दिव्यांग उमेदवारांसाठी महत्वाची बातमी! एमपीएससीने बदलले भरतीचे नियम | MPSC Update for Divyang Candidates

MPSC Update for Divyang Candidates

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) दिव्यांग उमेदवारांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ मे २०२५ पासून प्रसिद्ध होणाऱ्या सर्व पदभरती जाहिरातींसाठी, दिव्यांग उमेदवारांनी त्यांचा दिव्यांग तपशील केंद्र सरकारच्या ‘स्वावलंबन’ पोर्टलवरून विधिग्राह्य (व्हॅलिडेट) केलेला असणे अनिवार्य करण्यात आले आहे. अन्यथा, अशा उमेदवारांना पदभरतीसाठी अर्ज करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश एमपीएससीने दिले आहेत.

राज्य शासनाच्या २७ जून २०२४ रोजीच्या परिपत्रकानुसार, दिव्यांग व्यक्तींना आरक्षण व अन्य सुविधांचा लाभ देण्यासाठी ‘स्वावलंबन’ पोर्टलवरून वितरित केलेले दिव्यांग प्रमाणपत्र व ‘यूडीआयडी’ (UDID) कार्ड आवश्यक करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, एमपीएससीने देखील त्याच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीमध्ये दिव्यांग उमेदवारांना त्यांचा यूडीआयडी क्रमांक व संबंधित तपशील भरता येईल, अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

उमेदवारांनी त्यांच्या खात्यामधील दिव्यांग तपशील स्वावलंबन पोर्टलवरून अचूक तपासून ‘व्हॅलिडेट’ करणे गरजेचे आहे. यासाठी त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र क्रमांक, दिव्यांगत्वाची टक्केवारी, यूडीआयडी क्रमांक व वितरण दिनांक असे सर्व तपशील अचूकपणे भरावे लागतील. तपशील एकदा अचूक भरल्यावर ‘Validate’ बटणावर क्लिक करून प्रक्रिया पूर्ण करता येईल.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

विशेष म्हणजे, ज्या उमेदवारांकडे केंद्र शासनाचे प्रमाणपत्र नाही, पण राज्य शासनाच्या एसएडीएम (SADM) पोर्टलवरून मिळवलेले प्रमाणपत्र आहे, त्यांनी देखील यूडीआयडीसाठीचा नोंदणी क्रमांक अनिवार्यपणे नोंदवावा लागेल. तसेच, मुलाखतीपूर्वी यूडीआयडी कार्ड सादर करणे बंधनकारक असेल.

एमपीएससीने सर्व दिव्यांग उमेदवारांना लवकरात लवकर आपले तपशील व्हॅलिडेट करून घेण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून अर्ज करताना किंवा निवड प्रक्रियेदरम्यान कोणतीही गैरसोय होणार नाही.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड