महत्वाचे! शिक्षक होण्यासाठीच्या अभ्यासक्रमात मोठा आता बदल! – Shikshak Bharti New Exam Syllabus Pattern 2025
Shikshak Bharti New Exam Syllabus Pattern
केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अर्थात एनसीटीई नियमन २०२५ ला मान्यता दिली आहे. एनसीटीई नियमन २०२५ चा मसुदा राज्ये आणि विद्यापीठांना पाठविण्यात आला आहे. या नियमांतर्गत जवळजवळ ११ वर्षांनंतर शाळेतील शिक्षक होण्यासाठीच्या अभ्यासक्रमात बदल होणार आहे. यामध्ये पीजीनंतर एक वर्ष बी. एड., पदवीनंतर दोन वर्षे बी.एड., बारावीनंतर चार वर्षे बी. एड. आणि एम.एड. पदवी अभ्यासांनाही मान्यता देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दहा वर्षांनंतर पुढील वर्षापासून पुन्हा एक वर्षाचा बी.एड. पदवी कार्यक्रम सुरू होत आहे.
बी.एड. मध्ये आगामी सत्रापासून चार नवीन स्पेशलायझेशन
चार वर्षांचा पदवीधर पदवी कार्यक्रम आणि पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेले विद्यार्थी एक वर्षाच्या बी.एड. कार्यक्रमामध्ये प्रवेश घेऊ शकतील. नियमांनुसार हा पदवी कार्यक्रम २०१४ मध्ये बंद करण्यात आला. परंतु, आता एनईपी २०२० च्या शिफारशींनुसार, १० वर्षांनी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीन वर्षांचा बॅचलर डिग्री प्रोग्राम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांच्या बी. एड. अभ्यासक्रमात प्रवेशाची संधी मिळेल. चार वर्षांचा एकात्मिक बी.एड. या पदवी कार्यक्रमाचा विस्तार करण्यात आला आहे. बीए-बी.एड., बीएस्सी-बी.एड. आणि बीकॉम बी.एड. ची पहिली बॅच २०२३ मध्ये सुरू झाली. यामध्ये आगामी सत्रापासून म्हणजेच २०२५ पासून शारीरिक शिक्षण, कला शिक्षण, योग शिक्षण आणि संस्कृत शिक्षण हे चार नवीन स्पेशलायझेशन अभ्यासक्रम जोडले जाणार आहेत. शिक्षक होण्यासाठी हा एक प्रीमियम कार्यक्रम असेल. बारावीनंतर शिक्षक म्हणून करिअर करू इच्छिणारे विद्यार्थी या चार वर्षांच्या बी.एड. एकात्मिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये शिपाई पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
‘एनसीटीई’ने शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा एनईपी २०२० आणि २०४७ विकसित भारत ध्येयअंतर्गत हे एनसीटीई नियमन-२०२५ तयार केले आहे. एनईपी २०२० अंतर्गत शालेय शिक्षण पायाभूत टप्पे, पूर्वतयारी टप्पे, मध्यम आणि माध्यमिक टप्पे, अशा चार भागांमध्ये विभागले गेले आहे. शिक्षकांना या चार वेगवेगळ्या स्तरांवर तयार केले जाईल. याशिवाय पदव्युत्तर पदवी कार्यक्रमांच्या रचनेत बदल झाल्यामुळे शिक्षक होण्यासाठी स्वतंत्र बीएड कार्यक्रम सुरू केले जात आहेत. याशिवाय एनईपीअंतर्गत सर्व कार्यक्रम, क्रेडिट फ्रेमवर्क आणि अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत; ज्यामध्ये एआय, व्यावसायिक अभ्यासक्रमांसह उदयोन्मुख क्षेत्रे जोडण्यात आली आहेत. तसेच एमएड पूर्णवेळ आणि एमएड अर्धवेळ अभ्यासक्रमात देखील बदल करण्यात आला आहे. एनईपी-२०२० लागू होण्यापूर्वी ७५० महाविद्यालयांमध्ये दोन वर्षांचा बीएड अभ्यासक्रम सुरू होता. नवीन नियम लागू झाल्यानंतर हा दोन वर्षांचा बीएड कार्यक्रम विस्तारित केला जाईल. या महाविद्यालयांना बहुविद्याशाखीय कार्यक्रम सुरू करणे बंधनकारक आहे. नियमांची पूर्तता न करणार्या महाविद्यालयांमध्ये हा अभ्यासक्रम बंद केला जाईल. यासाठी चार वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे.