१६ ते ३१ जुलैदरम्यान विद्यापीठांच्या परीक्षा घ्या

UGC RTMNU Exam Dates

विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) देशभरातील विद्यापीठांच्या परीक्षा आणि शैक्षणिक वर्षांच्या वेळापत्रकाचा अहवाल जाहीर केला आहे. यानुसार १६ ते ३१ जुलै २०२० दरम्यान परीक्षा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (RTMNU Nagpur University) नागपूर विद्यापीठाने बुधवारी यावर विस्तृत निर्णय घेण्यासाठी परीक्षा मंडळाची बैठक बोलावली आहे. त्यावेळी विद्यापीठाच्या परीक्षेवर निर्णय होण्याची शक्यता आहे.

टाळेबंदीमुळे देशभरात विद्यापीठाच्या परीक्षा समोर ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, करोनाचे संकट वाढतच असल्याने शेवटी परीक्षा आणि शैक्षणिक वर्षांसंदर्भात UGC अंतर्गत समिती गठित करून देशपातळीवर एकच निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार उर्वरिस सत्र १ ते १५ जुलै दरम्यान पूर्ण करत १६ ते ३१ जुलैपर्यंत परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, यासंदर्भातील सर्व निर्णय हे राज्य शासनांवर सोपवण्यात आले आहे. त्यावर विद्यापीठाच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. मात्र, राज्य शासनाकडून यावर स्पष्ट निर्देश आल्यावर नेमक्या परीक्षेच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. यूजीसीने नवीन शैक्षणिक सत्र १ ऑगस्टपासून तर नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी १ सप्टेंबरपासून सुरू करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

१५ दिवसांत परीक्षा होणे अशक्य

राज्यातील बहुतांश विद्यापीठांमध्ये १२०० परीक्षा होतात. त्यातच ४० लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये होणे अशक्य आहे. त्यामुळे केवळ अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड