https://mahabharti.in/wp-admin/edit.php?post_type=better-banner

महत्वाचे! राज्यभरात महसूल, जलसंपदा, कृषी, वित्त अन्य विभागात आदिवासींची पंधरा हजारांवर पदे रिक्त! – Adivasi Job Vacancies Maharashtra

Adivasi Job Vacancies Maharashtra

नोकरभरतीकडे दुर्लक्ष आणि कंत्राटी भरतीकडे कल वाढल्यामुळे राज्य शासनाच्या विविध खात्यांमध्ये आदिवासी प्रवर्गातील सुमारे पंधरा हजार विविध श्रेणीतील पदे रिक्त आहेत. Adivasi Job Vacancies Maharashtra यामध्ये महसूल, जलसंपदा, कृषी, वित्त, सार्वजनिक आरोग्य आणि परिवहन महामंडळामधील अ, ब आणि क वर्गातील सर्वाधिक पदांचा समावेश असल्याचे उघडकीस आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलै २०१७रोजी दिलेला निर्णय, उच्च न्यायालय नागपूर यांनी २८ सप्टेंबर २०१८ रोजी दिलेला निर्णय, त्याअनुषंगाने शासनाने आदिवासी समाजाच्या विशेष पदभरती करीता २१ डिसेंबर २०१९ रोजी काढलेल्या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी होत नसल्यामुळे ही पदे रिक्त आहेत. शालेय शिक्षण विभागात गट अ ते गट ड संवर्गात एकूण ५ हजार ७२१ पदे मंजूर आहे. यापैकी अनुसूचित जमातीसाठी ३९० पदे राखीव असून १९५ पदे भरण्यात आली आहे. अद्यापही १९५ पदांचा पूर्वीचा अनुशेष आणि अधिसंख्य केलेली १९ पदे अशी एकूण २१४ पदे रिक्त आहेत.

 

Adivasi Job Vacancies Maharashtra

राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळात एकूण मंजूर पदे ८३९ आहे. त्यापैकी ५८ पदे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. राखीव असलेल्या पदांपैकी अनुसूचित जमातीच्या भरलेल्या पदांची संख्या केवळ २८ आहे. त्यापैकी जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेले २० जण आहे. ८ जणांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकारी गट अ ची मंजूर पदे २ हजार १५२ आहे. यातील अनुसूचित जमातीसाठी १५३ पदे राखीव आहे. यापैकी बिगर आदिवासींनी बळकावलेली गट-अ संवर्गाची १२ पदे आहेत. आणि पूर्वीच्या अनुशेषाची २० पदे अशी एकूण ३२ पदे रिक्त आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मुंबईमध्ये एकूण मंजूर पदे ५२४ आहे. मेरीटाईम बोर्ड हे गृह विभागांतर्गत बंदरे व परिवहन करीता आहे. यात अनुसूचित जमातीसाठी अ संवर्गाची २ पदे व व संवर्गाची ३ पदे राखीव आहे. पण अद्यापही ही पदे भरलेली नाहीत. राज्यभरातील धर्मादाय आयुक्त कार्यालयात एकूण १ हजार ८५९ पदे मंजूर आहेत. यातील २१७ पदे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमातींच्या भरलेल्या पदांची संख्या ११४ आहे. जातवैधता प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांची संख्या ९१ आहे. अनुसूचित जमातींचा १०३ पदांचा अनुशेष शिल्लक आहेत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

उच्च व तंत्र शिक्षण विभागात एकूण मंजूर पदे १० हजार ४८६ आहे. यातील ७५० पदे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. अनुसूचित जमातीच्या भरलेल्या पदांची संख्या ३७२ आहे. पुर्वीचा अनुशेष ३७८ पदांचा शिल्लक आहे. अनुसूचित जमातींचे जातवैधता सादर करणाऱ्यांची संख्या ३१९ आहे. वन विभागात एकूण मंजूर पदे १९ हजार ३६४ आहे. यातील अनुसूचित जमातीसाठी २ हजार ६५० पदे राखीव आहे. अनुसूचित जमातींच्या भरलेल्या पदांची संख्या १ हजार ४६० आहे. अनुसूचित जमातींचे जातवैधता प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांची संख्या १ हजार २९८ आहे. अनुसूचित जमातींच्या पदांचा अनुशेष १ हजार १९० आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या क्षेत्रिय कार्यालयात एकूण मंजूर पदे ४८ हजार १६८ आहे. त्यापैकी ३ हजार ८८० पदे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. राखीव पदापैकी अनुसूचित जमातीच्या भरलेल्या पदांची संख्या केवळ २ हजार ६२१ आहे. त्यापैकी जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेले २ हजार ३२८ आहे. अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर नियुक्त झालेल्या व नंतर मात्र जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या २८२ आहे. तर अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आल्यामुळे रिक्त झालेल्या पदांची संख्या २३५ दाखविण्यात आलेली आहे. अनुसूचित जमातींचा १ हजार २५९ पदांचा अनुशेष शिल्लक आहे. उद्योग संचालनालय, शासन मुद्रण व लेखन सामग्री भांडार मुंबई, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय नागपूर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंबई या क्षेत्रिय कार्यालयात एकूण मंजूर पदे ९ हजार ७०९ आहे. त्यापैकी ६८४ पदे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. राखीव पदापैकी अनुसूचित जमातीच्या भरलेल्या पदांची संख्या केवळ ३३८ आहे. त्यापैकी जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेले १५० आहे. तर तब्बल १८८ जणांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. वित्त विभाग व या विभागाच्या अधिनस्त येणाऱ्या वस्तू व सेवा कर विभाग, लेखा व कोषागारे स्थानिक निधी लेखा, विमा संचालनालय या क्षेत्रिय कार्यालयात एकूण मंजूर पदे २० हजार ३५३ आहे. यातील १ हजार ३७८ पदे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. अनुसूचित जमातीच्या भरलेल्या पदांची संख्या ९६० आहे. त्यापैकी जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेले ८०८ आहे.

अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर नियुक्त झालेल्या व नंतर मात्र जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या १५६ आहे. तर अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आल्यामुळे रिक्त झालेल्या पदांची संख्या ४१ दाखविण्यात आलेली आहे. कृषी विभागात एकूण ३३ हजार ६४१ पदे मंजूर आहे. यापैकी अनुसूचित जमातीसाठी ३००१ पदे राखीव असून १ हजार ८०३ पदे भरण्यात आली आहे. अद्यापही १ हजार १९८ पदांचा पुर्वीचा अनुशेष आणि अधिसंख्य केलेली ११० पदे अशी एकूण १ हजार ३०८ पदे रिक्त आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागातून अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेली तब्बल २९ पदे गायब झाली आहेत. या विभागात एकूण मंजूर पदे १४ हजार १८१ आहे. यापैकी अनुसूचित जमातीसाठी १ हजार ६० पदे राखीव आहेत. अनुसूचित जमातींची ८५८ पदे भरली असून २०२ पदांचा पुर्वीचा अनुशेष शिल्लक आहे. जलसंपदा विभागात एकूण ४५ हजार ४९० पदे मंजूर आहेत. यापैकी अनुसूचित जमातीसाठी ३ हजार १८४ पदे राखीव असून १ हजार ४२२ पदे भरण्यात आली आहे. अद्यापही १ हजार ७६२ पदांचा पुर्वीचा अनुशेष आणि अधिसंख्य केलेली १०१ पदे अशी एकूण १ हजार ८६३ पदे रिक्त आहेत. मुद व जलसंधारण विभागात अ ते ड संवर्गात एकूण ३ हजार १९६ पदे मंजूर आहेत. यापैकी अनुसूचित जमातीसाठी २२० पदे राखीव असून १५८ पदे भरण्यात आली आहेत. अद्यापही ६२ पदांचा पुर्वीचा अनुशेष आणि अधिसंख्य केलेली ७ पदे अशी एकूण ६९ पदे रिक्त आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागात अ ते ड संवर्गात एकूण १ हजार २४० पदे मंजूर आहे. यापैकी अनुसूचित जमातीसाठी राखीव पदे ९२ आहेत. अनुसूचित जमातीची भरलेली पदे ६२ आहे. अद्यापही ३० पदांचा पुर्वीचा अनुशेष आणि अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची १४ पदे अशी एकूण ४४ पद रिक्त आहेत.

आदिवासी विकास विभागात गट अ व गट ब ची पदेच गायब झाल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून पुढे आली आहे. केवळ गट क व गट ड संवर्ग कार्यरत असून याच संवर्गाची पदभरती केली जात आहे. गट क ते गट ड संवर्गात एकूण १८ हजार ३४६ पदे मंजूर आहे. यापैकी अनुसूचित जमातीसाठी राखीव पदे २ हजार ६०२ आहेत. अनुसूचित जमातीची भरलेली पदे २ हजार ६२२ आहे. यात तब्बल २० पदांची तफावत आढळून आली आहे. राज्याच्या सहकारी विभागात सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यातील प्रशासन व लेखा परीक्षण आस्थापना मधील अनुसूचित जमातींची १८० पदे रिक्त आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात एकूण मंजूर पदे १ लाख २२ हजार ८९३ आहे. यातील ११ हजार १ पदे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. अनुसूचित जमातीच्या भरलेल्या पदांची संख्या ७ हजार ७३८ आहे. पुर्वीचा अनुशेष ३ हजार २६३ पदांचा आहे. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक विभागात एकूण मंजूर पदे २ हजार ९३४ आहे. यातील ३८३ पदे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. अनुसूचित जमातीच्या भरलेल्या पदांची संख्या १३९ आहे. पुर्वीचा अनुशेष २४४ पदांचा शिल्लक आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड