7 हजार तरुणांना मिळणार नौकानयनाचे प्रशिक्षण!
7 Thousand Training by Maharashtra Maritime Board
Training by Maharashtra Maritime Board – महाराष्ट्र राज्यातील नौकानयन क्षेत्राच्या वाढीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने नवीन-नवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत. या विविध उपक्रमांचा भाग म्हणून देशातील पहिल्या सागरी विद्यापीठासोबत (Maharashtra Maritime Board) मंडळाने सामंजस्य करार केला आहे. या कराराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील इनलँड वेसल्सवर तैनात होणाऱ्या सुमारे 7 हजार तरुणांना नौकानयन विषयक प्रशिक्षण मिळणार आहे, अशी माहिती बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांनी दिली.
महाराष्ट्र सागरी (मेरीटाईम बोर्ड) च्या नवीन करारामुळे नौकानयन क्षेत्रात कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळ मिळणार आहे. यामुळे राज्यातील सागरी उपक्रमांना नक्कीच चालना मिळणार आहे. सुमारे सहा ते सात हजार तरुणांना याचा लाभ होणार आहे. तसेच विद्यापीठाच्या संशोधनाचा आणि ज्ञानाचा उपयोग राज्यातील सागरी नौकानयन क्षेत्राच्या विकासासाठी होणार आहे.
या संदर्भातील पुढील अपडेट्ससाठी महाभरतीला नियमित भेट देत रहा.