नामांकित कंपनीच्या भरती प्रक्रियेत राज्य मंडळाच्या शिक्षणाला नकार!!
Company Job Interview
Company Job Interview
Company Job Interview: मुंबई, ठाण्यात सीबीएसई, आयसीएसई शाळांची संख्या वाढत असताना राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना धोका निर्माण झाला आहे. यातच भारतातील एका नामांकित कंपनीने त्यांच्याच एका उपकंपनीच्या ठाण्यातील पोखरण रस्ता क्र. २ येथील शाखेत भरती प्रक्रिया सुरू केली. ही भरती करताना किमान शैक्षणिक पात्रतेत पदवीधर ही अट दिली आहे. याचबरोबर कंसात बारावीपर्यंतचे शिक्षण आयसीएसई किंवा सीबीएसई मंडळातील शाळांमधून होणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे.
नामांकित कंपनीच्या उपकंपनीमध्ये ठाणे शाखेत मुलाखतीचा फलक लावण्यात आला आहे. यामध्ये पदवीधर ही किमान अट असून उमेदवाराचे बारावीपर्यंतचे शिक्षण सीबीएसई किंवा आयसीएसई मंडळातूनच (CBSE ICSE Board) झालेले असावे, असेही नमूद केले आहे. यामुळे याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याचबरोबर कंसात बारावीपर्यंतचे शिक्षण आयसीएसई किंवा सीबीएसई मंडळातील शाळांमधून होणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. यामुळे हा प्रकार म्हणजे राज्य शिक्षण मंडळातून शिक्षण घेतलेल्या हजारो इच्छुक उमेदवारांवर अन्याय आहे, अशी प्रतिक्रिया उमटत आहे. सोमवारी ही मुलाखत प्रक्रिया सुरू असताना काही उमेदवारांनी तेथे लावलेल्या फलकाचे छायाचित्र टिपले आणि सोशल मीडियावर शेअर केले.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
मुंबई महानगरपालिकेने यापूर्वीच राज्य मंडळाच्या शाळांमध्ये सीबीएसई, आयसीएसईचे शिक्षण सुरू करण्याचा प्रकार सुरू केला आहे. यातच आता खासगी कंपन्याही अशा अटी घालत आहेत. हा प्रकार म्हणजे मराठी आणि राज्य मंडळाची गळचेपी असल्याची टीका ‘मराठी शाळा टिकवल्याच पाहिजेत’ या फेसबूक पेजचे समन्वयक प्रसाद गोखले यांनी केली. पदवीधर ही अट मान्य आहे. यानंतर त्या कंपनीने त्यांना आवश्यक ती कौशल्ये उमेदवारांमध्ये आहेत की नाही, हे मुलाखतीदरम्यान तपासून घ्यावे, मात्र त्यासाठी उमेदवार राज्य मंडळाच्या शाळेतून शिकला म्हणून त्याला संधीच न देणे हे चूक असल्याचेही ते म्हणाले.
सरकार काय भूमिका घेणार?
- मराठी शाळा संस्थाचालक संघाचे समन्वयक सुशील शेजुळे म्हणाले की, ‘मराठी माध्यमातील मुलांकडे गुणवत्ता असूनही सीबीएसई व आयसीएसई मंडळात शिकलेल्या मुलांनाच नोकरी दिली जाणार असेल, तर संबंधित कंपनीच्या इतर उत्पादनावर बहिष्कार टाकण्याबाबत विचार करावा लागेल.
- ही अट तत्काळ रद्द करावी.
- यापूर्वी मुंबई महापालिकेने मराठी माध्यमात शिकलेल्या मुलांना नोकरी नाकारून हा पायंडा पाडला आहे.
- मराठीची भूमिका नाकारून असा पायंडा पाडणारी महानगरपालिका काही वर्षांपासून ज्यांच्या ताब्यात आहे, त्यांचाच राज्यात मुख्यमंत्री आहे.
- या अन्यायाबाबत सरकार म्हणून काय भूमिका घेणार, याची आम्ही वाट पाहू, असेही ते म्हणाले.