महत्त्वाचे – करोनाकाळातही मुख्य वैद्यकीय अधिकारी पद रिक्त

Navi Mumbai Municipal Corporation Bharti 2020

Navi Mumbai Municipal Corporation Bharti 2020 : नवी मुंबईतील करोना परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. दिवसाला बाधितांची संख्या ही शंभरपर्यंत आली आहे. असे असले तरी गेल्या तीन महिन्यांपासून मुख्य वैद्यकीय अधिकारी पद हे रिक्त आहे. आरोग्य विभागाचा कारभार प्रभारी अधिकारी पाहत आहेत.

करोना साथ रोग प्रादुर्भावानंतर नवी मुंबईतील तोकडी आरोग्य व्यवस्था समोर आली होती. यापूर्वीही याबाबत वारंवार प्रश्न उपस्थित होत होते. पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पदभार घेतल्यानंतर आरोग्य सुविधांचा मोेठ्या प्रमाणात वाढ करीत सद्य:स्थितीत आरोग्य सुविधेबाबत समाधान व्यक्त होत आहे.

असे असले तरी करोनासारख्या गंभीर परिस्थितीतही आरोग्यासाठी महत्त्वाचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी हे पद रिक्त आहे. तीन महिने आज उद्या हे पद भरले जाणार असे सांगत करोनाची परिस्थिती नियंत्रणात आली तरीही हे पद भरले गेले नाही.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पालिका आयुक्तांनी आरोग्य विभागाचा कारभार स्वत: हाती घेतल्याचे चित्र आहे. आरोग्य सुविधांत वाढ, डॉक्टर, कर्मचारी भरती, साहित्य, औषध खरेदी. खाटानिर्मितीसह मनुष्यबळाचे व्यवस्थापन आयुक्त करीत आहेत. तात्पुरत्या स्वरूपात डॉ.दयानंद कटके जबाबदारी सांभाळत आहेत.

मुंबई महापालिकेतील एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. आता कल्याण-डोंबिवली महापालिकेतील आरोग्य अधिकाऱ्याची वर्णी लाग्णार अशी चर्चा आहे. मात्र हे पद अद्याप भरले गेले नाही. महापालिकेतील महत्त्वाचे असलेले आरोग्य अधिकारी हे पद भरण्यासाठी शासनाकडे मागणी केली आहे. लवकरात लवकर हे पद भरले जाईल, असे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

सोर्स : लोकसत्ता


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड