खुशखबर! आता नागपूर येथील विद्यार्थ्यांसाठी इटलीत शिक्षणाची अनोखी संधी!! – A Unique Opportunity for Nagpur Students to Study in Italy!!

A Unique Opportunity for Nagpur Students to Study in Italy!!

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा करार केला असून, आता अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, डिझाईन, अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन या पाच शाखांमध्ये शिक्षण घेण्यासाठी इटालियन सरकारसोबत भागीदारी करण्यात आली आहे. या करारामुळे नागपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना इटलीतील नामांकित विद्यापीठांमध्ये शिकण्याची संधी मिळणार असून, त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण आणि उद्योगाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची अनोखी संधी उपलब्ध होणार आहे.

A Unique Opportunity for Nagpur Students to Study in Italy!!

इटालियन दूतावास आणि नागपूर विद्यापीठ यांच्यात अलीकडेच झालेल्या या कराराच्या माध्यमातून ‘इन्व्हेस्ट युअर टॅलेंट इन इटली’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना नऊ महिन्यांच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेता येणार असून, केवळ अकादमिक शिक्षणच नव्हे, तर इटलीतील प्रमुख कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधीही मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित क्षेत्रात जागतिक स्तरावर व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या अभ्यासक्रमांसाठी अर्ज प्रक्रिया २४ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, इच्छुक विद्यार्थ्यांना https://investyourtalentapplication.esteri.it/SitolYT/EN/invest-your-talent-in-italy या अधिकृत लिंकवर जाऊन अर्ज करता येईल. महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागामार्फत हा करार करण्यात आला असल्यामुळे, नागपूर विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांतील तसेच राज्यातील इतर काही विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना देखील या अभ्यासक्रमाचा लाभ घेता येणार आहे.

या संधीमुळे नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक कौशल्य आत्मसात करता येईल आणि इटलीसारख्या प्रगत देशात शिक्षण व कामाचा अनमोल अनुभव मिळेल. हा करार केवळ शिक्षणापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांसाठी जागतिक करिअरच्या नव्या वाटा उघडणारा ठरणार आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड