१०० जागांसाठी दोन लाख अर्ज!
सैन्यात जवान पदासाठी पहिल्यांदाच महिलांची भरती आहे. या भरतीला तुफान प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या प्रमाणात महिला अर्ज करीत आहेत. एकूण 100 जागांच्या भरतीसाठी दोन लाख महिलांनी अर्ज केले आहेत. दरम्यान आतापर्यंत सशस्त्र दलात महिलांची केवळ अधिकारी पदासाठीच भरती केली जात होती. सैन्य दलाने पहिल्यांदाच महिला प्रोवोस्ट युनिट तयार करण्याचा विचार सुरू केला आहे.
ही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 8 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.जवानांच्या पदासाठी 1,700 महिलांची भरती करण्याची सैन्य दलाची योजना असून येत्या 17 वर्षांत टप्प्याटप्प्यात ही भरती करण्यात येणार आहे. महिलांना सैनिक म्हणून मिलिट्री पोलीस कोरमध्ये भरती करणे हे क्रांतीकारक पाऊल आहे. 25 एप्रिलपासून मिलिट्री पोलीस कोरमध्ये भरती सुरू करण्यात आली आहे.