पॉलिटेक्निक प्रवेशासाठी ९ जुलैपर्यंत मुदतवाढ!! येथे करा नोंदणी – DTE Maharashtra Polytechnic Admission 2024
DTE Maharashtra Polytechnic Admission 2024 -dte.maharashtra.gov.in
DTE Maharashtra Polytechnic Admission 2024 -dte.maharashtra.gov.in
तंत्रशिक्षण संचलनालयातर्फे सुरु असलेल्या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेससाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत २५ जून होती. मात्र विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता संचालनालयाने अर्ज करण्यासाठी ९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन वेळापत्रकानुसार प्रवेशाची अंतिम गुण- वत्ता यादी १६ जुलैला जाहीर केली जाणार आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
राज्यात ३९० संस्थात सुमारे १ लाख ५ हजार प्रवेश जागा आहेत. मंगळवार सायंकाळपर्यंत १ लाख २७ हजार ५५३ उमेदवारांनी नोंदणी केली आहे तर त्यापकी १ लाख ०४ हजार ३३१ विद्यार्थ्यांनी शुल्क भरणा केले आहेत. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता तसेच विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रेमिलयेर प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळण्यास होणारा उशीर विचारात घेऊन अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात येत असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा तपशील तसेच अर्ज भरण्यासाठी dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. पदविका प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन असून विद्यार्थ्यांना प्रत्येक पॉलिटेक्निकसाठी वेगळा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. त्यांना अर्ज भरण्यासाठी काही अडचणी आल्यास ते जवळच्या सुविधा केंद्राची विनाशुल्क मदत घेऊ शकणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अपुरे अर्ज भरले आहेत. त्या विद्यार्थ्यांना मुदतवाढीची संधी असल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालकड डॉ. विनोद मोहितकर यांनी सांगितले.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
नवे वेळापत्रक
• ऑनलाइन अर्ज ९ जुलैपर्यंत
• कागदपत्र पडताळणी आणि अर्ज निश्चिती : ९ जुलैपर्यंत
• तात्पुरती गुणवत्ता यादी : ११ जुलै
• गुणवत्ता यादीवरील आक्षेप : १२ व १४ जुलै
• अंतिम गुणवत्ता यादी : १६ जुलै
दहावीचा निकाल लागल्यानंतर, बुधवारी २९ मेपासून पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने दहावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमासाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावीनंतर तीन वर्षांचा हा अभ्यासक्रम असून सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, अणुविद्युत, कॉम्प्युटर, केमिकल या शाखांसाठी प्रवेश घेता येईल. या प्रवेशप्रक्रियेचा तपशील, ऑनलाइन अर्ज https:// dte.maharashtra.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध होईल. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
निकल, अणुविद्युत, कॉम्प्युटर, केमिकल या शाखांसाठी प्रवेश घेता येईल. या प्रवेशप्रक्रियेचा तपशील, ऑनलाइन अर्ज https:// dte.maharashtra.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध होईल. तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत तंत्रनिकेतन पदविका (पॉलिटेक्निक) प्रथम वर्ष अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला दहावीचा निकाल जाहीर होताच प्रारंभ होणार आहे. राज्यात यंदा ३००हून अधिक संस्थांमध्ये सुमारे १ लाखाहून अधिक प्रवेशक्षमता आहे. या जागावर प्रवेश करण्यासाठी तंत्र शिक्षण संचालनालयाने प्रवेश प्रक्रिया जाहीर केली जाणार आहे. याचवेळी प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार आहे.
राज्यभरात ३००हून अधिक संस्थांमध्ये १ लारवाहून अधिक प्रवेशक्षमता
पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज ऑनलाईन नोंदणी, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी, अर्ज करणे ही प्रक्रिया करता येणार आहे. पॉलिटेक्निक अभ्यासक्रम शिकण्यासाठी मराठी-इंग्रजी (द्विभाषिक) पर्यायही आहे. यामधून ३३ हजार ७०८ विद्यार्थ्यांनी या दोन्ही भाषेतून शिक्षण घेण्याचा पर्याय निवडला होता. तंत्रशिक्षणातील पदविका हा रोजगारक्षम अभ्यासक्रम म्हणून एक उत्तम पर्याय ठरत असल्याने दहावी उतीर्ण विद्यार्थ्यांनी गतवर्षी अभ्यासक्रमांना पसंती दर्शवली होती.
गतवर्षी ८६ हजार ४७२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. मॅकेनिकल इंजिनिअरिंग, कम्युटर इंजिनियरिंग, सिव्हिल इंजिनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग आदी अभ्यासक्रमांना मोठी पसंती दर्शवली होती. विद्यार्थ्यांना प्रवेश फेरी दरम्यान कागदपत्रांच्या पडताळणीसाठी आणि जागा स्वीकृतीसाठी एआरसी केंद्राकडे जाण्याची यावर्षी गरज नाही. विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्यानंतर दिलेला प्रवेश हा नियमांनुसार आहे किंवा नाही याची पडताळणी स्वतः लॉगिन मधून करता येणार आहे. जागा स्वीकृतीची कार्यवाहीसाठी लॉगीनमधून पूर्ण करण्याची सुविधाही असणार आहे.
- शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील इ.10 वी नंतरच्या प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी संस्थांची सुविधा केंद्र (Facilitation Centre) म्हणून नियुक्ती करणेबाबत
- शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील पदविका अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत (CAP) प्रवेशासाठी संस्थांची माहिती पडताळणी करुन अद्ययावत करणेबाबत
DTE Poly Admission Time Table 2024
महाराष्ट्र राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचालित व खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमधील पदविका अभ्यासक्रमांची शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (कॅप) लवकरच सुरू करण्यात येणार असून प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक संचालनालयाद्वारे लवकरच प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने इयत्ता १०वी नंतरच्या अभियांत्रिकी / तंत्रज्ञान / वास्तुकला पदविका अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी सुविधा केंद्र (FC) म्हणून नियुक्त केलेल्या संस्थांची यादी सोबत जोडली आहे.
सुविधा केंद्रांच्या सर्व प्राचार्यांनी / संचालकांनी इयत्ता १०वी नंतरच्या पदविका अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी आणि द्वित्तीय वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी आवश्यक मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.
सुविधा केंद्रांकडे सोबतच्या प्रपत्र “अ” नुसार किमान आवश्यक सुविधा आवश्यक राहतील. तसेच प्रपत्र “ब” मध्ये सुविधा केंद्रांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या नमूद केलेल्या आहेत. त्याप्रमाणे व वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांप्रमाणे जबाबदारीने, सचोटीने व अचूकपणे कर्तव्ये पार पाडावीत.
सुविधा केंद्र प्रमुखांना कळविण्यात येते की, ऑनलाईन अर्ज भरणे सुरू होण्यापूर्वी सोबतच्या प्रपत्र “अ” नुसार सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सहजतेने पार पाडण्यासाठी आवश्यकतेनुसार ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी प्रथम व द्वितीय वर्षासाठी स्वतंत्र सुविधा केंद्र सुरू करणे आवश्यक आहे.
या संचालनालयातील डॉ. उमेश कोकाटे, प्रणाली व्यवस्थापक हे सुविधा केंद्रांसाठी मुख्य समन्वयक म्हणून काम पाहतील. सुविधा केंद्र प्रमुख यांनी अधिक माहितीसाठी या कार्यालयाशी ०२२-६८५९७४५९/६८५९७४६५/६८५९७४६९/ ६८५९७४६६/६८५९७४९२/६८५९७४६८ या दूरध्वनींवर संपर्क साधावा.
टीपः – प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार सर्व सुविधा केंद्रे स.१०.०० ते सायं. ६.०० पर्यंत (सुट्टीसहित) सुरु राहतील.
दि.२९ मे ते २५ जून या कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्जनोंदणी, पडताळणी व अर्ज निश्चिती करावी लागणार आहे. याच कालावधीत अर्जाची छाननी होणार आहे. अपलोड केलेल्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. दि. २७ जून रोजी तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत..
दि. २८ ते ३० जून या कालावधीत तात्पुरत्या याद्यांमध्ये तक्रार नोंदवता येतील
DTE Maharashtra Polytechnic Admission 2023 -dte.maharashtra.gov.in: Students have been given an extension to fill applications for admission to engineering diploma courses after class 10th. According to this decision of the Directorate of Technical Education, students are now allowed to submit their admission applications till July 7. Due to difficulties faced by students and delay in college recognition by AICTE, the admission process has been extended once again. The Directorate of Technical Education has given information about this extension on its official website.
दहावीनंतर तंत्रज्ञान विश्वातील शिक्षणासाठी डिप्लोमा हा एक उत्तम पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे डिप्लोमा प्रवेशाला विद्यार्थ्यांचाही उत्तम प्रतिसाद मिळतो. महाराष्ट्रात यंदा इंजिनिअरिंग डिप्लोमासाठी एकूण ३७५ संस्थामध्ये मिळून साधारणपणे १ लाख जागा उपलब्ध आहेत.या जागांसाठी, १ जूनपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची आणि पडताळणीची सुरुवात झाली होती. २१ जून ही अर्ज सादर करण्याची आणि तपासणीची अंतिम तारीख होती. परंतु, विविध अडचणींमुळे, दिलेल्या वेळेत विद्यार्थ्यांकडून अर्ज सादर न झाल्यामुळे तंत्रशिक्षण संचालनालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
विविध आरक्षणांअंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी, विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरताना आणि पडताळणीच्या वेळी जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्रवेश अर्जासोबत सादर करणे अनिवार्य असते. परंतु, अशी कागदपत्र मिळवण्यासाठी विलंब होत आहे. शिवाय, ऑनलाइन अर्ज भरण्यासाठीही विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या. या सगळ्या गोष्टींचा विचार करून तंत्रशिक्षण संचालनालयाने अर्ज सादर आणि तपासणी करण्याच्या प्रक्रियेला जून महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच, ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडून (एआयसीटीई) कॉलेजांना मान्यता मिळण्यास विलंब होत आहे. शिवाय, विद्यार्थ्यांकडील कागदपत्रांअभावी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत विविध अडचणी येत असल्यामुळे, तंत्रशिक्षण विभागाने अर्ज करण्याच्या तारखेत पुन्हा एकदा मुदतवाढ केली आहे. त्यामुळे, तंत्र शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या नवीन तारखेनुसार विद्यार्थ्यांना आता ७ जुलैपर्यंत प्रवेश अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली आहे.
DTE Poly Admission New Time Table 2023
डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेच्या सुधारीत वेळापत्रकानुसार,
- – विद्यार्थ्यांना ७ जुलैपर्यंत प्रवेश अर्ज भरता आणि पडताळणी करू घेता येतील.
- – तंत्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने १० जुलैला प्रवेशासंदर्भात तात्पुरती गुणवत्ता यादी (Provisional Merit List) प्रसिद्ध केली जाईल.
- – ११ आणि १२ जुलैला अर्जामधील त्रुटी आणि सुधारणा नोंदवता येईल.
- – १४ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit List) प्रसिद्ध केली जाईल.
DTE Maharashtra Polytechnic Admission 2023-24 @poly23.dtemaharashtra.gov.in/diploma23
DTE Maharashtra Polytechnic Admission 2023: Admission to first year engineering degree courses after 10th for the academic year 2023-24 will start from 1st June 2023. Higher and Technical Education Minister Chandrakant Patil informed that a web portal https://dte.maharashtra.gov.in (poly23.dtemaharashtra.gov.in/diploma23) has been developed by the Department of Technical Education to make this admission process easier and simpler. This web portal was inaugurated by the Minister of State Chandrakant Patil in the Ministry on Wednesday. Principal Secretary of Higher and Technical Education Department Vikas Chandra Rastogi, Director of Technical Education Vinod Mohitkar were present on this occasion.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशास उद्यापासून (ता. १) सुरुवात होणार आहे. यात दहावीनंतर अभियांत्रिकी पदविकेच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश अर्ज भरता येतील. यासाठी तंत्रशिक्षण विभागाकडून https://dte.maharashtra.gov.in (poly23.dtemaharashtra.gov.in/diploma23) हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
मंत्रालयात मंत्री पाटील यांच्या हस्ते या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्रशिक्षण संचालक विनोद मोहितकर उपस्थित होते. दहावीनंतरच्या प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्षाच्या अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज भरणे, समुपदेशन करणे, प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्यामध्ये ३२८ सुविधा केंद्रांची स्थापना तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे करण्यात आलेली आहे आणि त्याची यादी प्रवेशाच्या संगणकीय प्रणालीवर देण्यात येणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता एकूण ३७५ संस्थांची प्रवेश क्षमता जवळपास १ लाख असून त्यात मराठी-इंग्रजी (द्विभाषिक) माध्यमातून अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांची सोय म्हणून, दहावीचा निकाल घोषित होण्यापूर्वी प्रवेश प्रक्रियेचे अर्ज भरण्याची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या आयोजित करण्यात येणार आहेत. यावर्षी ऑनलाईन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया मोबाईल ॲपवरही उपलब्ध असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.
- 10 वी नंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी 10 वी चा निकाल घोषित होण्यापूर्वी प्रवेशप्रक्रियेसाठी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज ,ऑनलाईन नोंदणी कागदपत्रांच्या स्कॅन, छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी, अर्ज करणे ही प्रक्रिया दि. 01 जून 2023 पासून सुरु करण्यात येणार आहे.
- केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या आयोजित करण्यात येणार आहेत. यावर्षी ऑनलाईन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया ही मोबाईल ॲपवर सुद्धा उपलब्ध आहे.
- विद्यार्थी त्यांचा केवळ दहावी/बारावीचा आसन क्रमांक नमूद करून अर्ज भरू शकतील व निश्चित करू शकतील. विद्यार्थ्यांचे प्राप्त गुण सॉफ्टवेअर प्रणालीद्वारे अर्जामध्ये नमूद करण्यात येतील. तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे कागदपत्रांच्या प्रत्यक्ष छाननी प्रक्रिये व्यतिरिक्त ई-स्क्रुटीनीची संकल्पना राबविण्यात येणार आहे.
- दहावीनंतरच्या प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्षाच्या अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या सोयींसाठी व त्यांना प्रवेश अर्ज भरणे, त्यांचे समुपदेशन करणे, प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्यावर विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्यामध्ये ३२८ सुविधा केंद्रांची स्थापना तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे करण्यात आलेली आहे आणि त्याची यादी प्रवेशाच्या संगणकीय प्रणाली वर देण्यात येणार आहे.
- सुविधा केंद्रांना उद्भवणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नोडल अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत. सुविधा केंद्रांना / संस्थांना प्रवेश प्रक्रियेसंबंधी काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण आल्यास त्याचे निवारण नोडल अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे.
- विद्यार्थ्यांना माहितीसाठी प्रवेशप्रक्रियेचे टप्पे उदा. नोंदणी करणे, अर्ज निश्चित करणे, छाननीची पद्धत निवडणे, हरकती नोंदवणे, विकल्प नमुना भरणे, इ. या महत्वाच्या टप्प्याचे व्हिडीओ संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या संकेतस्थळावर पदविका प्रवेश प्रक्रियेची थोडक्यात माहिती देणारे सादरीकरण, विद्यार्थ्यांना पदविका तंत्रशिक्षणाबद्दल माहिती देणारे शाखानिहाय माहिती चित्रपट देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
- सर्व सुविधा केंद्रांवर विद्यार्थ्यांना मदत केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यापासून ते अगदी संस्थांमध्ये प्रवेश घेण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्याने प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे माहिती देण्यात येणार आहे.
- ज्या उमेदवाराला कॅपफेरी दरम्यान जागा वाटप केली गेली जाईल त्यांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी आणि जागा स्वीकृतीसाठी एआरसीकडे जाण्याची अट यावर्षीही शिथिल करण्यात आलेली आहे.
