खुशखबर – आता सरकारी नोकरीसाठी मुलाखतीची गरज नाही!
Interview for Central Government Jobs Abolished
Interview for Central Government Jobs Abolished : देशातील २३ राज्यांसह आठ केंद्र शासित प्रदेशांमधील सरकारी नोकरीसाठी मुलाखतीची प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी याबाबतची माहिती दिली आहे. केंद्र सरकारमधील गट ब (विना-राजपत्रित) आणि गट सी दर्जाच्या पदांसाठी भरतीप्रक्रियामध्ये १०१६ पासून मुलाखती रद्द करण्यात आल्या आहेत, असे कार्मिक मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात जितेंद्र सिंह यांनी असे नमूद केले आहे.
२०१५ मध्ये नोकरी मिळवण्यासाठी उमेदवाराला मुलाखत देण्याची आवश्यकता नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. त्यानुसार, पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार कार्मिक व प्रशिक्षण विभागाने यासंदर्भात दखल घेतली आणि केंद्र सरकारच्या भरतीमध्ये मुलाखती हटविण्याची प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण केली. या योजनेची अंमलबजावणी १ जानेवारी, १०१६ पासून झाली आहे, असे जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, सरकारी नोकरीसाठी मुलाखती न घेण्यासंदर्भातील हा नियम गुजरात आणि महाराष्ट्राने अतिशय वेगाने स्वीकारला, तर इतर राज्यांनी लवकरच याची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली. मात्र, केंद्र सरकारच्या पाठपुराव्यानंतर आता २३ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांमध्ये मुलाखती घेणे बंद केले आहे, असे जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
मुलाखतीच्या गुणांमध्ये हेराफेरी
निवेदनात म्हटले आहे की, भरती प्रक्रियेत पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी मुलाखतीची प्रक्रिया हटविण्याची ही प्रणाली स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत प्रभावी सिद्ध झाली आहे. अनेकदा नोकरीसाठी मुलाखतीच्या गुणांमध्ये हेराफेरी करण्यात येत होती आणि त्यासाठी मोठी रक्कम मोजली जात होती, असा आरोप बर्याच वेळा करण्यात येत होता.
सोर्स : लोकमत
Computer operator
Computer operator GST MSc IT tally industry GST