नवीन अपडेट, आता बीएड प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल, जाणून घ्या नवीन पद्धती!-Major Change in Integrated B.Ed Admission Process!
Major Change in Integrated B.Ed Admission Process!
सध्या परंपरागत BEd पद्धती मध्ये मोठ्ठे बदल संभावित आहेत. त्या नुसार बीए, बीएस्सी-बीएड (एकात्मिक) हा चार वर्षांचा अभ्यासक्रम बंद करून त्याऐवजी एकात्मिक शिक्षण प्रशिक्षण अभ्यासक्रम (Integrated Teacher Education Programme – ITEP) सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमासाठी होणारी CET (Common Entrance Test) आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना राष्ट्रीय केंद्रीय सामाईक परीक्षा (National Common Entrance Test – NCET) देऊन प्रवेश घ्यावा लागेल. हि केन्द्रीय पद्धती बद्दल पूर्ण माहिती आम्ही या ठिकामी देत आहोत. चला तर या पद्धतीची पूर्ण माहिती बघूया!
महत्त्वाचा बदल शिक्षण विभागाचा निर्णय
राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद (NCTE) ने २५ जानेवारी २०२५ रोजी अधिसूचना प्रसिद्ध करत हा मोठा शैक्षणिक बदल जाहीर केला. यानुसार, ५ फेब्रुवारी २०२५ रोजी चार वर्षांच्या बीए, बीएस्सी-बीएड (एकात्मिक) अभ्यासक्रमाऐवजी ITEP लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर, ४ मार्च २०२५ रोजी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अधिकृत पत्र जारी करत एकात्मिक बीएड अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया बंद करण्याचे आदेश दिले.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
यामुळे यापुढे NCET 2025 च्या माध्यमातूनच देशभरातील ITEP अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल. या निर्णयामुळे, शिक्षक प्रशिक्षण क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण बदल होत असून विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमाच्या चौकटीत प्रवेश घ्यावा लागेल.
विद्यार्थ्यांसाठी पुढील प्रक्रिया आणि सूचना
CET साठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना NCET साठी अर्ज करावा लागेल:
- ज्या विद्यार्थ्यांनी आधी CET साठी नोंदणी केली होती, त्यांना आता NCET 2025 साठी अर्ज करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
- अर्ज प्रक्रिया NTA (National Testing Agency) च्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन करता येईल.
- अर्ज भरण्यासाठी https://exams.nta.ac.in/NCET किंवा https://ncet2025.ntaonline.in/ या लिंकचा वापर करावा.
CET साठी भरलेले शुल्क परत मिळणार:
- CET साठी शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांना ते शुल्क परत करण्यासंबंधीची स्वतंत्र सूचना लवकरच CET सेलतर्फे देण्यात येईल.
- विद्यार्थ्यांना परतावा मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रिया कशी असेल याबाबत अधिकृत वेबसाइटवर माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे.
ITEP मध्ये प्रवेश घेणाऱ्या महाविद्यालयांसाठीही सूचना
NCTE ने ५ फेब्रुवारी २०२५ रोजी ITEP अभ्यासक्रम लागू करण्याची सूचना दिल्यामुळे, या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करणाऱ्या महाविद्यालयांनी NCET परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया राबवावी लागणार आहे.
शिक्षक प्रशिक्षणासाठी नवी दिशा!
शिक्षण क्षेत्रातील या नव्या बदलामुळे इच्छुक विद्यार्थ्यांना आता शिक्षक प्रशिक्षणासाठी नवीन आणि सुधारित अभ्यासक्रम (ITEP) उपलब्ध होईल. तसेच, शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा होण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांनी NCET 2025 साठी लवकरात लवकर अर्ज करावा आणि नवीन प्रवेश प्रक्रियेनुसार तयारी करावी.