- जागा वाटप झाल्यानंतर, उमेदवारांनी त्याला/तिला कॅप फेरीदरम्यान दिलेले जागा वाटप हे नियमांनुसार आहे किंवा नाही याची पडताळणी स्वत: लॉगिन मधून करु शकणार आहे व त्यानुसार उमेदवारांना जागा स्वीकृतीची कार्यवाही त्यांच्या लॉगीन मधून पूर्ण करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
ONLINE REGISTRATION FOR DTE ADMISSION: –
Sr.No | Type of Candidature | Fee in Indian Rupees |
---|---|---|
1 | General Category Candidates from Maharashtra State, Outside Maharashtra State (OMS), J & K And Ladakh Migrant candidates. | 400 |
2 | Reserved Category Candidates [SC, ST, VJ/DT- NT(A), NT(B), NT(C), NT(D), OBC, SBC, EWS] & Persons with Disability Candidates belonging to Maharashtra State only.. | 300 |
Maharashtra DTE Diploma Admission Process 2023
- Diploma Information Brochure (Marathi) 2023-24 (01-06-2023)
- Diploma Information Brochure (English) 2023-24 (01-06-2023)
SCHEDULE OF ACTIVITIES FOR ADMISSION TO FIRST YEAR OF POST SSC DIPLOMA TECHNICAL COURSES IN ENGINEERING/TECHNOLOGY FOR THE ACADEMIC YEAR 2023-24
The activities and scheduled dates for Maharashtra State/All India/J & K & Ladakh Migrant candidates are as follows. | |||
---|---|---|---|
Sr. No | Activity | Schedule | |
First Date | Last Date | ||
1 | Online registration of application and uploading of required documents by the Candidate for admission on website by selecting appropriate mode of scrutiny of Application form (For Maharashtra State/All India/ J&K & Ladakh Migrant candidates) |
01-06-2023
|
21*-06-2023
|
2 | Documents verification and confirmation of Application Form for Admission. a) For E-Scrutiny Mode selected candidates:1. Such candidate shall fill online application form and upload the required documents from any computer/smartphone connected to internet from anywhere.2. Such candidate need not have to visit to FC for verification and confirmation of the application form. His/Her application & documents shall be verified and confirmed by the FC through e-Scrutiny Mode.3.During e-Scrutiny of Application Form of such candidate:
b) For Physical Scrutiny Mode selected Candidates: 1.Such candidate shall visit the facilitation Center online selected by himself/herself, along with the required documents as per the allotted time slot for online filling, scanning & uploading of required documents, verification and confirmation of application form. 2.After verification & Confirmation of application form, FC shall issue the receipt cum Acknowledgement. 3.The status of Confirmation shall be available in candidates Login along with receipt cum Acknowledgement. |
01-06-2023
|
26*-06-2023
|
**Facility of Online Registration & Documents verification, confirmation of Application Form for Admission to Seats other than CAP Seats shall be continued till the Cut off date of admission. Applications registered, verified & confirmed through e-Scrutiny Mode or Physical Scrutiny Mode after Last Date i.e. 21-06-2023 shall be considered only for Institute Level/Against CAP Seats. | |||
3 | Display of the provisional merit list for Maharashtra State/All India/J & K Migrant candidates on website. |
23-06-2023
|
|
4 | Submission of grievance, if any, for all type of Candidates: a) For E-Scrutiny Mode selected candidates: 1.Candidate shall raise the Grievance about correction required in the data displayed in provisional merit list through his/her Login.. 2.The application of such candidates shall be reverted back to the candidate in his/her Login for rectification. . 3.Candidate shall upload the requisite documents to substantiate the claim for any correction/concession.. 4.The status of acceptance/rejection of Grievance raised bycandidate shall be available in candidates Login along with latest receipt cum Acknowledgement.. b) For Physical Scrutiny Mode selected Candidates: 1.Candidate shall submit the Grievance about correction required in the data displayed in provisional merit list by reporting at FC where he has already confirmed his/her application form.. 2.Candidate shall submit the requisite documents to substantiate the claim for any correction/concession at FC.. 3.FC shall issue the latest receipt cum Acknowledgement. |
24-06-2023
|
27-06-2023
|
5 | Display of the final merit lists of Maharashtra State/All India/ J & K and Ladakh Migrant candidates on website.. |
29-06-2023
|
New!The Registration Process for A.Y 2023-24 Started. New!Admission registration through mobile app (Android/IOS) will start soon.
|
Table of Contents
New Admission Start