महाराष्ट्र अर्थसंकल्प 2025 सादर, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, रक्कम वाढणार!! | Maharashtra Budget Ladki Bahin Update 2025!

Maharashtra Budget 2025: Good News for Dear Sisters!

महाराष्ट्राचा नवीन अर्थसंकल्प सादर झाला असून यात 2100 रुपयांचे अनुदान देण्याचा विचार सुरू असल्याचे समजते.  राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयांच्या अनुदानाचा विचार सुरू आहे. निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी पाच वर्षे आहेत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. मात्र, आर्थिक शिस्त पाळून निर्णय घ्यावा लागेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. निश्चितच लाडक्या बहिणीसाठी हि एक आनंदाची बातमी आहे. 

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२५ वर आधारीत महत्वाचे प्रश्न, सर्व परीक्षेस उपयुक्त

Maharashtra Budget 2025: Good News for Dear Sisters!

 

नवीन अर्थसंकल्पात राज्यातील पायाभूत विकासाला गती
रस्ते, बंदरे आणि विमानतळांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाणार आहे. वर्ल्ड बँक, एशियन बँक आणि नाबार्डच्या माध्यमातून भांडवली गुंतवणूक केली जाईल. आगामी वीस वर्षांचा विचार करून पायाभूत सुविधांचे नियोजन करण्यात येणार आहे.

महिला सशक्तीकरणासाठी ‘लखपती दीदी’ योजना
लाडक्या बहिणींसाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकार ‘लखपती दीदी’ संकल्पना राबवत असून, आतापर्यंत 23 लाख महिलांना याचा लाभ झाला आहे. पुढील टप्प्यात 24 लाख महिलांना यात समाविष्ट करण्यात येणार आहे.

कृषी आणि तंत्रज्ञान क्षेत्राला चालना
शेती क्षेत्रासाठी मोठ्या तरतुदी करण्यात आल्या असून, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन टेक्नॉलॉजी आणि बायोटेक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. जलयुक्त शिवार आणि नदीजोड प्रकल्पांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

राज्यातील आर्थिक स्थैर्य आणि गुंतवणूक वाढीला चालना
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आता सात लाख कोटींवर पोहोचला आहे. उद्योग वाढीला मदत करणाऱ्या धोरणांमुळे महाराष्ट्र स्टार्टअप आणि विदेशी गुंतवणुकीत आघाडीवर आहे. जीएसटी संकलनात महाराष्ट्र देशात क्रमांक एकवर असून, आगामी काळातही ही वाढ कायम राहील, असा सरकारचा विश्वास आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड