https://mahabharti.in/wp-admin/edit.php?post_type=better-banner

वैद्यकीय शिक्षकांची ८१६ पदे त्वरित भरणार! – हायकोर्टाचा आदेश! – Medical College Vacancies

Medical College Vacancies

महाराष्ट्र राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची ८१६ रिक्त पदे भरण्यासाठी येत्या ११ मार्चपर्यंत निर्णय घ्या, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सामान्य प्रशासन विभागाला दिला आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात राज्यामध्ये वैद्यकीय शिक्षकांची नवीन ९५४ पदे रिक्त झाली होती Medical College Vacancies. सामान्य प्रशासन विभागाने त्यापैकी १३८ पदे भरण्यासाठी मान्यता प्रदान केली आहे. त्यामुळे न्यायालयाने उर्वरित ८१६ रिक्त पदे भरण्यासाठी हा आदेश दिला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांच्या विकासासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय अविनाश घरोटे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. अॅड. अनुप गिल्डा यांनी न्यायालय मित्र म्हणून, तर वरिष्ठ अॅड. फिरदौस मिर्झा व अॅड. दीपक ठाकरे यांनी राज्य सरकारतर्फे कामकाज पाहिले.

 

राज्य सरकारने ३० जानेवारी व ४ फेब्रुवारी २०२५ रोजी विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधील ३८ सहयोगी प्राध्यापकांना प्राध्यापक पदी बढती दिली आहे. याशिवाय, वैद्यकीय शिक्षकांची रिक्त होणारी पदे तातडीने भरण्यासाठी दोन मंडळांची स्थापना केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सहायक प्राध्यापकांची ४७९ रिक्त पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. नियुक्तीकरिता २९७उमेदवारांची नावे सरकारला पाठविण्यात आली आहेत.
मेडिकल येथे कर्करोग रुग्णालय बांधकामासाठी सरकारने ७कोटी ६१ लाख रुपये मंजूर केले आहेत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड