CA परीक्षा पुढे ढकलल्या; सुधारित वेळापत्रक जाहीर
CA Exam 2020 Revised Timetable
CA Exam 2020 Revised Timetable : सीए परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.; सुधारित वेळापत्रक जाणून घ्या….
CA Exam 2020 Revised Timetable: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्सी ऑफ इंडिया (ICAI) ने नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या चार्टर्ड अकाउंटन्सी अर्थात सीए परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षा १ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत होणार होत्या. आता या परीक्षा २१ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत होतील.
‘चार्टर्ड अकाउन्टन्सी अर्थात सीए अभ्यासक्रमाच्या परीक्षा काही दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार एक ते १८ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या परीक्षा आता २१ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर या काळात होतील, त्याचे सविस्तर वेळापत्रक ‘आयसीएआय’च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे,’ अशी माहिती ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य चंद्रशेखर चितळे यांनी दिली.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अशा होतील परीक्षा –
फाउंडेशन कोर्स परीक्षा
८, १०, १२ आणि १४ डिसेंबर २०२०
इंटरमेडिएट (Ipc) कोर्स परीक्षा – जुन्या स्कीमनुसार
- ग्रुप १ – २२, २४, २६ आणि २८ नोव्हेंबर २०२०
- ग्रुप २ – १, ३ आणि ५ डिसेंबर
इंटरमेडिएट कोर्स परीक्षा – नव्या स्कीमनुसार
- ग्रुप १ – २२, २४, २६ आणि २८ नोव्हेंबर २०२०
- ग्रुप २ – १, ३, ५ आणि ७ डिसेंबर
फायनल कोर्स परीक्षा – नव्या स्कीमनुसार
- ग्रुप १ – २१, २३, २५ आणि २७ नोव्हेंबर २०२०
- ग्रुप २ – २९ नोव्हेंबर, २, ४ आणि ६ डिसेंबर २०२०
इन्शुरन्स अँड रिस्क मॅनेजमेंट टेक्निकल परीक्षा (IRM)
मॉड्युल्स १ ते ४ – २१, २३, २५ आणि २७ नोव्हेंबर २०२०
इंटरनॅशनल ट्रेड लॉज अँड वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (ITL & WTO) पार्ट – १ परीक्षा
- ग्रुप ए – २१ आणि २३ नोव्हेंबर २०२०
- ग्रुप बी – २५ आणि २७ नोव्हेंबर २०२०
इंटरनॅशनल टॅक्सेशन – असेसमेंट टेस्ट
२१ आणि २३ नोव्हेंबर २०२०
आयसीएआयने हेही स्पष्ट केले आहे की केंद्र किंवा राज्य सरकारच्या सार्वजनिक सुट्ट्या असल्या तरी सीए परीक्षांच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही, हे उमेदवारांनी ध्यानात घ्यावे.
Important Links For CA Exam 2020 Revised Timetable | |
सोर्स : म. टा.