MPSC पोलीस उपनिरीक्षक – शारीरिक चाचणीच्या दिनांकाबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर | MPSC PSI Bharti Physical Schedule
MPSC PSI Bharti Physical Schedule
MPSC PSI Bharti Physical Schedule
MPSC PSI Bharti Physical Schedule: महाराष्ट्र अराजपत्रित, गट-ब सेवा मुख्य परीक्षा-२०२३ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम दिनांक १७ ते २७ डिसेंबर, २०२४ या कालावधीत पोलीस मुख्यालय, रोडपाली, सेक्टर-१७, कळंबोली, नवी मुंबई येथे घेण्यात येणार आहे. सदर शारीरिक चाचणीचा कार्यक्रम सोबतच्या परिशिष्ट ‘अ’ ‘ब’, ‘क’ व ‘ड’ प्रमाणे डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे घेण्यात येईल. तरी शारीरिक चाचणीसाठी अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांनी शारीरिक चाचणीच्या सरावाच्या दृष्टीने कृपया याची नोंद घ्यावी व आवश्यकतेनुसार शारीरिक चाचणीचा सराव करावा. शारीरिक चाचणीचा सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. . पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणीसाठीची सुधारित मानके जाणून घ्या…या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पोलीस महासंचालक कार्यालयाने त्यांच्या अधिनस्त पोलीस मुख्यालय, रोडपाली, सेक्टर १७. कळंबोली, नवी मुंबई येथील मैदान तसेच शारीरिक चाचणीकरिता आवश्यक पोलीस अधिकारी व अंमलदार तेथील कायदा व सुव्यवस्था तसेच पोलीस भरती प्रक्रियेमुळे उपरोक्त कालावधीत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त नेमण्यात येणार असल्याने मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यामध्ये अडचण निर्माण होत असल्याचे कळविले आहे. तसेच माहे ऑक्टोबर-नोव्हेंबर, २०२४ या कालावधीत निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा- २०२३ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणी माहे-डिसेंबर, २०२४ मध्ये घेण्याचे अंदाजे नियोजित आहे, याची कृपया संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. या संदर्भातील परिपत्रक खाली दिलेले आहे.
MPSC PSI Bharti Physical Schedule: Maharashtra Secondary Services Non-Gazetted Group-B Main Examination- 2022 Physical Test of Police Sub-Inspector Cadre to Mumbai from 15th April to 2nd May has been postponed due to Lok Sabha Elections, students are facing agony.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा- २०२२ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची १५ एप्रिल ते २ मे दरम्यान मुंबईला होणारी शारीरिक चाचणी लोकसभा निवडणुकीचे कारण देत पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणीसाठीची सुधारित मानके जाणून घ्या…या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
लोकसभा निवडणूक ही जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालणार आहे. त्यामुळे पावसाळा लागण्यापूर्वी शारीरिक चाचणी न झाल्यास ती पुन्हा चार महिने लांबण्याची भीती आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आयोगाला पत्र लिहून पावसाळा सुरू होण्यापूर्वी शारीरिक चाचणी घ्या, अशी मागणी केली जात आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी) विविध परीक्षा मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीमुळे लांबणीवर पडल्या. त्यामुळे उमेदवारांमध्ये आधीच नाराजीचे वातावरण आहे.. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीची तारीखही ऐन वेळेवर पुढे ढकलण्यात आली
‘एमपीएससी’ने दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मनुष्यबळ आवश्यक आहे. त्यामुळे १५ एप्रिल ते २ मे या कालावधीत होणाऱ्या शारीरिक चाचणीसाठी पोलीस अधिकारी, तसेच इतर मनुष्यबळ पुरवणे शक्य होणार नसल्याचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांनी कळवले आहे. त्यामुळे शारीरिक चाचणी पुढे ढकलण्यात आली असून ती मुंबईलाच होणार आहे
MPSC PSI Bharti Physical Exam Time Table 2024
पोलिस उपनिरीक्षकपदाच्या (पीएसआय) शारीरिक चाचणीसाठी यंदा केवळ एका महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. सूर्याचा वाढता प्रकोप आणि अपुऱ्या वेळेमुळे मागील भरतीच्या तुलनेत महिला उमेदवारांचा टक्का घसरेल, अशी भीती उमेदवारांनी व्यक्त केली आहे. १५ एप्रिल ते दोन मे दरम्यान चाचणी परीक्षेचे वेळापत्रक आखण्यात आले आहे. या पदासाठीच्या शारीरिक चाचणीच्या निकषांमध्ये २०२१ मध्ये बदल करण्यात आला. त्यावेळी उमेदवारांना तयारीसाठी जवळपास एक वर्ष मिळूनही ११२ जागांपैकी ६४ मुली पात्र ठरल्या होत्या. पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणीसाठीची सुधारित मानके जाणून घ्या…या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महिला उमेदवार सुश्मिता (नाव बदललेले) म्हणाली, ‘‘ नुकताच १३ मार्च रोजी मुख्य परीक्षेचा निकाल लागला. एका महिन्यातच शारीरिक चाचणीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
महिला उमेदवारांसाठी निकष बदलण्यात आले आहेत. पोलिस कॉन्स्टेबल पदाचे निकष इतर राज्यांच्या तुलनेत अवघड आहेत. अपुऱ्या वेळेत आणि वाढत्या उन्हाळ्यात तयारी करणे जवळपास अशक्य आहे.’’
महिला उमेदवारांचा टक्का मागील भरतीत घसरला आहे. २०१५ ते २०२१ दरम्यान एमपीएससीने भर उन्हाळ्यात कधीही अशी परीक्षा घेतली नव्हती. परीक्षेचा कालावधी सकाळचा असला तरीही त्यासाठी दररोज उन्हात सराव करावा लागत असल्याचे उमेदवारांनी सांगितले.
उमेदवार म्हणतात
– शारीरिक तयारी करताना उन्हामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे
– मागील भरतीत महिलांच्या ५० टक्के जागा रिक्त राहिल्या, त्यादृष्टीने या भरतीत विचार नाही
– अपुरा वेळ आणि उन्हाच्या तीव्रतेत तयारी करणे आव्हानात्मक
– नव्या निकषांनुसार तयारीसाठी पुरेसा वेळ आणि योग्य वातावरण हवे
– शारीरिक चाचणी पुढे ढकलण्यात यावी
MPSC PSI Bharti Physical Schedule: MAHARASHTRA SUBORDINATE SERVICES, GR-B MAIN EXAMINATION – 2022 , POLICE SUB INSPECTOR Physical Exam Schedule is Published on Official Portal Of MPSC. As Per Published Notification, PSI Physical Exam will be conducted from 15th April 2024 To 27th April 2024 at given location. Download List Of Candidates with Physical Exam date from below link.
The Maharashtra Public Service Commission (MPSC) conducts the Police Sub-Inspector (PSI) recruitment examination to select eligible candidates for the esteemed position of Police Sub-Inspector within the state police force. As part of the rigorous selection process, candidates who qualify the written examination are required to undergo a Physical Examination to assess their physical fitness and endurance. The Physical Exam Time Table outlines the schedule and specific activities that candidates must undergo during this phase of the recruitment process.
महाराष्ट्र अधीनस्थ सेवा, GR-B मुख्य परीक्षा – 2022 , पोलिस उपनिरीक्षक शारीरिक परीक्षेचे वेळापत्रक MPSC च्या अधिकृत पोर्टलवर प्रकाशित केले आहे. प्रकाशित अधिसूचनेनुसार, PSI शारीरिक परीक्षा 15 एप्रिल 2024 ते 27 एप्रिल 2024 या कालावधीत दिलेल्या ठिकाणी घेतली जाईल. खालील लिंकवरून शारीरिक परीक्षेच्या तारखेसह उमेदवारांची यादी डाउनलोड करा.
Physical Exam Time Table:
Date: 15th April 2024 To 27th April 2024
Time: 6:30 AM
Venue: Police Mukhyalaya, Roadpali, Sector-17, Kalamboli, Navi Mumbai. Nearest Railway Station – Mansarovar (Harbour And Transharbour Railway), Navi Mumbai. Nearest Highway – Mumbai-Pune Express highway, Kamothe, Navi Mumbai.
Download MPSC PSI Exam 2022 Physical Time Table PDF
Note:
- Candidates must arrive at the examination venue at least 30 minutes before the scheduled time.
- It is mandatory for candidates to carry their admit card, identification proof, and other necessary documents as specified by the MPSC.
- Candidates should wear appropriate sports attire and footwear for the Physical Efficiency Test.
Conclusion: The MPSC PSI Bharti Physical Exam Time Table provides candidates with a clear schedule of activities and requirements for the Physical Examination phase of the recruitment process. Candidates are advised to adhere to the instructions provided and prepare adequately to demonstrate their physical fitness and suitability for the esteemed position of Police Sub-Inspector within the Maharashtra Police Force.
MPSC PSI Bharti Physical Schedule 2024
MPSC PSI Bharti Physical Schedule: Senior Research Officer, (Grade-2), Tribal Development Department, Group-A (Advertisement No. 15/2020) for the post of Senior Research Officer, Group-A (Advertisement No. 15/2020) Interview of the candidates who have qualified for the screening test and post-scrutiny interview respectively conducted by the Maharashtra Public Service Commission at the Commission’s Navi Mumbai, CBD Belapur, Office has been held on March 28, 2024. Candidate wise schedule of interviews will be announced separately.
वरिष्ठ संशोधन अधिकारी, (श्रेणी-२), आदिवासी विकास विभाग, गट-अ (जाहिरात क्रमांक १५/२०२०) या संवर्गाच्या पदभरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या अनुक्रमे चाळणी परीक्षेच्या निकालान्वये व छाननीअंती मुलाखतीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती आयोगाच्या नवी मुंबई, सीबीडी बेलापूर, कार्यालय येथे दिनांक २८ मार्च, २०२४ रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिध्द करण्यात येईल. पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणीसाठीची सुधारित मानके जाणून घ्या…या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Download MPSC Police Sub-Inspector PDF
MPSC PSI Bharti Revised New Physical Schedule
MPSC PSI Bharti Physical Schedule: Maharashtra Secondary Services Non-Gazetted Group-B (Main) Examination – 2021 (Police Sub-Inspector) Result Dated 21 It has been announced on November, 2022. The physical test program for the qualified candidates in the said examination is scheduled to be held from 2nd November 2023 31st October, 2023. The said physical test program will be conducted through digital technology based system as per annexure ‘A’ and ‘B’. The detailed schedule of physical test will be announced separately on the Commission’s website https://mpsc.gov.in. However candidates who have qualified for physical test please note this in terms of physical test practice and practice for physical test as per requirement.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब (मुख्य) परीक्षा २०२१ अंतर्गत पोलिस उपनिरीक्षक संवर्गासाठी अखेर शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही चाचणी होणार असून, पंधराशे उमेदवारांना निवडीसाठी याद्वारे संधी उपलब्ध करून दिली जाईल. कोरोना महामारीमुळे स्पर्धा परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक विस्कळित झाले होते. त्यामुळे अद्यापही अनेक परीक्षांची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. यापैकीच २०२१ च्या काही परीक्षांचाही समावेश आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब (मुख्य) परीक्षा २०२१ अंतर्गत पोलिस उपनिरीक्षक संवर्गाच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला होता.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ०९ जुलै, २०२२ (पेपर क्र. १) व दिनांक १७ जुलै, २०२२ (पेपर क्र. २) रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब (मुख्य) परीक्षा – २०२१ (पोलीस उपनिरीक्षक) चा निकाल दिनांक २१ नोव्हेंबर, २०२२ रोजी जाहीर करण्यात आला आहे. प्रस्तुत परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम दिनांक 2 नोव्हेंबर २०२३
३१ ऑक्टोबर, २०२३पासून घेण्याचे नियोजित आहे. सदर शारीरिक चाचणीचा कार्यक्रम सोबतच्या परिशिष्ट ‘अ’ व ‘ब’ प्रमाणे डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे घेण्यात येईल. शारीरिक चाचणीचा सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. तरी शारीरिक चाचणीसाठी अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांनी शारीरिक चाचणीच्या सरावाच्या दृष्टीने कृपया याची नोंद घ्यावी व आवश्यकतेनुसार शारीरिक चाचणीसाठी सराव करावा. पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणीसाठीची सुधारित मानके जाणून घ्या
त्यानंतरपासून उत्तीर्ण उमेदवारांना शारीरिक चाचणीच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा लागून होती. ही प्रतीक्षा आता संपली असून, उमेदवारांना चाचणीला सामोरे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी जारी केलेल्या सूचनापत्रकानुसार ही चाचणी ३१ ऑक्टोबरपासून घेण्यात येणार होती.
डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे ही चाचणी घेण्यात येणार होती; परंतु काही अपरिहार्य प्रशासकीय कारणास्तव ही चाचणी २ ते १० नोव्हेंबर या कालावधीत घेतली जाणार आहे. पात्रताधारक उमेदवारांची सविस्तर यादी प्रसिद्ध केली असून, त्यांच्या नावापुढे चाचणीची तारीख नमूद केलेली आहे.
शारीरिक चाचणीचे असे असेल स्वरूप…
पुरुष उमेदवारांसाठी ८०० मीटर धावणे, पुलअप्स, गोळाफेक, लांब उडी या क्रीडा गटांतून चाचणी घेतली जाणार आहे; तर महिला उमेदवारांसाठी धावणे, लांब उडी, गोळाफेक या प्रकारांची चाचणी घेतली जाईल. वेळ, अंतरासंदर्भातील कामगिरीच्या आधारे गुणांकन केले जाणार आहे. नवी मुंबई येथील पोलिस मैदानावर ही चाचणी घेतली जाईल.
PT Centre :
Police Mukhyalaya, Roadpali, Sector-17, Kalamboli, Navi Mumbai. Nearest Railway Station – Mansarovar
(Harbour And Transharbour Railway), Navi Mumbai. Nearest Highway – Mumbai-Pune Express highway,
Kamothe, Navi Mumbai
Download Full MPSC PSI Bharti Physical Schedule(Revised On 13 October 2023)
MPSC PSI Bharti Physical Schedule
MPSC Exam Interview Schedule – Physical Test program for Police Sub-Inspector Cadre from 04 September 2023 to 09 September 2023 at Pune is being postponed due to heavy rains. The revised program will be released separately. . Maharashtra Secondary Services Non-Gazetted Group B (Main) Examination 2021 for Police Sub-Inspector Cadre Physical Test was conducted from 4th September, 2023 to 9th September, 2023 at State Reserve Police Force, Group No.1, Ramtekdi, Hadapsar, Pune. was However, due to heavy rains in Pune from the midnight of 1st September, 2023, the said physical test program has been postponed.
जा. क्र. 49/2022 – पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरिता दि. 04 सप्टेंबर 2023 ते 09 सप्टेंबर 2023 या कालावधीत पुणे येथे आयोजित शारीरिक चाचणीचा कार्यक्रम मुसळधार पावसामुळे पुढे ढकलण्यात येत आहे. सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.“या” उमेदवारांसाठी PSI 2020 शारीरिक चाचणीचे निकष बदलतील – MPSC PSI LDME Physical Test Details 2023या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीबाबत संदर्भ:- आयोगाचे दिनांक १९ ऑगस्ट, २०२३ रोजीचे प्रसिध्दीपत्रक. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब (मुख्य) परीक्षा २०२१ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारिरीक चाचणी दिनांक ४ सप्टेंबर, २०२३ ते दिनांक ९ सप्टेंबर, २०२३ या पूर्वनिर्धारीत कालावधीत, राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक १, रामटेकडी, हडपसर, पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. तथापि, दिनांक १ सप्टेंबर, २०२३ च्या मध्यरात्रीपासून पुण्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सदर शारीरिक चाचणीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत आहे.
२. शारीरिक चाचणीच्या सुधारित तारखांबाबत आयोगामार्फत स्वतंत्रपणे घोषणा करण्यात येईल.
MPSC PSI Revised program
MPSC PSI Bharti Physical Schedule: Based on the result declared on November 17, 2022 for the written examination of Police Sub-Inspector Mains Examination-2020, the physical test program of the candidates who have qualified for the physical test has been issued. As Per MPSC PSI Bharti Physical Schedule exam is scheduled from 8th February 2023 to 17th February 2023 at Nashik Center. MPSC Physical Exam Test will be conducted as follows.
जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठी दिनांक 9 ते 18 जानेवारी 2023 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे आयोजित शारीरिक चाचणीचा कार्यक्रम प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आला होता. सदर शारीरिक चाचणीचा कार्यक्रम दिनांक ८ ते १७ फेब्रुवारी, २०२३ या कालावधीत खालीलप्रमाणे घेण्यात येणार आहे:.. “या” उमेदवारांसाठी PSI 2020 शारीरिक चाचणीचे निकष बदलतील – MPSC PSI LDME Physical Test Details 2022
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित, गट-ब (मुख्य) परीक्षा – २०२० या परीक्षेतील पोलीस उपनिरीक्षक या संवर्गाचा शारीरिक चाचणीचा कार्यक्रम संदर्भाधीन क्रमांक २ च्या प्रसिद्धीपत्रकान्वये प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आला होता. सदर शारीरिक चाचणीचा कार्यक्रम दिनांक ८ ते १७ फेब्रुवारी, २०२३ या कालावधीत खालीलप्रमाणे घेण्यात येणार आहे:
MPSC PSI Bharti Physical Test Time Table 2022
शारीरिक चाचणीचा दिनांक | शारीरिक चाचणीचे मैदान | वेळ |
दिनांक ८ ते १७ फेब्रुवारी, २०२३ | महाराष्ट्र पोलीस अकादमी, त्र्यंबक रोड, नाशिक | सकाळी ६.३० वा. |
- शारीरिक चाचणीचा तपशीलवार कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. शारीरिक चाचणीच्या दिनांकाच्या अनुषंगाने संबंधित उमेदवारांनी शारीरिक चाचणीकरीता शारीरिक चाचणीच्या मैदानावर विहित दिनांकास व विहित वेळेवर उपस्थित रहावे.
- शारीरिक चाचणीचे पत्र उमेदवारांच्या प्रोफाईलवर स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात येईल.
PSI Mains Exam PT Schedule Download – https://bit.ly/3j1l8bz
Old Update
पोलीस उपनिरीक्षक PSI 2020 दिनांक 9 ते 18 जानेवारी 2023 या कालावधीत नाशिक येथे आयोजित शारीरिक चाचणीचा कार्यक्रम प्रशासकीय कारणास्तव पुढं ढकलण्यात येत आहे.
सविस्तर माहिती – https://bit.ly/3j1l8bz
MPSC PSI Bharti Physical Schedule: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणीच्या मानकांमध्ये सुधारणा करण्यात येऊन शारीरिक चाचणीचे गुण अर्हताकारी (किमान ६० टक्के गुण) करण्या आले असल्याचे तसेच सदर सुधारणा सन २०२० च्या होणाऱ्या स्पर्धा परीक्षेपासून लागू राहतील, असे आयोगाच्या संदर्भिय दिनांक २५ मे, २०२१ रोजीच्या घोषणेनुसार उमेदवारांना कळविण्यात आले होते.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आयोगाच्या दिनांक २५ मे, २०२१ रोजीच्या घोषणेद्वारे पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीसाठी लागू करण्यात आलेले बदल / मानके महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा – २०२० च्या शारीरिक चाचणीसाठी लागू न करण्याचा निर्णय आयोगाकडून घेण्यात आला आहे. प्रस्तुत परीक्षेच्या पदभरतीच्या जाहिरातीच्या वेळी लागू असलेला तसेच फेब्रुवारी, २०१८ मध्ये प्रसिद्ध केलेल्या शारीरिक चाचणीच्या मानकानुसार शारीरिक चाचणी आयोजित करण्यात येईल. “या” उमेदवारांसाठी PSI 2020 शारीरिक चाचणीचे निकष बदलतील – MPSC PSI LDME Physical Test Details 2022
फेब्रुवारी, २०१८ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या शारीरिक चाचणीच्या घटकांची मानके सोबतच्या परिशिष्ट-अ (पुरुष उमेदवारांकरीता) व परिशिष्ट-ब (महिला उमेदवारांकरीता) प्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
प्रस्तुत परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या शारीरिक चाचणी व मुलाखतीचा कार्यक्रम आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. तरी शारीरिक चाचणीसाठी अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांनी शारीरिक चाचणीच्या सरावाच्या दृष्टीने कृपया याची नोंद घ्यावी व आवश्यकतेनुसार शारीरिक चाचणीसाठी सराव करावा.
सविस्तर माहिती – https://bit.ly/3j1l8bz
Table of Contents