उच्च शिक्षण संचालनालयामार्फत केंद्रप्रशासित पुरस्कृत शिष्यवृत्ती योजना 2021-22
Scholarship Exams 2021
DHE Scholarship Scheme 2021-22
Scholarship Exams 2021 : The following 3 Centrally Sponsored Scholarship Schemes for the year 2021-22 are being implemented through the National Scholarship Portal through the Directorate of Higher Education. To do this, students can apply online from the website www.scholarship.gov.in for new scholarships (Fresh) and Renewal. Must be paid by 30.11.2021. Further details are as follows:-
उच्च शिक्षण संचालनालयामार्फत खालील ३ केंद्रप्रशासित पुरस्कृत शिष्यवृत्ती योजना सन २०२१-२२ साठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवरून राबविण्यात येत आहेत. यासाठी विद्यार्थ्यांचे नवीन शिष्यवृत्ती (Fresh) व नूतनीकरण (Renewal) करण्यासाठी www.scholarship.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज दि. ३०.११.२०२१ पर्यंत भरणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- योजनेचे नाव –
- केंद्रशासन पुरस्कृत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना
- महाविद्यालयीन व विद्यापीठीय विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना
- दिव्यांगजन विद्यार्थ्यांसाठीपोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३०.११.२०२१
राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जाची पडताळणी करणेसाठी महाविद्यालयांना त्यांचे आधार बेस लॉगिन प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती अर्ज पडताळणी करण्याची अंतिम मुदत दि. १५.१२.२०२१ अशी आहे. या संदर्भातील अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – https://bit.ly/3HUHDGQ
Fee Hike Of Scholarship Exam
Scholarship Exams 2021 : The Maharashtra State Examination Council conducts the fifth and eighth scholarship examinations every year. The state government’s school education department on Thursday decided to increase the fees for the fifth and eighth scholarship examinations. Further details are as follows:-
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून दरवर्षी पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा देण्यासाठीचे शुल्क वाढविण्याचा निर्णय़ गुरुवारी घेतला. राज्य सरकारने विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पाचवी; तसेच आठवीच्या शिष्यवृत्तीच्या रक्कमेत वाढ करण्याऐवजी परीक्षा आणि प्रवेश शुल्कात एकूण अडीचपट वाढ केली आहे.
या निर्णयानुसार बिगरमागास; तसेच मागास आणि दिव्यांग विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क २० रुपयांवरून ५० रुपये केले आहे, तर बिगरमागास विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क ६० रुपयांवरून १५० रुपये केले आहे. यापूर्वी, मागास आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क आकारण्यात येत होते. मात्र, आतापासून ७५ रुपये आकरण्यात येणार आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षांसाठी बिगरमागास विद्यार्थ्यांना एकूण २०० रुपये, तर मागास व दिव्यांग विद्यार्थ्यांना १२५ रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
त्याच वेळी पाचवीची शिष्यवृत्ती सहावी ते आठवीपर्यंत प्रत्येत वर्षातील दहा महिने २५० ते एक हजार रुपयांपर्यंत मिळते, तर आठवीची शिष्यवृत्ती नववी आणि दहावीत प्रत्येकी दहा महिन्यांसाठी ३०० ते दीड हजार रुपयांपर्यत मिळते. ही रक्कम फारच तुटपुंजी असल्याचे शिक्षक आणि तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक शिष्यवृत्तीच्या परीक्षा गांभीर्यांने घेत नाहीत. आता या परीक्षांच्या शुल्कात अडीचपट वाढ करण्यात आल्याने, परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणखी घटण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांत शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत निम्म्याने घट होत आहे. अशा परिस्थितीत शुल्कवाढ करून, शालेय शिक्षण विभागाने कोणता उद्देश साधला, अशी विचारणा होऊ लागली आहे.
The Maharashtra State Examination Council conducts the fifth and eighth scholarship examinations every year. Scholarships are given to the students who pass this examination for a certain period of time every month.
परीक्षेचा खर्च वाढल्याने शुल्कात वाढ
The school education department has not increased the amount of scholarship much since 2010. However, in 2016 and now on 11th November, the entrance and examination fees for the scholarship examination have been increased. The computer system is used for filling up of application forms, printing of question papers and answer sheets, scanning of answer sheets, preparation of results, preparation of quality lists. Therefore, the Department of Education has given evidence that this fee is being increased.
Higher Education Scholarship 2021
Scholarship Exams 2021 : College students have only ten days left to end the application for online application for the scholarship given by the government. The term will end up on 30th June, and after this, information has been given to the Social Welfare Department.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना नवीन शिष्यवृत्ती अर्जासाठी व २०१९-२० मधील विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्यासाठी जवळपास चार वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. करोना प्रादुर्भाव लक्षात घेत ही मुदतवाढ देण्यात आलेली असली, तरी ३० जूननंतर मुदतवाढ दिली जाणार नाही.
विद्यार्थ्यांमार्फत तंत्रशिक्षण व उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यात येत आहेत.
महाविद्यालयांनाही विद्यार्थ्यांनी जमा केलेले सर्व अर्ज पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून समाजकल्याण विभागाकडे ३० जूनपर्यंत जमा करावे लागणार आहेत. अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग या सर्व प्रवर्गांतील विद्यार्थ्यांकरिता विविध योजनांचे शिष्यवृत्ती अर्ज महाडीबीटी पोर्टलवर तीन डिसेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
Foreign Education Scholarship 2021
Scholarship Exams 2021 : The Department of Social Justice and Special Assistance of the State Government will provide scholarships to students for postgraduate and Ph.D studies in foreign universities in the academic year 2021-22. Further details are as follows:-
परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती अर्जांसाठी 14 जूनची मुदत. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे शैक्षणिक वर्ष 2021-22 या वर्षात विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर आणि पीएच. डी. शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या शिष्यवृत्तीच्या अर्जांसाठी 14 जून ही अंतिम मुदत आहे.
योजनेची अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे, असे समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले.
उच्च शिक्षण संचालनालयामार्फत शिष्यवृत्तीबाबत सूचना – आता मुदतवाढ नाही
Scholarship Exams 2021 : The Directorate of Higher Education has clarified that no extension will be given after April 30 to apply for the scholarships offered by the Social Welfare Department.
उच्च शिक्षण संचालनालयामार्फत शिष्यवृत्तीबाबत सूचना – आता मुदतवाढ नाही. महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षण फी व परीक्षा फी, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता या योजना राबविल्या जातात. यासाठी ३० एप्रिलपर्यंत समाज कल्याण विभागाकडे शिष्यवृत्ती अर्ज जमा करावे लागणार आहेत.
समाज कल्याण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास ३० एप्रिलनंतर मुदतवाढ देणार नसल्याचे उच्च शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी भरल्या जाणाऱ्या अर्जांपैकी अनेक अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ३० मार्चवरून ही मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. परंतु, यानंतर ही मुदत वाढविणार नसल्याचे उच्च शिक्षण संचालनालयाने सांगितले आहे. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत समाज कल्याण विभागाकडे शिष्यवृत्ती अर्ज जमा करावे लागणार आहेत.
Scholarship Exams 2021 – शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली!
Scholarship Exams 2021 : शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर – परीक्षा 6 एप्रिल रोजी घेण्यात येणार – राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 21 मार्च रोजी राज्यभरात विविध केंद्रांवर होणार होती. मात्र, महाराष्ट्र लीक्सेवा आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा 21 मार्च घेण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, आता हि परीक्षा 6 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.
NMMS शिष्यवृत्ती परीक्षा 2021 – प्रवेशपत्र उपलब्ध
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 21 मार्च रोजी राज्यभरात 37 जिल्ह्यांतील 761 उपकेंद्रांवर घेण्यात येणार होती. ही परीक्षा इयत्ता आठवीसाठी घेण्यात येते.
Scholarship Exams 2021 : scholarship exams 2021 scholarship exams of 5th and 8th std to be held in april – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येते. परंतु, करोनाच्या संकटामुळे ही परीक्षा दोन महिने पुढे ढकलण्यात आली असून, फेब्रुवारी २०२१ ऐवजी एप्रिल महिन्याच्या चौथ्या रविवारी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
दरवर्षी इयत्ता पाचवीसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता आठवीसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती घेण्यात येते. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी ही परीक्षा घेण्यात येते. शासनमान्य शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. यंदा करोनाचे सावट अद्याप कमी झाले नसल्याने ही परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यासदेखील विलंब झाला होता. नाशिक जिल्ह्यातील ५७ हजार ६२६ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ५४ हजार ८१६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.
प्राथमिक शाळा उघडण्याबाबत निर्णय नाही: शिक्षणमंत्री
दरम्यान, पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाच्या अहवालानंतरच प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत विचार करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सर्वप्रथम काळजी घेण्यात येईल. स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्याबाबतचा विचार करता येईल. लहान मुलांना शाळेत सामाजिक अंतर व आरोग्य विषयक सूचनांचे पालन करणे सहज शक्य नसल्याने पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी अद्याप कोणतीही भूमिका मांडलेली नाही. तसेच कोणताही निर्णय झालेला नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यकालीन उपाययोजना, सुरक्षा व आरोग्य विषयक बाबींचा विचार करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित लक्षात घेऊन सरकार योग्य तो निर्णय घेईल अशी माहिती गायकवाड यांनी दिली.
सोर्स : म. टा.
Table of Contents
Bag man ja kay