खुशखबर – पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा!

Clear the way for promotion of police officers

Clear the way for promotion of police officers : गेल्या सव्वा वर्षाहून अधिक काळ पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्य पोलीस दलातील निरीक्षकांसाठी खूशखबर आहे. त्यांच्या बढतीतील मुख्य अडसर दूर झाला असून प्रस्तावाला मान्यता मिळून अंतिम निश्चितीसाठी पोलीस मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. सोमवारी ‘लोकमत’मध्ये यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मंत्रालयात रखडलेल्या प्रस्तावाला गती मिळाली. त्याच दिवशी फाईल महासंचालक कार्यालयात पाठविण्यात आली.

बढतीसाठी पात्र असलेल्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्या पसंतीचा संवर्ग मागविला जाईल. त्यानंतर गृह विभागाकडून बदलीचे आदेश काढले जातील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

तीन दशकांहून अधिक काळ सेवा बजावलेल्या अधिकाऱ्यांचे उपविभागीय अधिकारी, साहाय्यक आयुक्त पदाची पदोन्नती १५ महिन्यांपासून प्रलंबित आहे. पदोन्नतीचा प्रस्तावाची फाईल सामान्य प्रशासन विभागाकडे मान्यतेसाठी प्रलंबित होती. ‘लोकमत’ने यासंदर्भात २३ नाेव्हेंबर राेजी ‘पोलीस अधिकाऱ्यांची पदोन्नतीची फाईल मंत्रालयात रखडली’ या शीर्षकाअंतर्गत वृत्त प्रसिद्ध केले हाेते. त्यानंतर आता अधिकाऱ्यांनी प्रस्तावाला मंजुरी देऊन ताे गृह विभागाकडे पाठवला. तेथून ताे तातडीने नियुक्तीसाठी संबंधित अधिकारी सध्या कार्यरत आहेत का याची पडताळणी करून संवर्ग निश्चित करण्यासाठी महासंचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आला.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

रिक्त २९५ पैकी २०५ जागा भरल्या जाणार

उपअधीक्षक, एसीपीची सध्या २९५ पदे रिक्त असून त्यापैकी २०५ जागा भरल्या जाणार आहेत. ९० पदे सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित याचिकेला अधीन राहून राखीव ठेवली आहेत. मान्यता मिळालेल्यांपैकी निवृत्त, मृत झालेल्यांची नावे वगळून इतरांना बढती दिली जाईल. मुख्यालयातील आस्थापना विभागाने संवर्ग निश्चित करून  ती गृह विभागाकडे पाठविली पाहिजे. तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्परता दाखविणे गरजेचे असल्याचे मत पदाेन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांनी मांडले.

सोर्स : लोकमत


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड