आनंदाची बातमी! IT कंपन्यांनी आता मोठ्या प्रमाणात भरती सुरु! । IT Company Mega Recruitment 2024
IT Company Mega Recruitment 2024
IT Company Mega Recruitment 2024
एक वर्षाहून अधिक काळ, भारतासह जगभरातील आयटी क्षेत्रातून (IT Companies ) खूप नकारात्मक बातम्या समोर येत आहेत. सततच्या नोकरकपातीमुळं आर्थिक मंदीमुळं आयटी कंपन्यांनीही फ्रेशर्सच्या भरतीवर बंदी घातली होती. मात्र, अशातच आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय आयटी कंपन्यांनी आता मोठ्या प्रमाणात भरती सुरु केली आहे. फक्त फ्रेशर्ससाठी कॅम्पस हायरिंग सुरु केलीय. IBM, Infosys, TCS आणि LTIMindtree सारख्या IT कंपन्यांनी कॅम्पस भेटी सुरू केल्या आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
दर नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांना कंपन्या चांगला पगारही देण्यासही तयार आहेत. मात्र, त्यासाठी तुम्हाला तुमच्या कौशल्यावर काम करावे लागेल. आयटी कंपन्यांना सध्या क्लाउड, डेटा आणि एआय सारख्या भूमिकांसाठी लोकांची निवड करायची आहे. IBM, Infosys, TCS आणि LTIMindtree सारख्या अनेक IT कंपन्यांनी देखील कॅम्पसला भेट देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, यावेळी निवड प्रक्रिया अगदी वेगळी असणार आहे. ज्या कंपन्या आतापर्यंत भरपूर नोकऱ्या देत होत्या त्या आता निवडक लोकांनाच निवडतील. त्यांना क्लाउड कॉम्प्युटिंग, डेटा ॲनालिटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे ज्ञान असलेल्या लोकांची गरज आहे. अशा भूमिकेसाठी वेतन पॅकेजही 6 ते 9 लाख रुपये असणार आहे. देशातील कॅम्पस प्लेसमेंट्स जुलैपासून सुरू होणार आहेत. याशिवाय ऑफ कॅम्पस जॉइनिंगही केले जाणार आहे. याद्वारे TCS ने सुमारे 40 हजार फ्रेशर्स, इन्फोसिस 20 हजार आणि विप्रो 10 हजार फ्रेशर्स जोडण्याची योजना आखली आहे. विप्रोचे एचआर प्रमुख सौरभ गोविल यांनी सांगितले की, आम्ही एका वर्षाच्या विश्रांतीनंतर पुन्हा कॅम्पस हायरिंग सुरू करणार आहोत. यावेळी कट ऑफ 60 टक्क्यांवरून 70 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
या कॅम्पस हायरिंगमध्ये कंपन्या तुमचे शिक्षण, कौशल्ये, प्रमाणपत्रे तसेच सोशल मीडिया प्रोफाइलवर बारीक नजर ठेवणार आहेत. असे केल्याने कंपन्यांना तुमची संपूर्ण पार्श्वभूमी समजून घ्यायची आहे. अशा परिस्थितीत अभियांत्रिकी पदवीधरांसाठी येणारे काही महिने मोठी संधी आहेत. या काळात तो स्वत:च्या उणिवा शोधू शकतो आणि कंपन्यांच्या मागणीनुसार स्वत:ला तयार करू शकतो.
Maz B.com MSCIT, TALLY ,Typing
D.el.ed ahe