दहावी, बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलत गुण
Discount Marks For 10th 12th Class Players
खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. पात्र खेळाडूंना क्रीडागुणांची सवलत देण्याबाबतचे कामकाज सुलभ व्हावे याकरिता क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने मार्गदर्शक सूचनाही अनेकदा जारी केलेल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेला बसलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांच्या सवलतीच्या गुणासाठीचे प्रस्ताव सादर करण्यासाठी शाळा व महाविद्यालयांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून दिली आहे.
असे असले तरीही, काही शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाकडून सवलतीच्या गुणांसाठी विद्यार्थ्यांचे प्रस्तावच दाखल केलेले नाहीत, अशी बाब उघडकीस आली आहे. शालेय क्रीडा स्पर्धा मध्ये काही खेळप्रकारात प्रथम पाच क्रमांक पर्यंत प्राविण्य असलेल्या खेळाडूंना प्राविण्य प्रमाणपत्र दिले जात असले तरीही सुधारीत शासन निर्णयामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडागुणाची सवलत देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. या संर्दभातील पुढील अपडेट उपलब्ध झाल्यावर प्रकाशित होईलच. अधिक अपडेट्ससाठी महाभरतीला(MahaBharti.in) ला नियमित भेट देत रहा.