महत्वाचे! – पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा अर्जासाठी मुदतवाढ! – MSCE Pune Scholarship 2024 Application Form

MSCE Scholarship Exam 2024

MSCE Pune Scholarship Exam Date 

 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता १५ डिसेंबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी याबाबतची माहिती दिली. शिष्यवृत्ती परीक्षा ९ फेब्रुवारी रोजी राज्यभरात एकाच दिवशी घेतली जाणार आहे. शाळा नोंदणी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १७ ऑक्टोबर ते ७ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. परंतु, अद्याप काही शाळांकडून कार्यवाही प्रलंबित असल्याने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार विलंब शुल्कासह १६ ते २३ डिसेंबर, अतिविलंब शुल्कासह २४ डिसेंबर ते २७ डिसेंबर, अति विशेष विलंब शुल्कासह २८ ते ३१ डिसेंबर या कालावधीत अर्ज भरता येणार आहे. ३१ डिसेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत अर्ज भरता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या  संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

 


 

MSCE Scholarship Exam 2024:  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी शिष्यवृत्ती मुख्य परीक्षा फेब्रुवारीत होत असल्याने त्यादृष्टीने विद्यार्थ्यांची दयारी करून घेण्यासाठी मंगळवारी (ता. १०) सराव परीक्षा घेण्यात येणार आहे. पाचवीच्या सात हजार ६५७ विद्यार्थ्यांची २४४ केंद्रांवर आसनव्यवस्था करण्यात आली आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देण्यासाठी पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा १० डिसेंबरला घेण्यात येणार आहे. पहिली शिष्यवृत्ती सराव परीक्षा ३० ऑगस्टला घेण्यात आली होती. परीक्षेपूर्वी शाळांच्या लॉगइनवर विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहे. उत्तरपत्रिका जिल्हा परिषदेतर्फे पुरविण्यात येणार आहे

पेपर विषय वेळ गुण
पहिला पेपर भाषा – गणित ११ ते १२:३० १५०
दुसरा पेपर इंग्रजी आणि बुद्धिमत्ता २ ते ०३:३० १५०

MSCE Pune Scholarship Last Date Extend

MSCE Scholarship Exam 2024: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यास सात डिसेचरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. परीक्षा परिषदेने विद्यार्थ्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्क भरण्यास मदत दिली होती. मात्र, शाळा नोंदणी व विद्याथ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली. या  संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ९ फेब्रुवारी या एकाच दिवशी पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या दरम्यान मुदत होती. परंतु, आता ही मुदत वाढवण्यात आली आहे. विद्यार्थी नियमित शुल्कासह ७ डिसेंबरपर्यंत; विलंब शुल्कासह ८ ते १५ डिसेंबर; तर अतिविलंब शुल्कासह १६ ते २३ डिसेंबपर्यंत अर्ज भरण्यास मुदत देण्यात आली आहे. यासह अतिविशेष विलंब शुल्कासह २४ ते ३१ डिसेंबर या कालावधीत अर्ज भरता येणार आहे. मात्र, ३१ डिसेंबरनंतर विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाही, असे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे. यापूर्वी परीक्षा परिषदेने विद्यार्थ्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्क भरण्यास मदत दिली होती.


MSCE Pune Scholarship 2024 Application Form, Exam Date – mscepuppss.in

 

राज्याच्या उच्चशिक्षण संचालनालयामार्फत विविध १४ शिष्यवृत्ती दिल्या जातात. शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मिळावा यासाठी विद्यार्थ्यांचे महाडीबीटी पोर्टलमार्फत ऑनलाइन अर्ज नोंदणीसाठी विशेष सप्ताह राबविण्यात येणार आहेत. राज्यातील महाविद्यालय, अकृषी विद्यापीठे आणि उच्चशिक्षण संस्थांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज भरून घेण्याबाबत ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. महाडीबीटीमार्फत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेण्याबाबत शिक्षण संचालनालयामार्फत यापूर्वी वेळोवेळी परिपत्रक प्रसिद्ध करीत महाविद्यालयांना माहिती दिली आहे, तसेच कार्यालयाकडून वेळोवेळी ऑनलाइन बैठका घेत सूचना दिलेल्या आहेत. या  संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

मात्र, प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शिक्षण विभागाच्या शिष्यवृत्ती योजनांसाठी अतिशय कमी ऑनलाइन अर्ज महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त झाले आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत यासाठी उच्चशिक्षण संचालनालय पुणे विभागांतर्गत पुणे शहर, पुणे ग्रामीण, अहमदनगर जिल्हा आणि नाशिक जिल्ह्यामधील सर्व अशासकीय अनुदानित, विना अनुदानित व कायम विना अनुदानित महाविद्यालय, सर्व अकृषी विद्यापीठे, उच्चशिक्षण संस्थांनी दि.२५ ते ३० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत शिष्यवृत्ती आवेदन पत्र भरण्यासाठी विशेष सप्ताह राबण्यासाठी उच्चशिक्षण पुणे विभाग सहसंचालकांनी परिपत्रक काढले आहे. महाविद्यालये, संस्था आणि विद्यापीठांनी महाडीबीटी पोर्टलवर सप्ताहाच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल कार्यालयास सादर करावा, असेही परिपत्रकात नमूद केले आहे.

उच्चशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या १४ शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाइन आवेदन पत्र भरण्याकरिता महाविद्यालय स्तरावर संगणक सुविधा, इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्यास प्रोत्साहित करावे.

 


MSCE Pune Scholarship 2024 – The Pre-Higher Primary Scholarship Examination (Class V) and Pre-Secondary Scholarship Examination (Class VIII) will be held on February 9 in all the districts of the state FOR MSCE Pune Scholarship 2024. Admit cards of this have been made available in the login of schools soon, informed the Deputy Commissioner of Maharashtra State Examination Council, Sanjay Kumar Rathod. The Examination Council has requested that the admit card provided in the login should be printed and distributed to all the examinees immediately, all the examinees and parents should obtain the admit card from the school principal.

 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार येत्या ९ फेब्रुवारी रोजी राज्यभरात शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार असून, विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली. पाचवीसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, आठवीसाठी पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. 

पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती म्हणून अनुक्रमे पाच हजार रुपये आणि सात हजार रुपये देण्यात येतात. पाचवी आणि आठवीसाठी ५० गुणांची प्रथम भाषा, १०० गुणांची गणिताची अशी एकूण १५० गुणांची परीक्षा सकाळी अकरा ते दुपारी साडेबारा या वेळेत होईल. तर ५० गुणांची तृतीय भाषा, १०० गुणांची बुद्धिमत्ता चाचणीसाठीची १५० गुणांसाठीची परीक्षा दुपारी दोन ते साडेतीन या वेळेत होईल.

 


 

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या १८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. याचे प्रवेशपत्र शुक्रवारी दुपारी ४ वाजल्यापासून शाळांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी दिली. लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिलेल्या प्रवेशपत्राची प्रिंट काढून तत्काळ सर्व परीक्षार्थ्यांना वितरित करावे, सर्व परीक्षार्थी आणि पालक यांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन परीक्षा परिषदेने केले आहे. 

 

 


MSCE Scholarship Exam 2023 : Pre-Upper Primary Scholarship Exam (Ed. 5th) and Pre-Secondary Scholarship Exam (Ed. 8th) will be conducted on 18th February, 2024 on the same day in all districts of Maharashtra state. The notification of the said examination has been published on the Council’s website www.mscepune.in and https://www.mscepuppss.in. The said notification is enclosed with this Scholarship Exam 2023 article. It is requested that the said notification be kindly read before applying for MSCE Pune Exam 2024. Download MSCE Pune Scholarship Exam 2024 Notification. Know How To Apply For MSCE Pune Scholarship Exam 2024

MSCE Pune Scholarship Application Date has been Exteneded. Due to this extension, students will be able to apply for the scholarship examination of class V and VIII with the regular fee till December 7. Apart from this, online applications can be made from 8th to 15th December with late fee, 16th to 23rd December with late fee and 24th to 31st December with special late fee.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. १८ फेब्रुवारी २०२४ रोजी राज्यातील विविध केंद्रांवर शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार असून विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह ७ डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे.

पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (आठवी) परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येत्या सात डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे दिलेल्या मुदतीत अर्ज भरू न शकलेल्या आणि या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना आता आणखी आठवडाभर या परीक्षेसाठी अर्ज भरता येणार आहेत.
पुणे शहर व जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाते. यानुसार चालू शैक्षणिक वर्षातील (२०२३-२४) पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही येत्या १८ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात येत आहे. यासाठी याआधी ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत गुरुवारी (ता. ३०) संपली. त्यामुळे राज्य परीक्षा परिषदेने हे अर्ज करण्यासाठी आणखी आठवडाभर मुदतवाढ देण्यात आल्याची घोषणा शुक्रवारी (ता. १) केली आहे.

या मुदतवाढीमुळे इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह येत्या ७ डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. याशिवाय विलंब शुल्कासह ८ ते १५ डिसेंबर, अतिविलंब शुल्कासह १६ ते २३ डिसेंबर आणि अतिविशेष विलंब शुल्कासह २४ ते ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत

१ सप्टेंबरपासूनच विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध

राज्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी, या उद्देशाने शालेय शिक्षण विभागाने शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज लवकर भरून भरून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार १ सप्टेंबरपासूनच विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार विलंब शुल्कासह १ डिसेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारले जातील. तसेच, २४ ते ३१ डिसेंबर या काळात अति विशेष विलंब शुल्कासह विद्यार्थी अर्ज करू शकतील. मात्र, ३१ डिसेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचा अर्ज स्वीकारला जाणार नाही..

शिष्यवृत्ती परीक्षा आपल्या मातृभाषेत देता येणार 

शिष्यवृत्ती परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगू आणि कन्नड या सात माध्यमांमध्ये घेतली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेत शिष्यवृत्ती परीक्षा देता येणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या वयापेक्षा जर जास्त वय असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची असेल तर तो देऊ शकतो. त्याला परंतु शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही.

MSCE Pune Time Table 2023

MSCE Scholarship Exam 2023

mscepuppss.in Online Application 2023

शासनमान्य शाळांमधून सन २०२३ २४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ठ होण्यासाठी तसेच इयत्ता ८ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ठ होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर दि. ०१/०९/२०२३ रोजी पासून उपलब्ध करून
देण्यात येत आहेत.
उपरोक्त परीक्षा दि. १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये एकाच वेळी घेण्यात येईल. परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेची सविस्तर माहिती सोबतच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे. प्रत्येक सूचना वाचूनच कार्यवाही करण्याची दक्षता सर्वांनी घ्यावी.

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता :- Eligibility for MSCE  Scholarship Examination 2024

१. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा म्हणजेच पालकांचे महाराष्ट्रात किमान १५ वर्षे वास्तव्य असावे. २. विद्यार्थी शासनमान्य शासकीय / अनुदानित / विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित /
स्वयंअर्थसहाय्यित शाळेत इ. ५ वी किंवा इ. ८ वी मध्ये शिकत असावा.

वयोमर्यादा – MSCE Pune Exam Age Limit

या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय दि. ०१ जून २०२३ रोजी खाली दर्शविलेल्या तक्त्यातील वयापेक्षा जास्त नसावे.

परीक्षेचे नाव प्रवर्ग
सर्व प्रवर्ग दिव्यांग
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ५ वी), शासकीय / आदिवासी / वि. जा. भ. ज. विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा ११ वर्षे १५ वर्षे
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ८ वी ) १४ वर्षे १८ वर्षे

शुल्क  – MSCE Pune Scholership Application Fee 2024

MSCE Scholarship Exam 2023

MSCE Scholarship Exam 2024 Notification

MSCE Pune Registration 2024 Link

MSCE Pune Scholarship Exam Notification 2024 https://shorturl.at/wIS13
MSCE Pune Scholarship Exam Online Link https://shorturl.at/bl139
MSCE Syllabus PDF For Class 5 – पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम डाउनलोड करा Download
MSCE Class 8 Syllabus PDF – पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वी संपूर्ण अभ्यासक्रम ! Download

Documents Required For MSCE Pune Scholership Exam 2024

१. विद्यार्थ्याची फोटोसह स्वाक्षरीची एकत्रित स्कॅन कॉपी (jpg/jpeg/png/bmp format मध्ये 100 kb
पेक्षा जास्त नसावी.)
२. विदर्भातील ११ जिल्हयातील पालकांचे वार्षिक उत्पन्न रु.२०,०००/- पेक्षा कमी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे (तलाठी / तहसीलदार / प्रांत अधिकारी) प्रमाणपत्र. (इ. ५ वी व इ. ८ वी साठी)
३. विद्यार्थ्याचे पालक रु.२०,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणारे भूमिहीन शेतमजूर असल्यास भूमिहीन शेतमजूर व रू.२०,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असल्याबाबत सक्षम अधिकारी (तलाठी / तहसीलदार / प्रांत अधिकारी) यांनी दिलेली प्रमाणपत्रे. (इ. ८ वी साठी)
४. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या फोटोसह स्वाक्षरीची एकत्रित स्कॅन कॉपी.


MSCE Scholarship Exam 2023 – 2024 Update

MSCE Scholarship Exam 2023:   Schools are asking when the process of filling the forms for the scholarship examination for class 5 and 8 will start. The State Examination Council had issued a circular that the filling of scholarship exam forms will start from September 1. However, the council is yet to start the process of filling online applications.

 

पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया कधीपासून सुरू होणार, असा प्रश्न शाळांकडून केला जात आहे. राज्य परीक्षा परिषदेने 1 सप्टेंबरपासून शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात केली जाईल, असे परिपत्रक जाहीर केले होते. मात्र अद्याप परिषदेने ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केलेली नाही. या  संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱया विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होता चालली आहे. त्यामुळे जुलै महिन्यापासूनच शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास सुरुवात करण्याचा निर्णय शिक्षण विभागातर्फे घेण्यात आला होता, परंतु परीक्षा परिषदेचे आयुक्त व अध्यक्ष या दोन्ही पदांवर नवीन अधिकारी बदलून आले. त्यामुळे पूर्वी झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी होऊ शकली नाही. मात्र 1 सप्टेंबरपासून शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास सुरुवात केली जाईल, असे परिपत्रक परीक्षा परिषदेतर्फे प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानुसार आजपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते, मात्र काही कारणांमुळे त्यास पुन्हा विलंब झाला आहे.

आज शुक्रवारी दुपारनंतर किंवा सोमवारपासून सर्वांना सुरळीतपणे अर्ज भरता येतील, असे परीक्षा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी सांगितले. राज्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी, ग्रामीण व शहरी भागातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा द्यावी, शिष्यवृत्ती परीक्षेच्या घसरलेल्या निकालात सुधारणा व्हावी या उद्देशाने शिक्षण विभागातर्फे विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सरकारने शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ केली आहे.

 


 MSCE Pune Scholarship 2023 Application Form – MSCE Pune Scholarship 2023 Registration process is stared.  After class 8th, the government is going to conduct a scholarship scheme examination to find the bright students from the economically weaker sections and provide financial assistance to the bright students to get the best education. Through the Maharashtra State Examination Council at various centers in the district. This exam will be conducted on December 10. Online application forms for this exam are available at https://www.mscepune.in and https://nmmsmsce.in. A scholarship of Rs 1000 per month (Rs 12 thousand per annum) is given to the eligible students.

 

इयत्ता आठवीनंतर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने अर्थसहाय्य करण्यासाठी सरकारने शिष्यवृत्ती योजना परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत जिल्ह्यातील विविध केंद्रांवर दि. १० डिसेंबरला ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज या https://www.mscepune.in व https://nmmsmsce.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास दरमहा १००० रुपये (वार्षिक १२ हजार रुपये) शिष्यवृत्ती दिली जाते.

राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता आठवीतील विद्यार्थी परीक्षेस बसू शकतात. पालकांचे वार्षिक उत्पन्न साडेतीन लाख रुपयांपेक्षा कमी असावे. यासाठी उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. विद्यार्थ्याला सातवीमध्ये किमान ५५ टक्के गुण मिळालेले असावेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचा विद्यार्थी किमान ५० टक्के गुण मिळविणे गरजेचे आहे.

 

जाहिरात

 


The amount of scholarship for class V and VIII in the state has been increased. Now scholarship holders of class V will be given a scholarship of five thousand rupees per annum and scholarship holders of class VIII will be given a scholarship of seven thousand five hundred rupees per annum.

राज्यातील पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्तीची रक्कम वाढवण्यात आली आहे. आता पाचवीच्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना पाच हजार रुपये प्रतिवर्ष आणि आठवीच्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना सात हजार पाचशे रुपये प्रतिवर्ष अशी शिष्यवृत्ती दिली जाणार असून, शिष्यवृत्तीची वाढीव रक्कम २०२३-२४पासून लागू होणार आहे.

पाचवीच्या विद्यार्थ्यांना पाच हजार; आठवीच्या विद्यार्थ्यांना सात हजार पाचशे रुपये

राज्यातील पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्तीची रक्कम कमी असल्याने आणि शिष्यवृत्तीची रक्कम गेल्या १३ वर्षांत वाढवण्यात आली नसल्याने ही रक्कम वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता.

त्यानंतर आता शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. आतापर्यंत पाचवीसाठी किमान २५० रुपये ते कमाल एक हजार रुपये, आठवीसाठी किमान तीनशे रुपये ते कमाल दीड हजार रुपये अशी शिष्यवृत्ती देण्यात येत होती. आता पाचवीच्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये आणि आठवीच्या शिष्यवृत्त- श्रीधारक विद्यार्थ्यांना दरमहा साडेसातशे रुपये शिष्यवृत्ती मिळेल.शिष्यवृत्ती परीक्षा योजनेच्या अन्य नियम आणि अटींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे नमूद करण्यात आले आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. MahaBharti says

    पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा होणार ९ फेब्रुवारीला!

  2. MahaBharti says

    राज्यातील पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्तीत वाढ

  3. अशपाक मुलाणी says

    काय कर ता

  4. Kotkar o y says

    शिष्यवृत्ती परीक्षा २०२१साठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख कळवा

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड