खुशखबर-Tesla मध्ये नोकरी, पायी चालण्यासाठी दर तासाला देणार ४ हजार! – Tesla Recruitment 2024
Tesla Recruitment 2024
विश्वप्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाने एक अजब गजब ऑफर जाहीर केली आहे. कंपनीला अशा व्यक्तींची गरज आहे ज्यांना दिवसाला सात तासांपेक्षा जास्त चालण्याची इच्छा आहे. या कामाबद्दल कंपनी तासाला ४८ डॉलर म्हणजेच जवळपास ४००० रुपये देणार आहे. टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी २०२१ मध्ये ऑप्टिमसची कल्पना मांडली होती. त्यांच्या मते हा रोबोट कारखान्याच्या कामकाजापासून ते रुग्णसेवेपर्यंत अनेक कामे करू शकतो. गेल्या वर्षभरात टेस्लाने ऑप्टिमसच्या प्रशिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर कामगारांची भरती केली आहे. या नोकरीचे नाव ‘डेटा कलेक्शन ऑपरेटर’ असून त्यात सात तासांपेक्षा जास्त वेळ मोशन कॅप्चर सूट आणि व्हर्च्युअल रियॅलिटी हेडसेट घालून टेस्ट रूटवर चालावे लागेल. याशिवाय डेटा कलेक्शन, अहवाल लेखन आणि उपकरणांच्या छोट्याशा कामांची जबाबदारीही यात आहे. या नोकरीसाठी ५ फूट ७ इंच ते ५ फूट ११ इंच उंची, ३० पाउंडपर्यंत वजन उचलण्याची क्षमता आणि दीर्घकाळ VR उपकरण वापरण्याची क्षमता आवश्यक आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
या आकर्षक पगाराशिवाय टेस्लाच्या नोकरीत भरपूर फायदे आहेत. आरोग्य, दंत आणि दृष्टी विमा, कुटुंब नियोजन सहाय्य आणि निवृत्ती वेळेसाठी बचत योजना यासारख्या योजना पहिल्या दिवसापासून मिळतात. याशिवाय टेस्ला बेबीज प्रोग्राम, वजन कमी करण्याचे आणि धूम्रपान बंद करण्याचे प्रोग्राम आणि विविध प्रकारचे विमा पर्याय यासारखे अनोखे लाभही आहेत. या नोकरीसाठी तासाला २५.२५ ते ४८ डॉलर म्हणजे जवळपास २१२० ते ४००० रुपये पगार आहे. याशिवाय रोख आणि स्टॉक पुरस्कारही मिळू शकतात. ही नोकरी रोबोटिक्स आणि एआय क्षेत्रात काम करण्याची उत्कृष्ट संधी आहे.
टेस्लाने ही नोकरी तीन शिफ्टमध्ये काढली आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ४.३०, दुपारी ४ ते रात्री १२.३० आणि रात्री १२ ते सकाळी ८.३० असे वेळापत्रक असेल. नोकरीची सर्व माहिती टेस्लाच्या करिअर पेजवर पाहता येईल. ही नोकरी कालिफोर्नियातील पालो अल्टो येथे आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
बॅटरी बनवणारी कंपनी टेस्ला पॉवर इंडिया विविध क्षेत्रांमध्ये 2,000 हून अधिक कर्मचाऱ्यांची भरती करण्याची योजना आखत आहे. कंपनीने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की या भरती मोहिमेत अभियांत्रिकी, ऑपरेशन्स, विक्री आणि मार्केटिंग संबंधित पदांचा समावेश असेल. यामुळे तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. कंपनी जुन्या बॅटरीज दुरुस्त करून त्यांची विक्री करण्यासाठी अलीकडेच त्याचा बॅटरी ब्रँड ‘रिस्टोर’ लाँच केला आहे. 2026 पर्यंत देशभरात 5,000 रिस्टोर ब्रँड स्टोअर्स उघडण्याची योजना आहे. टेस्ला पॉवर इंडियाचे प्रशासकीय संचालक कविंदर खुराना म्हणाले, आम्ही भारतातील आमचा व्यवसाय विस्तारत असताना नवीन प्रयोग करुन आमची उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न करु. आम्ही आमच्या संस्थेमध्ये नवीन लोकांचे स्वागत करण्यास आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उत्सुक आहोत.
