले नाहीत, अशा शिक्षकांसाठी ऑनलाइन प्रशिक्षण देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यासाठी ‘इन्फोसिस’ या कंपनीची मदत घेतली जाणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (SCERT) आणि इन्फोसिस (Infosys) यांच्यामध्ये झालेल्या कराराद्वारे हा निर्णय घेण्यात आला आहे.
- शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) आणि शिक्षण विभागाचे सचिव रणजित देओल यांच्या उपस्थितीत नुकताच करार करण्यात आला.
- ‘एससीईआरटी’चे संचालक देवेंद्र सिंह, ‘इन्फोसिस’चे कार्यक्रम व्यवस्थापक किरण एन. जी., पुण्याच्या व्यवस्थापक मनोरमा भोई, सहयोगी उपाध्यक्ष सीमा आचार्य, इंजिनीअरिंग अकादमीचे प्रमुख व्हिक्टर सुंदर आदी या वेळी उपस्थित होते.
- शिक्षकांना १२ वर्षे आणि २४ वर्षे सेवा झाल्यानंतर वरिष्ठ श्रेणी; तसेच निवड श्रेणी लागू होते. मात्र, मागील पाच वर्षे प्रशिक्षण कार्यक्रम घेतला नसल्यामुळे हे लाभ देता येत नव्हते.
- हे प्रशिक्षण देण्याबाबत सातत्याने मागणी होत होती. करोनामुळे प्रशिक्षण देणे शक्य झाले नाही.
- त्यामुळे आता करोनाची परिस्थिती निवळल्यानंतर ‘इन्फोसिस’शी करार करून प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- राज्यातील अंदाजे ९४ हजार शिक्षक या प्रशिक्षणाचा लाभ घेतील, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
‘To digitalize government schools in the state in future, to set up robotic laboratories, computer labs in schools; Varsha Gaikwad also hoped that Infosys would work together to make English language easier for teachers and students.
इन्फोसिस कंपनीची मदत घेऊन शिक्षकांना देण्यात येणारे प्रशिक्षण वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणीचे लाभ घेऊ इच्छिणाऱ्या हजारो शिक्षकांना या प्रशिक्षणाचा फायदा होईल.
– वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री