पुण्यात १८,००० नोकऱ्यांची संधी !
Pune 18000 Job Vacancies
Pune 18000 Job Vacancies – पुण्यात १८,००० नोकऱ्यांची संधी – दिवाळीच्या मुहूर्तावर पुणेकरांना राज्य सरकारने खुशखबर दिली आहे. राज्यात येत असलेले 15 पैकी 8 उद्योग पुण्यात येणार आहेत. त्यातील 5 उद्योग लॉजिस्टिक्स क्षेत्रातील आहेत. हे उद्योग 10 हजार 505 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. त्यातून शहरात 18 हजार 482 जणांना थेट नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पुण्यातील उद्योग क्षेत्राने या गुंतवणुकीचे स्वागत केले आहे.
“मॅग्नेटिक महाराष्ट्र” अतंर्गत राज्य सरकारने 2 नोव्हेंबर रोजी 15 कंपन्यांशी करार केले आहेत. त्या कंपन्या राज्याच्या विविध भागांत 34 हजार 850 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, त्यातून 23 हजार 182 नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. या पैकी 8 कंपन्या पुण्यातील चाकण, तळेगाव, रांजणगाव, हिंजवडी भागात येणार आहेत. या बाबतची प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे. “ऑटोमोबाईल”, “IT” आणि सेवा क्षेत्राचे हब असलेल्या पुण्याला आता “लॉजिस्टिक्स” कंपन्याही पसंती देऊ लागल्या आहेत, हे आता अधोरेखित झाले आहे, असे विभागीय उद्योग संचालक सदाशिव सुरवसे यांनी सांगितले.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पुण्यात येणाऱ्या लॉजिस्टिक्स कंपन्या केवळ सुट्या भागांची वाहतूक करणाऱ्या कंपन्या नाहीत तर, आधुनिक तंत्रज्ञान वापरून आपल्या ग्राहकाला सर्व सुविधा एकाच छताखाली देणाऱ्या त्या कंपन्या आहेत. वेअर हौसिंग, कस्टम्स आणि मटेरिअल मॅनेजमेंटच्या सुविधा त्या देणार आहेत. त्यामुळे आगामी काळात पुण्याचा औद्योगिक चेहरा-मोहरा बदलू शकतो, असे मत “MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’चे प्र- कुलगुरू डॉ. रवी चिटणीस यांनी व्यक्त केले. पुुणे आणि परिसरात “MBA” ची 100 पेक्षा जास्त तर, अभियांत्रिकीची 50 पेक्षा जास्त महाविद्यालये आहेत. त्यामुळे पुण्यात येणाऱ्या उद्योगांना नजीकच्या काळात कुशल मनुष्यबळ मोठ्या संख्येने उपलब्ध होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.
गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्वास आहे, ही समाधानाची बाब आहे. कोरोनानंतरच्या काळात पुण्याचे महत्त्व राष्ट्रीय स्तरावर वाढत आहे. त्यामुळे पुण्याकडे उद्योग येत आहेत. आता अंमलबजावणी वेगाने व्हावी आणि कार्गोचा प्रश्न सुटावा, एवढीच अपेक्षा आहे.
Rannangon
Rahaychi jevnach soy ani govrment job ahe ka
मी दहावी पास झालो आहे
Job sathi apply karat ahe