टेस्ला पॉवर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कविंदर खुराना यांनी मनीकंट्रोलला सांगितले की, “भारतातील शाश्वत ऊर्जा उपायांची वाढती मागणी पूर्ण करण्याच्या आमच्या निर्णयामुळे ही नियुक्ती करण्यात आली आहे. आमची क्षमता वाढवणे, नावीन्य आणणे आणि ऊर्जा क्षेत्रातील अग्रणी कंपनी म्हणून आमचे स्थान मजबूत करण्याचे आमचे ध्येय आहे. या नवीन नियुक्त्या आमच्या वाढीला चालना देण्यासाठी आणि भारताला शाश्वत ऊर्जा भविष्याकडे नेण्यात योगदान देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांचा बाजार हळूहळू जोर धरत आहे. गेल्या वर्षी 15 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली. टाटा समूह स्वतः बॅटरी व्यवसायात मोठी गुंतवणूक करत आहे. अशा परिस्थितीत बॅटरी उद्योगासाठी येणारा काळ चांगला असू शकतो.
Tesla Recruitment 2021-22 : Elon Musk is set to launch satellite internet in India next year. Through Starlink, satellite internet service will be launched in India in 2022 and Indians will get job opportunities. Sanjay Bhardwaj, India head of Starlink, has given information in this regard. Further details are as follows:-
एलोन मस्क पुढील वर्षी भारतात सॅटेलाइट इंटरनेट सुरू करणाच्या तयारीत आहेत. स्टारलिंक कंपनीच्या माध्यमातून २०२२ मध्ये भारतात उपग्रह इंटरनेट सेवा सुरू होणार असून भारतीयांना नोकरीची संधी मिळणार आहे. स्टारलिंकचे भारतातील प्रमुख संजय भारद्वाज यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
यासोबतच स्पेसएक्सची मालकी असलेल्या स्टारलिंक कंपनीच्या माध्यमातून २०२२ मध्ये भारतात उपग्रह इंटरनेट सेवा सुरू होणार असून भारतीयांना नोकरीची संधी मिळणार आहे. एलोन मस्क पुढील वर्षी भारतात सॅटेलाइट इंटरनेट सुरू करणाच्या तयारीत आहेत. यासाठी कंपनीतर्फे सध्या नियामक मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. स्टारलिंकच्या अधिकृत वेबसाइटनुसार, त्याची प्री-बुकिंग ७,२०० रुपयांपासून सुरू झाली आहे. यामाध्यमातून स्टारलिंक भारतातील उमेदवारांना नोकऱ्या देत असल्याची माहिती स्टारलिंकचे भारतातील प्रमुख संजय भारद्वाज यांनी दिली.
Launching a satellite internet service is a small initiative to accelerate the transformation taking place in rural India. Sanjay Bharadwaj has written on the company’s LinkedIn page that job opportunities will open up as we move forward. He added that once the company gets the license, it will gain momentum and eligible candidates will be able to submit their biodata.
Eligibility Criteria For Tesla Recruitment 2022
- स्टारलिंकमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कार्यकारी स्तरावर काम करण्याचा ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- तसेच त्याला कॉम्प्युटरचे पूर्ण ज्ञान आणि मजबूत संभाषण कौशल्य असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराने समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजेंस इंजिनिअर्सची भरती
Elon Musk said in a tweet that Tesla would be filling the vacancies for hardcore AI, or artificial intelligence engineers. Tesla will hire engineers with full self-driving chip (FSD), dojo systems, neural networks, autonomy algorithms and coding experience. Candidates selected through this recruitment process will be able to work in Tesla’s bot project.
या पदभरतीचा सविस्तर तपशील टेस्लाच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. सोर्स : म. टा.